Krishi Sakhi Yojana 2024: नेमकी काय आहे कृषी सखी योजना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Krishi Sakhi Yojana 2024: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशामधील ग्रामीण क्षेत्रामधील महिलांसाठी कृषी सखी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या 90 हजार महिलांना ट्रेनिंग देणे आणि त्यांना प्रतिवर्ष 60 हजार रुपये ते 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. जेणेकरून स्वतः त्या महिला आत्मनिर्भर बनून आपले आयुष्य उज्ज्वल करू शकतात. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रातील शेती कामांसाठी पुरुषांसोबत महिला वर्गसुद्धा महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. पुरुषांसोबत महिलांची भागीदारी वाढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनाची सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत कृषी संबधित क्षेत्रामध्ये जुडलेल्या ग्रामीण भागातील महिलांना विविध प्रशिक्षण देऊन चांगला रोजगार कमविण्यासाठी सक्षम बनविले जाणार. 

2024 मध्ये केंद्र सरकारने नुकतीच सुरु केलेली कृषी सखी योजना काय आहे? ती कधी सुरु करण्यात आली? त्यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? ही योजना सुरु करण्यामागचे उद्देश काय होते? यामधून महिलांना कोणकोणते फायदे दिले जाणार? यामध्ये सुरुवातीला कोणत्या राज्यांचा समावेश केला आहे? यामध्ये महिलांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार? यामध्ये अर्ज करण्यास कोण पात्र असणार? अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? आणि महिला कशाप्रकारे अर्ज करून लाभ घेऊ शकतात? याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा.

Krishi Sakhi Yojana in Marathi 

पीएम मोदी सरकार 3.0 नंतर वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी धन्यवाद रॅलीला संबोधित करत असताना, PM Kisan Samman Nidhi योजनेचा 17 वा हफ्ता जारी केली. त्याचसोबत कृषी व किसान कल्याण मंत्रालय तसेच ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे महिलांना Krushi Sakhi Certificate सुद्धा देण्यात आले. 

कृषी सखी  हा कार्यक्रम असून याचा लखपती दीदी योजना अंतर्गत समावेश आहे. या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 जून 2024 मध्ये ग्रामीण विभागातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी केली आहे. या योजनेमधून ग्रामीण क्षेत्रामधील स्त्रियांना कृषी संबंधित विविध प्रकारच्या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांना सर्टिफिकेटसुद्धा प्रदान केले जातील. 

सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या कृषी क्षेत्रात विविध प्रकारचे काम करण्यास सक्षम राहतील. त्याचसोबत त्या स्वतःचाही व्यवसाय किंवा शेती सुरु करून चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करू शकतात.

कृषी सखी योजनामधील प्रशिक्षण 

केंद्र सरकारतर्फे कृषी सखी योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

  • शेतकरी फील्ड शाळेची संस्था तयार करणे
  • मातीच्या आरोग्य विषयक प्रशिक्षण व ओलावा संवर्धन 
  • बियाणे बँक तयार करून स्थापना व त्यांचे व्यवस्थापन करणे 
  • कृषी पद्धती व एकीकृत शेती व्यवस्था 
  • पशु संवर्धन आणि काळजी प्रशिक्षण माहिती 
  • जमीन तयार करण्यापासुन ते पीक कापण्यापर्यंतचा योग्य सराव 
  • लोकांसोबत संवाद करण्याचे कौशल्य 
  • जैविक व कीटकनाशक इनपुट तयार करून विक्री करणे

Krushi Sakhi Yojana 2024 Highlights

योजनेचे नावकृषी सखी योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
विभागकृषी व किसान कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय
सुरु कोणी केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
कधी सुरु केली15 जून 2024 मध्ये
उद्देशमहिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणे
लाभार्थीदेशामधील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या महिला
लाभकृषी विषय प्रशिक्षण व सर्टिफिकेट प्रदान केले जाणार
अर्ज प्रकियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइटलवकरच चालू करण्यात येईल

Krishi Sakhi Yojana Purpose 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या कृषी सखी योजनाचे मुख्य उद्देश भारतातील ग्रामीण क्षेत्रामधील महिलांना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देणे हे आहे. 2024 मध्ये केंद्र सरकारने लखपती दीदी योजना अंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती बनविणे हे ध्येय ठेवले आहेत. कृषी सखी कार्यक्रम हा या योजनेचाच एक भाग आहे. ज्यामधून महिलांना कृषी क्षेत्रातील टेक्निकल प्रशिक्षण देऊन चांगले उत्पन्न कमविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार. 

सरकारतर्फे महिलांना मिळणाऱ्या प्रशिक्षण व प्रमाणपत्राच्या मदतीने कृषी क्षेत्रात चांगली वाढ होईल. त्याचप्रमाणे त्यांना विविध प्रकारचे कृषी क्षेत्रात रोजगार निर्माण होतील. ग्रामीण भागातील स्त्रिया स्वतंत्रपणे पुरुषांसोबत पाऊल ठेवत स्वतःचे विश्व निर्माण करतील. यामुळे सोसायटीमध्ये स्त्रियांना आणखी मान दिला जाईल. 

Krushi Sakhi Yojana Benefits 

  • कृषी सखी योजनाचे फायदे भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या महिलांना होणार. 
  • केंद्र सरकारतर्फे या योजनेच्या अंतर्गत 90 हजार महिलांना सहभागी करण्यात येणार. 
  • या योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना शेती संबंधित विविध विषय व पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार. 
  • ज्या महिला या योजने अंतर्गत लाभार्थी असतील, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून प्रमाणपत्रसुद्धा वाटले जाणार. 
  • लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून 56 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
  • या योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून झालेल्या महिलांना रोजगारसुद्धा केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार. 
  • या योजनेसाठी 30 ऑगस्ट, 2023 रोजी कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने ग्रामीण विकास मंत्रालयसोबत सहकार्य करून MoU सही करण्यात आली. 
  • भारत देशामधील 12 राज्यांमधील ग्रामीण भागातील महिलांना सहभागी करून ट्रेनिंग दिली जाणार.

कृषी सखी योजना 2024 मधील पहिल्या टप्प्यात समावेश असणारे राज्य 

  • महाराष्ट्र 
  • कर्नाटक 
  • उत्तर प्रदेश 
  • गुजरात 
  • मध्य प्रदेश 
  • राजस्थान 
  • मेघालय 
  • उडीसा 
  • तामिळनाडू 
  • छत्तीसगढ 
  • झारखंड 
  • आंध्र प्रदेश

Krishi Sakhi Yojana Eligibility 

महिलांना अर्ज करण्यासाठी कृषी सखी योजनासाठी पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. 

  • या योजनेमध्ये अर्ज करणारी महिला भारताची मूळची स्थानिक रहिवासी असणे. 
  • सरकारने सुरु केली ही योजना फक्त ग्रामीण क्षेत्रातील महिलांसाठीच आहे. 
  • सरकारने प्रकाशित केलेल्या 12 राज्यांच्या यादीमधीलच महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. 
  • या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असणे. 
  • ग्रामीण भागातील गरीब व मध्यम वर्गातील स्त्रियांना लाभ दिला जाणार. 
  • महिलांना योजनेमध्ये अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे सोबतीला असणे.

Krishi Sakhi Yojana Required Documents 

सरकारने सुरु केलेल्या कार्यक्रमात महिलांना सहभागी होण्यासाठी कृषी सखी योजनामध्ये आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे ते खालीलप्रमाणे यादीनुसार जमा करणे. 

  • अर्जदार महिलेचे आधारकार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • रेशन कार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • बँक खात्याचे पासबुक आधार लिंक असलेले 

Krishi Sakhi Yojana Registration 

जसे की तुम्ही पाहिले नुकतेच जून 2024 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे पोर्टल किंवा वेबसाइट उघडण्यात आलेली नाही. या कारणामुळे महिला योजनासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करू शकत नाही.

परंतु जसे काही ऑनलाइन अर्ज संदर्भात अपडेट्स आल्यावर आम्ही Telegram व WhatsApp च्या माध्यमातून माहिती पुरवत असतो. यासाठी तुम्ही आम्हाला जॉईन करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्वरित माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. 

सरकारकडून ऑनलाइन रजिस्ट्रेशन जरी नसले चालू झाले, तरी तुम्ही ऑफलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. Krishi Sakhi Yojana Offline Registration करण्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. 

  • योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. 
  • कृषी विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर अधिकारीशी कृषी सखी योजनाची माहिती जाणून घ्या. 
  • त्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्याकडून संबंधित योजनेचे फॉर्म प्राप्त होईल. 
  • त्या फॉर्ममध्ये दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • तुमचा फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे झेरॉक्स करून सोबत जोडणे. 
  • त्याचसोबत तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो फॉर्ममध्ये चिकटवणे. 
  • सगळी काही प्रक्रिया करून झाल्यानंतर फॉर्म तपासून घेणे. 
  • त्यानंतर पुन्हा कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्याकडे फॉर्म व कागदपत्रे जमा करणे. 
  • जमा केल्यानंतर अधिकाऱ्याकडून तुम्हाला पावती दिली जाईल ती जपून ठेवणे. 
  • कार्यालयातील अधिकारीकडून तुमचे अर्ज तपासले जातील. 
  • तुम्ही या योजनेत पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येईल. 
  • अशा प्रकारे योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रकिया फॉलो करू शकता. 

निष्कर्ष 

आमच्या या लेखातून आम्ही तुम्हाला 2024 मध्ये सुरु केलेल्या Krishi Sakhi Yojana बद्दल संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली. यामध्ये योजना का सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु करण्यात आली? त्यांचे उद्दिष्टे काय आहे? त्यांचे फायदे महिलांना कसे घेता येणार? तसेच त्यामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश केला गेला आहे? यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांसाठी पात्रता अटी काय असणार? अर्ज करण्यासाठी महिलांना कोणत्या कागदपत्रांची जुळवणी करावी लागेल? त्यांची संपूर्ण यादी, महिला ऑफलाइन अर्ज कसे करू शकतात? आणि योजनेमधून लाभार्थ्यांना कोणती ट्रेनिंग दिली जाणार? अशा संपूर्ण प्रश्नांची माहिती सविस्तररित्या सांगण्यात आली आहे. 

तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात राहत आहात आणि या योजनेमध्ये सहभागी होऊन तुम्हाला सुद्धा स्वतःचे विश्व निर्माण करायचे असेल तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करा आणि याचा लाभ घ्या. 

आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा पाठवून त्यांना रोजगार मिळवण्यास मदत करा. 

FAQs

कृषि सखी योजना काय आहे? 

ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रियांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले जाणार. त्याचसोबत रोजगार उपलब्ध करून दिला जाणार.

कृषि सखी योजनेची सुरवात कधी करण्यात आली? 

या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 15 जून 2024 मध्ये करण्यात आली. 

Krushi Sakhi योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

या योजनेसाठी भारत देशामधील 12 राज्यातील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या महिला वर्ग पात्र आहेत.

पुढे वाचा: