Kisan Vikas Patra Yojana 2024: KVP अंतर्गत गुंतवणूक करून मिळवा, दुप्पट रिटर्न्स

Kisan Vikas Patra Yojana 2024: जर तुमची गुंतवणूक दुप्पट करायची असेल, तर किसान विकास पत्र योजना अंतर्गत KVP विकत घेऊन काही वर्षांमध्ये चांगली रक्कम कमवू शकता. भारतामधील कोणतेही नागरिक फक्त 1000 रुपयांपासून या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

किसान विकास पत्र योजना हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे, परंतु ही योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचली नाही. कारण योजनेच्या नावानुसार पाहिले तर शेतकऱ्यांसाठी योजना आहे असे वाटते. केंद्र सरकारतर्फे या योजनेची सुरुवात शेतकऱ्यांसाठीच सन 1988 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर ती भारतामधील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली.

तुम्ही प्रत्येक वर्षाला KVP विकत घेऊन भविष्यामध्ये दुप्पट उत्पन्न कमवू शकता, जेणेकरून तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करून प्रत्येक वर्षी चांगली रक्कम तुम्ही कमावू शकता आणि पुढे जाऊन इतर गुंतवणुकीसाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता.

आज आपल्या लेखाच्या माध्यमातून KVP म्हणजे किसान विकास पत्र योजना संबंधित संपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्याचसोबत किती रक्कमची गुंतवणूक करू शकता? कशा प्रकारे खाते उघडू शकता? कोणकोण योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी पात्र आहेत? आणि कशा प्रकारे योजनेमधून रक्कम दुप्पट होईल? हे सुद्धा जाणून घेणार आहोत.

Kisan Vikas Patra Yojana Details 2024

योजनेचे नावकिसान विकास पत्र (KVP) योजना
कधी सुरु झालीसन 01 एप्रिल, 1988 साली
विभागआर्थिक व्यवहार विभाग आणि वित्त मंत्रालय, भारत सरकार
रिलॉन्च वर्ष2014 रोजी
पात्रताभारतामधील सर्व जण
स्कीम प्रकारSmall Saving Scheme
गुंतवणूक रक्कमकमीतकमी 1 हजार रुपये
लॉकिंग कालावधीव्याज दरावर अवलंबून
एप्लिकेशन प्रकियाऑफलाईन

Kisan Vikas Patra Yojana in Marathi 

किसान विकास पत्र योजना ही एक स्मॉल बचत स्कीम आहे. याची सुरुवात 1988 साली करण्यात आली, परंतु काही आर्थिक धोका होऊ नये यासाठी ती 2011 दरम्यान बंद करण्यात आली होती. पण आता सध्याच्या भारत सरकारतर्फे 2014 रोजी त्यामध्ये बदल करून Ministry of Finance आणि Department of Economic Affairs यांच्या माध्यमातून KVP Scheme पुन्हा चालू करण्यात आली. 

या योजने अंतर्गत लाभार्थी 1000, 5000,10,000 आणि 50,000 रुपयांनुसार KVP विकत घेऊ शकतात. यामध्ये एक हजार पेक्षा कितीही रक्कम गुंतवणूक करण्याची मान्यता सरकारतर्फे देण्यात आलेली आहे.

भारत देशामधील गरीब ते श्रीमंत वर्गातील नागरिक आपल्या भविष्यातील आर्थिक जीवनाला सक्षम बनविण्यासाठी छोटी रकमेकची गुंतवणूक सुरु करू शकतात. योजनेच्या अंतर्गत किती कालावधी असतो? आणि व्याजदर किती लावला जातो? याबद्दल पुढे जाणून घेऊयात. 

Tenure and Interest under Kisan Vikas Patra Yojana 

केंद्र सरकारचे किसान विकास पत्र योजनाचे मुख्य उद्देश लाभार्थ्यांना भविष्यासाठी गुंतवलेल्या पैशांना दुप्पट करून देणे आहे. KVP योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी व्याजदर किती आहे? त्यावर अवलंबून आहे. त्यामध्ये व्याजदर जास्त असेल तर कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होतील आणि जर व्याजदर कमी असेल तर जास्त कालावधीमध्ये फायदे मिळेल. 

योजनाचे व्याजदर हे निश्चित केलेले नसून ते प्रत्येक तिमाहीला बदलत राहतात. 2024 च्या वर्षी KVP चा व्याजदर हा 7.5% इतका आहे. मागील काही वर्ष पहिले तर सरासरी व्याजदर हा 7% ते 8% च्या आतच असतो. गुंतवणूक केलेल्या व्याजदरानुसार पाहायला गेले तर 115 तर 125 महिन्यांच्या कालावधीमध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी लागतो. 

ज्या तिमाहीमध्ये तुम्ही गुंतवणूक करता त्यानुसारच व्याजदर लागू होतो. जर पुढच्या तिमाहीमध्ये व्याजदर वाढला असेल तर तो लागू करण्यात येत नाही. अशा वेळेला नवीन KVP विकत घेणे फायदेशीर ठरते. जेव्हापण तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा व्याजदरप्रमाणे गणना करू शकता. यामधून तुम्हाला भविष्यात किती रक्कम मिळेल? याची पडताळणी करू शकता. 

Type of Kisan Vikas Patra Certificates 

किसान विकास पत्र योजनाचे तीन प्रकार आहे, त्यानुसार गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारचा उपयोग करून लाभ घेऊ शकतात. 

  • Single Holder Type: यामध्ये एक व्यक्ती आपल्या नावाने KVP सर्टिफिकेट घेऊ शकतो किंवा अल्पवयीनसाठी तुमच्या नावाने विकत घेऊन जेव्हा ते 18 वर्ष पूर्ण करतील, तेव्हा त्यांच्या नावाने ती बदलेल.  
  • Joint Type – A: या प्रकारामध्ये तीन व्यक्ती एकत्र KVP खाते उघडून फायदा घेऊ शकतात. 
  • Joint Type – B: या प्रकारामध्ये गुंतवणूक केल्यानंतर भविष्यात कोणाच्या नावाने ती रक्कम जाईल याची निवड करू शकता.  

Kisan Vikas Patra Yojana Important Points

तुम्हाला किसान विकास पत्र योजना अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

  • KVP योजना अंतर्गत करणाऱ्या गुंतवणुकीच्या रक्कमेवर आणि त्यांच्यामधून मिळणाऱ्या व्याजदरावर कर (Tax) लावला जाणार आहे. 
  • बाकीच्या योजनेमध्ये 80C अंतर्गत टॅक्स फायदे दिले जातात, परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचे फायदे मिळत नाही. 
  • ज्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये KVP विकत घेतले होते, त्याचठिकाणी तुम्हाला रोख देणे गरजेचे आहे. 
  • त्याचप्रमाणे कार्यालयातील मिळणाऱ्या कागदपत्रांना तुमच्या जवळ सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. 
  • योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर 2 वर्ष 6 महिन्यांच्या आत रक्कम काढू शकत नाही. 
  • ज्या लाभार्थ्यांनी खाते उघडले आहेत, जर त्यांचे निधन झाल्यास खाते त्यांच्या वारसदार किंवा नॉमिनीला ट्रान्स्फर करण्यात येईल. 
  • त्याचप्रकारे जर कोर्टामधून ऑर्डर आली असेल, तर लाभार्थ्यांचे खाते कोर्टच्या नावाने ट्रान्स्फर केले जातील. 
  • जर तुम्ही 50 हजार पेक्षा जास्त रक्कमची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड जमा करणे आवश्यक आहे. 
  • तसेच जर तुम्ही 10 लाखांच्यावर रक्कम गुंतवत असाल, तर तुम्हाला ITR व इतर कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे.
  • 10 वर्ष 4 महिने पूर्ण झाल्यानंतर योजने अंतर्गत KVP चा कालावधी वाढवू शकत नाही. 

Kisan Vikas Patra Yojana Benefits

  • किसान विकास पत्र योजनाचे फायदे सामान्य नागरिक 1000 रुपयांपासून गुंतवणूक करून घेऊ शकतात. 
  • यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. 
  • 2024 च्या वर्षांमध्ये KVP Interest Rate 7.5% चालू आहे. 
  • एखादे Trust सुद्धा योजनेमध्ये गुंतवणूक करून लाभ मिळवू शकतात. 
  • योजने अंतर्गत गुंतवणुकीचा कालावधी 10 वर्षांमध्ये Mature होतो.
  • यामध्ये Premature Withdrawal सुविधा अडीच वर्षांनंतरची देण्यात आलेली आहे. 
  • गुंतवणुकीचे अडीच वर्ष पूर्ण झाल्यावर जो काही व्याजदर वाढीव रक्कम जमा झाली आहे ती काढू शकता. 
  • किसान विकास पत्र स्कीम अंतर्गत असणारे लाभार्थी KVP च्या आधारे कर्ज सुद्धा घेऊ शकतो. परंतु त्यांच्या गुंतवलेल्या कालावधीनुसार कर्ज देण्यात येते. 
  • पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये गुंतवणूक करताना रोख रक्कम, DD किंवा चेक या तिघांपैकी एकाचा वापर करू शकता. 

Kisan Vikas Patra Yojana Eligibility

किसान विकास पत्र योजनामध्ये खाते उघडण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही पात्रतेच्या अटी लागू करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये पात्र असल्यास अर्ज करून लाभ घेऊ शकता. 

  • KVP अंतर्गत खाते उघडणारे नागरिक भारताचे स्थानिक रहिवासी असणे. 
  • गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 
  • Hindu Undivided Family (HUF) आणि Non Resident Indian (NRI) कुटुंबातील नागरिक योजनेमध्ये खाते उघडण्यास पात्र नाही. 
  • 10 वर्ष पूर्ण झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडू शकतो.  
  • जे नागरिक Unsound Mind वर्गात येणारे म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी मानसिकरित्या तयार नसलेल्यांसाठी त्यांचे पालक खाते त्यांच्या नावाने उघडू शकतात. 

Kisan Vikas Patra Yojana Required Documents 

पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत KVP खाते उघडताना तुम्हाला किसान विकास पत्र योजनाची आवश्यक कागदपत्रे खाली दिल्याप्रमाणे जमा करणे महत्त्वाचे आहे. 

  • KVP एप्लिकेशन फॉर्म 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो (जर जॉईंट असेल तर 3 फोटो लागतील) 
  • खातेधारकांचे पॅनकार्ड व आधारकार्ड 
  • राहत्या ठिकाणाचा पत्ता 
  • कायमचा पत्ता 
  • आयडी प्रूफ (पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स, मतदान कार्ड, मनरेगा जॉबकार्ड) 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 
  • नॉमिनीचे पुरावे व माहिती

Kisan Vikas Patra Yojana Registration

किसान विकास पत्र योजना अंतर्गत खाते उघण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकियांना फॉलो करणे आवश्यक आहे. 

  • तुम्हाला KVP Scheme अंतर्गत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीय बँकेमध्ये जावे लागेल. 
  • त्यानंतर पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत गेल्यानंतर तुम्ही योजना संबधित पूर्ण माहिती देऊन फॉर्म घेऊ शकता. 
  • अथवा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन Application Form डाउनलोड करून प्रिंट करू शकता. 
  • तुमच्या जवळ किसान विकास पत्र योजनाचा फॉर्म प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण माहिती वाचून घ्या. 
  • फॉर्म वाचून झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेल्या संपूर्ण प्रश्नांची माहिती भरा. 
  • त्यानंतर फॉर्ममध्ये तुम्हाला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली असेल.  
  • त्या माहितीनुसार कागदपत्रांची जुळवणी करून घ्या आणि झेरॉक्स काढून फॉर्मसोबत जोडा. 
  • बँकेतील किंवा पोस्ट ऑफिसमधील शाखेमधून Pay Slip घ्या व त्यावरती तुमची माहिती व रक्कम किती आहे? त्याची नोंद करा. 
  • पुढे तो फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेमध्ये जाऊन फॉर्म व पे स्लिप जमा करा. 
  • फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम तुम्ही जी काही ठरवली असेल ती भरा. 
  • गुंतवणूक रक्कम भरल्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्यांकडून पावती दिली जाईल ती सांभाळून ठेवा. 
  • अशा पद्धतीने तुम्ही KVP Scheme अंतर्गत खाते उघडून गुंतवणूक करू शकता. 

निष्कर्ष 

या प्रकारे आम्ही Kisan Vikas Patra Yojana संदर्भात लेखातून संपूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केला. ज्यामध्ये योजना काय आहे? त्यामागचे उद्देश, मिळणारे लाभ, गुंतवणूक व्याजदर, मिळताना लॉकिंग कालावधी, गुंतवण्याची रक्कम, काही महत्त्वाचे मुद्दे, त्यामध्ये असणारे प्रकार, त्याची कागदपत्र व खाते उघडण्याची प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. 

भविष्याचा विचार करता KVP गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते. तर तुम्ही सुद्धा खाते उघडून भविष्याला उज्ज्वल बनवू शकता.

Read More: