Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून लाडकी बहीण योजना सुरु केली. दर महिन्याला 1,500 रुपये रक्कम या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार.
राज्य सरकारने 2024-25 च्या बजेटमध्ये घोषणा केलेल्या CM Ladli Behna Yojana या अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे स्त्रिया आत्मनिर्भर राहून आपल्या गरजा पूर्ण करू शकतात.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana बदल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा विचार करत असाल, तर आमचा हा संपूर्ण लेख लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा.
Ladki Bahin Yojana in Marathi
महाराष्ट्र राज्यातील 2024-25 च्या विधानसभा अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात लाडकी बहिण योजनाची घोषणा केली.
हा उपक्रम जुना असून ही मध्य प्रदेश मध्ये 26 जानेवारी, 2023 रोजी CM Ladli Behna Yojana या नावाने सुरु केली गेली होती. लाड़ली बहना योजना ही माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरु केली होती.
त्यांच्या कार्यकाळामध्ये ही योजना मामा आणि भैय्या या नावाने खूप जास्त प्रमाणात लोकप्रिय झाली. लाड़ली बहना या योजने अंतर्गत मध्य प्रदेशातील महिलांना प्रति महिना १ हजार रुपये देण्याचे शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले होते.
आपल्या महाराष्ट्र राज्यानेसुद्धा मध्य प्रदेश या राज्याकडून प्रेरणा घेऊन ही योजना सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शासनामधील अधिकाऱ्यांचे एक पथक नेमून त्यांना मध्य प्रदेशामध्ये जाऊन Ladli Behna Yojana याबद्दल आढावा घेण्यास सांगितला.
ती योजना कशी काम करते? लोकांना त्याचा कसा फायदा होतो? खात्यामध्ये पैसे कशाप्रकारे जात आहे? आणि काही समस्या त्यामध्ये होत आहे का? या सगळ्यांचा आढावा घेऊन येण्याचे आदेश दिले गेले होते.
या आढाव्यानंतर, मध्य प्रदेशातील Chief Minister Ladli Behna Yojana यावरून प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या नावाने सुरु करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प (Maharashtra Government Budget) मांडताना म्हणाले, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि सर्वांगीण विकासासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र असलेल्या स्त्रियांना या योजना अंतर्गत शासनातर्फे दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतील.
या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात लाभार्थी महिलांना आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल असे जाहीर केले आणि याची अंमलबजावणी 1 जुलै, 2024 पासून सुरु होईल असे ही सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे? | What is Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत मिळणार. या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वर्षा मधील स्त्रियांना याचा लाभ घेता येणार.
Chief Minister Ladli Behna Yojana ची सुरुवात 1 जुलै, 2024 पासून सध्याच्या महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे करण्यात येणार. या योजनेसाठी अर्थसंकल्पनेमध्ये 46 हजार कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली.
Ladki Bahin Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | Chief Minister Ladki Bahin Yojana |
राज्याचे नाव | महाराष्ट्र |
सुरु कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
लॉन्च दिनांक | 28 जुन, 2024 |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत |
लाभार्थी | 21 ते 65 वर्षा मधील महिला |
आर्थिक रक्कम | दरमहा 1,500 रुपये |
अर्ज पद्धत | ऑनलाइन /ऑफलाइन |
बजेट | 46 हजार कोटी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ladakibahin.maharashtra.gov.in |
लाडकी बहीण योजनाचे उद्देश | Objectives
राज्य सरकारचा Ladli Behna Yojana या मागील मुख्य हेतू म्हणजे राज्यातील गरीब व दारिद्र्यात असलेल्या महिलांना आर्थिक मदत प्रदान करून त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनविणे.
आजही देशभरातील घरामधील स्त्रिया या दुसऱ्यांवरती अवलंबून असतात आणि त्यात त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करता येत नाही. तसेच काही तरुणींना आपले शिक्षण घेता येत नाही यासाठी या अशाप्रकारच्या योजना त्यांना मदत करू शकतात. महिलांच्या अशा समस्यांना दूर करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे या उपक्रमाची सुरु करण्यात आली.
लाडकी बहीण योजनाचे फायदे | Benefits
- Ladli Behna Yojana अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे.
- या योजनांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील सगळ्याच महिला वर्गाना प्रति महिना 1,500 रुपये आर्थिक स्वरूपात मदत म्हणून देण्यात येणार.
- या योजने अंतर्गत 21 ते 65 वर्षांमधील तरुणी व महिलांना याचा फायदा घेता येणार.
- राज्य सरकारने अर्थसंकल्पनेत दरवर्षी 46 हजार कोटींचा बजेट लाड़ली बहना योजनासाठी काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
- सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने यासाठी 1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 अशी मुदत ठेवली होती, परंतु आता यामध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर त्याची मुदत 15 दिवसाच्या ऐवजी 2 महिने करण्यात आली आहे.
- Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत आता 1 जुलै, 2024 ते 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे.
- या योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम प्राप्त होणार आहेत.
- या उपक्रमातून मिळणारी रक्कम या स्त्रिया त्यांच्या मूलभूत गरजा तसेच शिक्षण, व्यवसाय आणि कुटुंबातील समस्यांना दूर करण्यासाठी वापरू शकतात.
- ही योजना राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली.
- या योजनेचा फायदा ज्या महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांवर चांगले आरोग्य व पोषणतत्वांमध्ये सुधार होण्यासाठी होऊ शकतो.
- महाराष्ट्र राज्य वगळता परराज्यात महिलेचा जन्म झाला असेल आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह झाला असेल तर या योजनेचा लाभ ती महिला घेऊ शकते.
- जर कोणत्याही महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला असल्यास त्यांनाही जुलै महिन्यापासूनची रक्कम लागू करण्यात येणार आहे.
- महिलांना बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत रक्कम प्राप्त होणार आहे.
लाडकी बहीण योजनासाठी पात्रता | Eligibility
राज्य सरकारने सुरु केलेल्या योजना अंतर्गत सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहेत. त्याचसोबत अपात्रतेच्या सुद्धा अटी खालील प्रमाणे दिलेल्या आहेत ते सुद्धा लक्षपूर्वक पाहा.
पात्रता
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत ज्या महिला उमेदवार आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असणे.
- या योजनांमध्ये अर्ज करण्यासाठी तरुणी किंवा महिलांचे वय 21 ते 65 वर्ष असणे.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाच्या खाली आहे, त्याच कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- ज्या कुटुंबाकडे 2.50 लाखाचा उत्पनाचा दाखला नसल्यास, कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट मिळणार.
- या योजनेसाठी घटस्फोटित, विवाहित, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र आहेत.
- सुरुवातीला कुटुंबातील अविवाहित महिलांना याचा लाभ घेता येणार नव्हता, परंतु शासनाच्या नवीन अपडेटनुसार आता सदर योजनेमध्ये एकाच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा सहभागी होता येणार आहे.
- अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे, त्याचसोबत त्यांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक असणे.
- परराज्यातील महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास पुरुषासोबत विवाह केलेला असला पाहिजे, त्यामध्ये पुरुषाचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
अपात्रता (योजना अंतर्गत पात्र नसलेले)
- बहिण योजनामध्ये ज्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांहून अधिक आहे.
- ज्या कुटुंबामधील कोणीही सदस्य आयकरदाता म्हणजेच Income Tax Payer आहे.
- कुटुंबामध्ये कोणतेही सदस्य कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत आहे.
- तसेच सरकारी कार्यात सेवानिवृत्ती नंतर pension घेत आहे.
- अशा महिला लाभार्थी ज्यांनी सरकारच्या इतर आर्थिक योजनांमध्ये दीड हजारपेक्षा अधिक लाभ घेतला असेल.
- ज्या कुटुंबामध्ये माजी खासदार व आमदार सदस्य आहेत.
- ज्या सदस्यांच्या कुटुंबाकडे संयुक्तपणे पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असेल. ही अट लागू केली जाणार नाही, म्हणजेच सरकार तर्फे ही काढण्यात आली आहे.
- ज्याच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत आहेत.
लाडकी बहीण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents
- अर्जाचा फॉर्म
- लाभार्थी महिलांचे आधारकार्ड
- सक्षम प्राधिकारींनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाच्या खाली असणे)
- महाराष्ट्रातील जन्माचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र/मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
- रेशन कार्ड
- बँक खात्याचे पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
- अर्जदाराचे अटी शर्तीचे पालन केल्याचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना अर्ज | Ladki Bahin Yojana Online Apply
लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाईन प्रक्रिया मोबाईलद्वारे सुरु करण्यात आलेली आहे. ही प्रकिया तुम्ही घरी बसल्या अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. ती खालीलप्रमाणे दिलेले आहेत ते लक्षपूर्वक बघा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे चुका तुमच्याकडून होणार नाही.
Online Registration with Mobile App
- तुमच्या मोबाईलमध्ये Narishakti Doot App इन्स्टॉल करणे.
- App ओपन करून त्यामध्ये मोबाईल नंबर टाकून login करणे
- लॉगिन करून झाल्यावर आलेला OTP टाकून Verify करून घेणे.
- मोबाईलवर आलेल्या permission ला allow करून घेणे.
- नंतर प्रोफाइल अपडेटमध्ये जाऊन पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका, नारीशक्ती प्रकार निवडणे.
- त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे location मागेल ते allow करायचे आहे.
- सर्वातआधी महिलेचे संपूर्ण नाव आधारकार्ड प्रमाणे टाकून घेणे.
- अविवाहित महिलेने वडिलांचे नाव किंवा विवाहित महिलेने पतीचे नाव टाकणे. (विधवा महिला कोणतेही नाव निवडू शकते)
- महिलेचा जन्म दिनांक (दिनांक/महिना/वर्ष) या फॉरमॅटमध्ये टाकणे.
- अर्जदाराचे राहण्याच्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता टाका.
- त्यानंतर जन्माचे ठिकाण टाका. (शाळेच्या दाखल्यामधून ठिकाण मिळेल)
- जन्म ठिकाणावरून ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिका पर्यायाची निवड करणे.
- त्या गावाचे किंवा शहराचे पिनकोड टाकून घेणे.
- महिलेचे मोबाईल नंबर व आधार क्रमांक टाकायचा आहे.
- इतर शासनाचे लाभ घेत असाल तर होय करा अथवा नाही. (शासनाकडून दीड हजार रुपयेपेक्षा जास्त लाभ घेत असल्यास त्या महिला अर्ज करू शकणार नाहीत)
- वैवाहिक स्थितीला क्लिक करून महिलेची सध्याची परिस्थिती निवडणे.
- महिला विवाहित असेल तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकणे.
- महिलेचा जन्म परप्रांतीय असेल तर होय करा अथवा नाही.
- त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचे पूर्ण नाव, खाते धारकाचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड योग्यरीत्या टाकून घेणे.
- अर्जदाराचे आधार क्रमांक बँक खात्याला जोडल्याची होय किंवा नाही मध्ये निवड करून घ्या.
- त्यामध्ये विचारले गेलेल्या कागदपत्रांना एकामागे एक अपलोड करून घेणे.
- अर्जदाराचे फोटो live capture करून त्यामध्ये अपलोड करणे.
- सगळी प्रकिया झाल्यावर माहिती जतनवर क्लिक करून फॉर्म submit करणे.
- त्यानंतर ४ नंबरी OTP टाकून verify करणे.
- अशाप्रकारे अर्जाची संपूर्ण प्रकिया पूर्ण झालेली आहे.
- अर्ज तपासणीसाठी “यापूर्वी केलेले अर्ज” यावर पाहू शकता.
महत्त्वाची टीप:
- सर्वात आधी तुम्हाला तुमचे सगळे कागदपत्रे स्कॅन करून घेणे आवश्यक आहे.
- नारीशक्ती दूतमधील महिलांच्या योजना यावर क्लिक करून तुम्हाला अर्जाची हमीपत्र PDF मिळेल. नाही भेटले तर, हमीपत्र आपल्या Telegram channel वर मिळून जाईल.
- या कागदपत्रामधील अर्जदाराचे हमीपत्राचे प्रिंट करून त्यावर टिकमार्क आणि अर्जदाराची सही करून स्कॅन करून घेणे.
- प्रत्येक स्कॅन केलेली कॉपी 1 MB च्या आत असणे गरजेचे आहे. जर 1 MB च्या वर असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकत नाही.
- सगळी माहिती इंग्लिशमध्ये टाकणे.
- बँक खात्याला आधारकार्ड लिंक करून घेणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म असणे गरजेचे आहे. हे फॉर्म कसे प्राप्त करायचे? याबद्दल वरती माहिती दिलेली आहे. हे फॉर्म लिखित स्वरूपात असल्याकारणामुळे लक्षपूर्वक माहिती समजून घेणे व तुमचे फॉर्म योग्यरीत्या लिहिणे.
- महिलेचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव लिहून घेणे भरून घेणे.
- जन्म दिनांक हा दिनांक/महिना/ वर्ष या फॉरमॅटनुसार भरणे.
- अर्जदाराचा संपूर्ण पत्ता योग्यरित्या भरणे.
- महिलेचे जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिका, पिनकोड टाकून घेणे.
- रजिस्टर मोबाइल नंबर टाकून घेणे.
- आधार क्रमांक काळजीपूर्वक टाकून घेणे.
- शासनातर्फे इतर राबविण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ घेत असाल, तर होय/नाही उत्तर देणे आणि होय असल्यास दरमहा मिळणारी रक्कम टाकणे.
- त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती नमूद करणे.
- लाभार्थीचे बँक खाते असल्यास बँकेचे पूर्ण नाव, खाते धारकाचे नाव, क्रमांक, IFSC कोड काळजीपूर्वक लिहून घेणे.
- महिलेचा आधार क्रमांक बँक खात्यामध्ये जोडलेले आहे की नाही हे पडताळणी करूनच होय/नाही उत्तर देणे.
- त्या फॉर्ममध्ये दिलेल्या कोणत्या नारीशक्ती प्रकारच्या कार्यालयामध्ये तुम्ही फॉर्म जमा करणार आहात, त्यावर टिकमार्क करून घेणे. त्याच कार्यालयामध्ये सगळे कागदपत्रे जमा करणे.
- या सदरच्या योजनेत लागणारी सगळी आवश्यक कागदपत्रे एकत्र करणे.
- त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र यामध्ये काही पर्याय असतील, त्यावर टिकमार्क करून घेणे गरजेचे आहे.
- तुमच्या आधार ई-केवायसी (e-KYC) च्या माध्यमातून OTP प्रदान करण्यासाठी सहमती देणे.
- शेवटच्या भागात अर्जदार महिलेची सही करून घेणे.
- अश्या प्रकारे ही प्रकिया झाल्यानंतर अधिकृत कार्यालयामध्ये जमा करून त्यांच्याकडून अर्जाची नोंदणी क्रमांक टाकून अर्जाची पावती घेणे.
निष्कर्ष
Ladki Bahin Yojana बद्दल आम्ही या लेखात लेटेस्ट माहिती तुम्हाला सविस्तररित्या पुरवली आहे. ही योजना महाराष्ट्रातील महिलांना एक आर्थिक मदत म्हणून उत्कृष्ठ पर्याय ठरू शकते. या योजनेच्या अटीनुसार तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकत असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा. तुम्हाला काही समस्या होत असल्यास आमच्याशी Social Media वर संपर्क करू शकता.
आम्ही आशा करतो, या लेखातून तुम्हाला मौल्यवान माहिती प्राप्त झाली असेल. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असल्यास गरजू लोकांना हा लेख जरूर शेअर करा.
योजनांचे वेळीच लाभ घेण्यासाठी आम्हाला subscribe करू शकता किंवा WhatsApp/Telegram ग्रुप ला join करू शकता. ज्यामुळे योजना संबंधित सगळेच अपडेट्स तुम्हाला वेळेवर भेटतील.
FAQs
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ कोण घेऊ शकतात?
या योजनाचे लाभ महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षाखालील महिला घेऊ शकतात.
लाडकी बहिण योजनामध्ये किती रुपये भेटणार आहे?
या योजने अंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये भेटणार आहे.
लाडकी बहीण योजनामध्ये अर्ज कसा करायचा?
लाडकी बहिण योजनामध्ये अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन करू शकता.
हे देखील वाचा: