Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रामधील महायुती सरकारतर्फे सत्ता पुन्हा आल्यावर लाडकी बहीण योजनाचे पैसे 2100 रुपये करण्यात येतील अशी घोषणा केली होती. यासाठी राज्यामधील सर्व महिला लाभार्थी रक्कम वाढीची वाट पाहत आहेत.
महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार पुन्हा स्थापित झाली. राज्यामधील सर्व महिला वर्ग लाडकी बहीण योजनाचे वाढीव रक्कमची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामध्ये सरकारने 2100 रुपये रक्कमची घोषणा केलेल्याची एप्रिल महिन्यापर्यंत मंजूर मिळून जाईल अशी शक्यता आहे.
Read More: Ladki Bahin Yojana Payment Check: लाडकी बहीण योजना पैसे कसे बघायचे?
त्याचप्रमाणे योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच महिलांनी अपात्र असून आपले अर्ज पुढे पाठविले आहे. ज्यामध्ये अजूनही अशा महिला योजनेमधून रक्कम घेत असल्याचे सरकारला आढळले, त्यामुळे शासनातर्फे अशा सर्व अर्जाची तपासणी केली जाणार आहे.
तपासणी पूर्ण झाल्यावर त्यांना योजनेतून कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात येणार नाही. आतापर्यंत योजनेमध्ये जवळपास अडीच कोटींहून अधिक अर्ज महाराष्ट्रामधील महिलांनी केला आहे. ज्यामध्ये सरकारने सुद्धा 2 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी महिलांना आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहे.
Read More: Ladki Bahin Yojana 2024: लाडकी बहीण योजनेचा झटपट करा, ऑनलाईन अर्ज
त्याचप्रमाणे 05 डिसेंबरला पुन्हा नवीन सरकार स्थापन करण्यात आली. त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे निर्णय सुद्धा लवकरच घेण्यात येईल असे वाटते. तसेच महाराष्ट्रामधील महायुती सरकारतर्फे 01 एप्रिल पासून रक्कम वाढविण्यात येईल असेही घोषणा करण्यात येतील.
आता यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र नाही? याची सर्व अटी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- अर्ज केलेल्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- अर्ज करणाऱ्या महिला एकाच कुटुंबातील असून 2 पेक्षा जास्त नसणे.
- त्याचप्रकारे महिलेचे जोडीदार म्हणजेच पती कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा आयकर विभागामध्ये कामाला नसावेत.
- तसेच काही महिलांनी एकाहून अधिक अर्ज केले आहेत, त्यांना देखील योजनेमधून कमी करण्यात येणार आहे.