Kisan Credit Card Yojana 2024: शेतकऱ्यांना फक्त 4% व्याज दरात 3 लाख लोन, करा ऑनलाइन अर्ज

Kisan Credit Card Yojana 2024: शेतकऱ्यांना सहजरित्या लोन उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC) केंद्र सरकारने सुरु केली.या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे लाभार्थी शेतकऱ्यांना लोन घेतल्यावर व्याजाची सूट दिली जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामधील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सतत पैश्यांची गरज लागते, यासाठी ते नेहमी कुठे न कुठे तरी जास्त व्याज दराने कर्ज घेत असतात. शेतकऱ्यांच्या या समस्यांना दूर करण्यासाठी आणि वेळोवेळी शेती चांगली होऊन उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकरने रिजर्व बँक ऑफ इंडियासोबत मिळून किसान क्रेडिट कार्ड लोनची सुरवात केली. जेणेकरून शेतकरी वर्गाला विविध शेतीच्या कामांसाठी लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळावी. 

जर तुम्ही सुद्धा शेतकरी आहात आणि तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊन लाभ घेयचा विचार करत असाल तर आमच्या या लेखातून तुम्हाला सविस्तर माहिती प्राप्त करण्यास मदत होईल. यामध्ये आम्ही KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? कधी सुरु करण्यात आली? चालू करण्यामागचे उद्देश काय होते? यातून कोणकोणते फायदे मिळणार? यामध्ये पात्र कोण असणार? अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? आणि अर्ज प्रकिया कशाप्रकारे करू शकतो? अशी सविस्तर माहिती या लेखातून बघायला मिळेल. तर तुम्ही शेवटपर्यंत हा लेख वाचा.

Kisan Credit Card Yojana in Marathi 

KCC कार्ड म्हणजेच एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहे, जसे की बँकेतून भेटणारे क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डसारखे. जर तुम्ही बँकेतून लोन घेयला घेलात तर एकसाथ मोठी रक्कम घ्यावी लागते, त्यासोबत प्रत्येकवेळी विविध कागदपत्रे द्यावे लागते. परंतु शेतकऱ्यांना या योजनेतून मिळणाऱ्या कार्डमधून कोणतेही कागदपत्रे न दाखवता सोप्या पद्धतीने ATM मध्ये जाऊन हवे तेवढे पैसे काढू शकतो.  

केंद्र सरकारतर्फे किसान क्रेडिट कार्ड योजनाची सुरवात वर्ष 1998 रोजी करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून शेती व संबंधित कार्यासाठी जसे मत्स्यपालन, मुर्गी पालन, डेरी व इतर अशाप्रकारचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी व्याज दरात शॉर्ट टर्म लोन दिले जाते. 

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन 4% व्याज दरात उपलब्ध करून दिले जाते. केंद्र सरकार विविध बँकेच्या माध्यमातून लोन उपलब्ध करून देते, यामध्ये बँक 7% वार्षिक व्याज दर लावते. परंतु शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला एका वर्षाच्या आत वेळेवर भरल्यास बँकेतर्फे 3% व्याजदरात सूट दिली जाते. 

किसान क्रेडिट कार्ड मराठी माहिती

योजनेचे नावKisan Credit Card Yojana (KCC)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कधी झालीवर्ष 1998 साली
कोणी सुरु केलीकेंद्र सरकारने
विभाग रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI)
उद्देशदेशभरातील शेतकऱ्यांना कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देणे
लाभार्थीदेशामधील शेतकरी वर्गतील नागरिक
लाभकमी व्याज दरात 3 लाख रुपयांपर्यंत लोन
अर्ज पद्धतऑनलाइन व ऑफलाइन

Kisan Credit Card Scheme Aim 

केंद्र सरकारचे किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश देशामधील शेतकरी वर्गातील नागरिकांना सहज व सोप्या पद्धतीने कमी व्याज दरात लोन उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून देशामधील शेतकरी वर्गाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे न जाता, योग्यरित्या शेतीची कामे चालू ठेवण्यात मदत मिळेल. 

शेतकऱ्यांना सतत शेतीच्या विविध कामांसाठी पैश्यांची गरज भासत असते. काही प्रमाणात सहजरित्या बँकेतून लोन मिळत नाही आणि मिळाले तर व्याज दर जास्त लावला. यामध्ये शेतकऱ्याचा वेळ व पैसा दोन्ही जातो. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली.

Kisan Credit Card Scheme Benefits

  • केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनाचे फायदे देशभरातील शेतकऱ्यांना घेता येतो. 
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार बँकेसोबत करार करून 2% पर्यंतची सबसिडीच्यामार्फत व्याज पुरविते. 
  • देशभरातील शेतकरी तसेच मत्स्यपालन, डेरी आणि कुकुटपालन करणारे नागरिक यामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतात. 
  • लाभार्थी  ATM मधून KCC कार्ड वापरून हवी तेवढी रक्कम काढू शकतात. 
  • शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरण्यासाठी एका वर्षाचा कालावधी दिला जातो. 
  • वेळेनुसार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केल्यास विविध प्रकारचे फायदे बँकेतर्फे दिले जाते. 
  • KCC कार्डधारकांना 50 हजार रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा सुरक्षासुद्धा दिले जातो. 

Kisan Credit Card Yojana Eligibility 

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनासाठी पात्र असणे आवश्यक आहे, यासाठी खालीलप्रमाणे पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. 

  • KCC योजनेचं अंतर्गत अर्ज करणारा नागरिक भारताचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  • सरकारतर्फे देण्यात येणारी योजना ही फक्त शेतकरी व शेती संबंधित उपक्रमातील नागरिकांसाठीच आहे. 
  • या योजनेत अर्ज करण्याऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे. 
  • यामध्ये काही जण बोलता 75 वयोगटापर्यंतची लिमिट आहे, परंतु 60 वयाच्या वरच्या नागरिकांना कमीत कमी 2 जण जामीनदार असणे. 
  • या योजनेत भाड्याने शेती करण्यास जमीन घेतलेलेसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.

Kisan Credit Card Yojana Required Documents 

शेतकऱ्यांना अर्ज करताना किसान क्रेडिट कार्ड योजनाचे आवश्यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहेत, यासाठी खालीलप्रमाणे यादी दिलेली आहे, त्यानुसार कागदपत्रे जमा करून घेणे. 

  • ऑफलाइन अर्जासाठी एप्लिकेशन फॉर्म 
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • पॅनकार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला 
  • वार्षिक उत्पन्न दाखला 
  • जन्म दाखला 
  • शेती संबंधित कागदपत्रे 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • ई-मेल आयडी 
  • मोबाईल नंबर 
  • ओळखपत्र (वोटर आयडी किंवा पासपोर्ट)

Kisan Credit Card Yojana Online Apply 

  • तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनामध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या बँकेच्या वेबसाइटला उघडावे लागेल. 
  • त्या बँकेच्या वेबसाइटमधील मेनूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Kisan Credit Card चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुम्ही KCC Scheme साठी डिझाईन केलेल्या नवीन पेजमध्ये जातील. 
  • त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला योजनाचे फॉर्म स्क्रीनवर उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला विविध प्रकराची माहिती विचारली असेल ती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचे आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सगळ काही नीट तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर बँकेच्या वेबसाइटमध्ये तुम्हाला एप्लिकेशन नंबर प्राप्त होईल तो जपून ठेवणे. 
  • त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून तुमचे फॉर्म तपासले जातील. 
  • तुम्ही या योजनेसाठी पात्र असतील तर बँकेकडून 3 ते 4 दिवसांमध्ये वेरिफिकेशनसाठी कॉल येईल. 
  • बँकेच्या अधिकाऱ्याकडून वेरीफिकेशन यशस्वीरित्या पार पडल्यावर तुम्हाला कार्ड देण्यात येईल. 
  • अशाप्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्जासाठी प्रकिया करून लाभ घेऊ शकता.

Kisan Credit Card Yojana Offline Registration 

  • किसान क्रेडिट कार्ड योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळील बँकेतील ब्रांचमध्ये जायचे आहे. 
  • बँकेत गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला KCC योजना संबंधित माहिती देयची आहे.
  • त्यानंतर बँकेतील अधिकारी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड फॉर्म देतील. 
  • त्या फॉर्ममध्ये असलेली माहिती ध्यानपूर्वक भरून घेणे. फॉर्म भरताना काही समस्या असतील तर अधिकारीची मदत घेत फॉर्म अचूक भरणे. 
  • भरून पूर्णपणे भरून झाल्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो चिटकविणे. 
  • त्यानंतर आवश्यक असलेले कागदपत्रांची झेरॉक्स काढून फॉर्म सोबत जोडून घेणे. 
  • शेवटी फॉर्म व कागदपत्रे बँकेतील अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करणे. 
  • फॉर्म जमा केल्यानंतर अधिकारी तुम्हाला एप्लिकेशन नंबर देईल तो सांभाळून ठेवणे. 
  • बँकेतील अधिकारी तुमचे अर्ज तपासातील नंतर तुम्ही पात्र असाल तर कॉल करतील. 
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकता. 

निष्कर्ष 

आमच्या या लेखामधून Kisan Credit Card Yojana संबंधित संपूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगितली. यामध्ये आम्ही योजनाचे महत्व, त्यांचे उद्देश, त्यांचे फायदे, त्यासाठी पात्रता अटी, लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याच्या प्रकिया याबद्दल मार्गदर्शन केले. 

तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि तुम्हाला कर्ज हवे असतील तर सरकारने सुरु केलेल्या योजनाचे लाभ घ्या. आम्ही सांगितलेल्या योजनेच्या अर्जाच्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करा आणि KCC कार्ड मिळवा. 

आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त आणि फायदेशीर वाटला असेल तर तुमच्या शेतकरी वर्गातील बांधवांना पाठवून त्यांनाही या योजनेचा फायदा घेण्यास प्रोत्साहन द्या. 

अशाच प्रकारच्या शेती संबंधित व इतर योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता किंवा आमच्या WhatsApp/Telegram ग्रुपया जॉईन करून सरकारचे नवीन अपडेट्स मिळवू शकता.

FAQs

किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत?

कार्ड धारकांना कमी व्याज दरात 3 लाखांपर्यंचे लोन वापरण्यास मिळते.

बँकेत केसीसी कर्ज म्हणजे काय?

बँकेत केसीसी कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड लोन असा अर्थ आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांचे कर्ज उपलब्ध केले जाते. 

KCC कर्ज न भरल्यास काय होईल?

कर्ज न भरल्यास तुमच्यावर चक्रवाढ व्याज लागत जाणार. 

किसान क्रेडिट कार्डवरून पैसे काढता येतात का?

होय, तुम्ही ATM मध्ये जाऊन पैसे काढू शकता. 

किसान क्रेडिट कार्डवर मला किती कर्ज मिळू शकेल?

या योजनेत अर्ज करून मिळालेल्या कार्डमधून 3 लाख कर्ज मिळू शकते. 

KCC योजने अंतर्गत 3% व्याज सवलतीसाठी कोण पात्र आहे?

केसीसी कार्ड धारकांनी एका वर्षात वेळावेळी हफ्ता पूर्ण भरल्यानंतर 3% व्याजाची सवलत मिळते. 

पुढे वाचा: