Janani Suraksha Yojana Eligibility: जननी सुरक्षा योजनासाठी भारत देशामधील गरोदर महिला पात्र लाभार्थी आहेत, परंतु त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीनुसार पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या लेखामध्ये खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिलेली आहे ती जाणून घ्या आणि अर्ज करा.
या योजनाच्या माध्यमातून भारत देशामधील पात्र असलेल्या लाभार्थींना केंद्र सरकारच्यामार्फत 6,000 रुपये आर्थिक स्वरूपात दिले जातात. या योजनेची सुरुवात केंद्र शासनाने 12 एप्रिल, 2005 रोजी केली होती आणि या योजनेचा मुख्य उद्देश हा गभर्वती महिलांना संस्थात्मक डिलिव्हरी उपचार घेण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणे हा आहे.
जननी सुरक्षा योजनामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत? त्याचसोबत वयाची किती मर्यादा आहे? कोणत्या वर्गातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे? आणि किती बाळांच्या जन्मासाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जननी सुरक्षा योजनासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?
- जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत देशामधील स्थानिक रहिवासी महिला पात्र आहे.
- Janani Suraksha Yojana ही फक्त गर्भवती महिलांसाठी आहे.
- त्याचप्रमाणे भारत देशामधील ग्रामीण व शहरी क्षेत्रात राहत असलेल्या गर्भवती महिला या योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी गरोदर महिलेचे कमीत कमी 19 वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
- ज्या महिलांकडे Below Poverty Line (BPL) कार्ड असेल तर ते देखील योजनेमधून लाभ घेऊ शकतात.
- देशभरातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) वर्गामधील गर्भवती महिला योजनेसाठी पात्र आहेत.
- योजनेमधून DBT द्वारे आर्थिक मदत थेट बँकेत पाठविली जाते, यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे आधारकार्ड असणे आणि ते बँक खात्यासोबत लिंक असणे बंधनकारक आहे.
- गर्भवती महिलांना फक्त 2 बाळांसाठी योजनेमधून लाभ देण्यात येतो.
- अर्ज करताना महिलेजवळ फोटो, बीपीएल कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, डिलिव्हरी प्रमाणपत्र आणि बँकेचा पासबुक ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- तसेच ज्या महिला LPS म्हणजे कमी विकसित राज्यामध्ये येत असतील, तर त्या सर्व स्त्रिया योजनेमधून आर्थिक मदत घेऊ शकतात.
कोणकोणते राज्य LPS अंतर्गत येतात?
- उत्तर प्रदेश
- बिहार
- राजस्थान
- झारखंड
- मध्यप्रदेश
- ओडिसा
- उत्तराखंड
- आसाम
- छत्तीसगढ
- जम्मू व काश्मीर
Read More: