Janani Suraksha Yojana 2024: केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजना (JSY) भारत देशामधील गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी सुरु केली आहे. भारत सरकार या योजनेमधून देशामधील गरोदर महिलांना ६००० रुपये आर्थिक लाभ प्रदान करतात.
आज आपल्या लेखातून सुरक्षा जननी योजना संबंधित माहिती सांगणार आहोत. जननी म्हणजे आई, मुळात या योजनेमध्ये आईला सुरक्षा प्रदान करणे. यामध्ये गरोदर महिलांना संस्थात्मक डिलिव्हरी करण्यास प्रोत्सहन दिले जाते. संस्थात्मक डिलिव्हरी म्हणजेच हॉस्पिटलमध्ये योग्यरीत्या उपचार घेऊन सुरक्षित डिलिव्हरी करणे.
आपल्या देशामध्ये काही ग्रामीण भागांमध्ये आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्यामुळे व मेडिकल सुरक्षा नसल्यामुळे घरीच डिलिव्हरी केली जाते. ज्यामुळे गरोदर महिलांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि काही वेळेला महिला किंवा बाळाचे मृत्यू सुद्धा होते.
केंद्र सरकारचे या योजनेच्या माध्यमातून मातेचे मृत्यू दर (MMR) व बाळाचे मृत्यू दर (IMR) कमी करणे हे उद्देश आहेत. ज्यामध्ये सरकार योजनेच्यामार्फत महिलांना आर्थिक मदत पुरवून संस्थात्मक डिलिव्हरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
JSY योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे प्रोत्साहन दिले जाते? त्याचसोबत योजना काय आहे? त्यांचे मुख्य उद्देश काय? यामधून कोणते फायदे दिले जाते? यासाठी पात्रता काय असणार? अर्ज करताना महिलांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? कशा पद्धतीने महिला वर्ग अर्ज करू शकतात? आणि अर्ज केल्यानंतर अर्जाचे स्टेटस कसे तपासायचे? याबद्दल सविस्तारित्या सांगितले आहेत तर हा लेख शेवटपर्यंत पहा.
Janani Suraksha Yojana in Marathi
केंद्र सरकारतर्फे जननी सुरक्षा योजनाची सुरुवात 12 एप्रिल 2005 रोजी करण्यात आले. या योजनेमधून विशेष करून Low Performing States (LPS) लक्ष केंद्रित केले जाते. त्याचसोबत भारत देशामधील प्रत्येक राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये योजनेची अंमलबजावणी केली जाते.
Ministry of Health and Family Welfare च्या माध्यमातून JSY योजना राबिवली जाते. गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते. देशभरातील गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना National Health Mission अंतर्गत ६००० रुपये आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. त्याचसोबत लहान बाळाच्या सुरक्षेसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिले जाते.
National Maternity Benefits Scheme (NMBS) Background
सर्वात प्रथम 15 ऑगस्ट 1995 साली National Maternity Benefit Scheme (NMBS) च्या नावाने सुरु करण्यात आले होते. ही स्कीम National Social Assistance Programme (NSAP) एक भाग होता. केंद्र सरकारतर्फे NMBS स्कीममध्ये सुधार करून त्यांचे नाव जननी सुरक्षा योजना करण्यात आले. त्याचसोबत ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ट्रान्स्फर करून २००१-०२ साली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे काम सोपविण्यात आले.
National Maternity Benefit Scheme अंतर्गत गरिबी रेषा खालील १९ वर्षांवरील गर्भवती महिलांना ५०० रुपये रोख रक्कम दिली जायची. संस्थात्मक डिलिव्हरी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत फक्त बाळांच्या पहिल्या व दुसऱ्या लाईव्ह बर्थसाठी प्रदान केली जात होती.
Janani Suraksha Yojana 2024 Highlights
योजनाचे नाव | जननी सुरक्षा योजना (JSY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉन्च दिनांक | १२ एप्रिल, २००५ |
लॉन्च केली | केंद्र सरकारने |
विभाग | आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय |
उद्देश | गर्भवती महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करून संस्थात्मक डिलिव्हरी करण्यास प्रवृत्त करणे |
लाभार्थी | देशामधील गर्भवती महिला |
लाभ | ६००० रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | nhm.gov.in |
Janani Suraksha Yojana Objectives
केंद्र सरकारचे जननी सुरक्षा योजना मागचे मुख्य उद्देश दारिद्र रेषे खाली असलेल्या गरोदर महिलांना आर्थिक मदत करणे आहे. त्याचसोबत देशामध्ये गरिबीमुळे होणाऱ्या माता व बाल मृत्यू दराला कमी करणे. या योजनेमधून केंद्र शासनाचे मुख्य लक्ष्य म्हणजे गरोदर महिलांना Institutional Births साठी प्रोत्साहित करणे.
आपल्या देशामध्ये गर्भवती महिलांच्या विविध समस्यांमुळे दरवर्षी जवळपास ५६ हजार पेक्षा जास्त स्त्रियांना आपलं जीव गमवावे लागते. त्याचप्रमाणे यामध्ये लहान बाळांचा आकडा एका वर्षात १३ लाखाहून अधिक आहे. यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय हेल्थ मिशन अंतर्गत महिलांना व बाळांना सुरक्षित ठेवण्याचे काम हाती घेतले आहेत.
Janani Suraksha Yojana Benefits
- जननी सुरक्षा योजनाचे फायदे देशभरातील गर्भवती महिलाना दिला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून डिलिव्हरी व पोस्ट डिलिव्हरीसाठी केंद्र शासनातर्फे आर्थिक मदत केली जाते.
- गर्भवती महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ६००० रुपये पाठविले जातात.
- देशामधील महिला व बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन सुरु केले.
- JSY योजनामधून ग्रामीण व शहरी भागातील महिलाना लाभ दिला जातो.
- ही योजना पूर्णपणे केंद्र सरकारतर्फे स्पॉन्सर्ड केली जाते.
- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांनी सुरु केली होती.
- योजनेच्या माध्यमातून जागोजागी प्रोत्साहन देण्यासाठी ASHA म्हणजेच Accredited Social Health Activist याना पाठविले जाते.
- त्याचसोबत गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये आणणे व बाळाचे जन्म झाल्यानंतर बीसीजी वॅक्सीन लावायचे काम ASHA वर्कर करतात.
- या योजनेमधून कमी विकसित राज्य जसे बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम, राजस्थान, ओडिसा, जम्मू व काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यामधील सर्व गरीब गर्भवती महिलांवरती विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
- यामध्ये जास्त विकसित असलेल्या राज्यामधील BPL कार्ड धारकांना आणि SC/ST वर्गातील महिलांना लाभ दिला जातो.
Janani Suraksha Yojana Eligibility
गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनामध्ये पात्र असण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्रता असणे आवश्यक आहे.
- JSY अंतर्गत अर्ज करणारी महिला भारत देशाची मूळची स्थानिक रहिवासी असणे.
- या योजनेमध्ये फक्त गर्भवती महिला सहभागी होऊ शकतात.
- गरोदर महिलेचे वय १९ वर्षापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.
- महिलांना फक्त दोन बाळांच्या जन्मासाठी योजनाचा लाभ देण्यास परवानगी आहे.
- देशामधील Low Performing States (LPS) मधील सर्व महिला योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- High Performing States (HPS) मधील गरोदर महिलेकडे BPL कार्ड असणे किंवाअनुसूचित जाती व जमाती वर्गामधील असल्यास सहभागी होऊ शकतात.
Janani Suraksha Yojana Required Document
अर्ज करताना महिलांना जननी सुरक्षा योजनाची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, याची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे.
- गर्भवती महिलेचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक पासबुकचे पहिले पान
- BPL रेशन कार्ड
- जननी सुरक्षा कार्ड
- हॉस्पिटमधील डिलिव्हरी सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
Janani Suraksha Yojana Online Registration
महिलांना जननी सुरक्षा योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागणार.
- महिलेला जननी सुरक्षा योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या सामोरे होम पेज उघडले जातील.
- त्या होमपेजमध्ये तुम्हाला Janani Suraksha Yojana Form चा पर्याय दिसेल तो निवडायचा.
- पर्याय निवडल्यानंतर तुमचं सामोरे योजनेचा फॉर्म उघडा होईल.
- त्या फॉर्मला तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल.
- फॉर्म डाउनलोड केल्यानंतर प्रिंट करून घेणे.
- प्रिंट झाल्यानंतर त्या फॉर्ममध्ये असलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे.
- त्यानंतर योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडणे.
- संपूर्ण फॉर्म व कागदपत्रे व्यवस्थितरित्या तपासून खात्री करून घेणे.
- भरलेला फॉर्म व सर्व डोकमेंट्स तुमच्या क्षेत्रा जवळील महिला आरोग्य केंद्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन जमा करणे.
- अशा पद्धतीने तुम्ही योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकता.
Janani Suraksha Yojana Status Check
- जननी सुरक्षा योजनाचा स्टेटस पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर होम पेज उघडून येईल.
- त्यामध्ये तुम्हाला अर्जाचे स्थिती पाहण्याचे पर्याय दिसेलत्या पर्यायाला निवडून पुढे जाणे.
- त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्जाच्या वेळेला मिळालेले रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.
- रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सर्च बटनावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजने संबंधित अर्जाची स्थिती उघडून येईल.
- अशा प्रकारे तुम्ही स्टेटस तापसण्यासाठी प्रक्रिया करू शकता.
निष्कर्ष
अशा प्रकारे Janani Suraksha Yojana संबंधित संपूर्ण माहिती आम्ही या लेखातून दिली. ज्यामध्ये योजनाची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? कोणत्या सरकारने केली? ती कोणासाठी सुरु केली? योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये कोणती होती? यासाठी कोणते मिशन राबिविण्यात आले? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? यासाठी कोणते पोर्टल तयार करण्यात आले? महिलांना कोणत्या प्रकारचे फायदे दिले जाते? त्यांना सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या लागू करण्यात आल्या? सहभागी होताना महिलांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडणार? महिलांना अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया पार पडावे लागणार? आणि अर्ज केल्यानंतर स्टेटस पाहण्यासाठी काय करावे लागणार? अशा संपूर्ण माहितीबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले.
जर तुमच्या कुटुंबात गर्भवती महिला असेल तर या योजनेचा लाभ घेण्यास तुम्ही सुद्धा प्रोत्साहन द्या. जेणेकरून त्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक लाभ दिला जाईल. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमचा हा आर्टिकल त्यांना पाठवा.
अशाच संपूर्ण योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून पहिले अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
जननी सुरक्षा योजनेचे पात्र लाभार्थी कोण असतात?
या योजनेमध्ये कमी विकसित राज्यामधील सर्व गरोदर महिला पात्र लाभार्थी असतात.
जननी सुरक्षा योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
होय, या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करून आरोग्य केंद्रामध्ये जमा करू शकता.
गरोदर महिलांना 6000 रुपये कसे मिळणार?
गरोदर महिलांना जननी सुरक्षा योजनेमध्ये अर्ज करून 6000 रुपये मिळणार.
पुढे वाचा: