Gramin Awas Yojana: कामगारांना घर बनविण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये, आताच करा अर्ज

Gramin Awas Yojana: भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रातील कामगार नागरिकांना घरासाठी आर्थिक लाभ मिळावा यासाठी आवास योजनाची सुरुवात करण्यात आली. जे कामगार या योजनेमध्ये पात्र असणार आहेत, त्यांना योजनेच्या माध्यमातून 01 लाख, 20 हजार रुपये रक्कम आर्थिक स्वरूपात देण्यात येते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

या उपक्रमामध्ये पात्र असलेल्या लाभार्थी व्यक्तींना Sauchalay Yojana अंतर्गत सरकारच्या माध्यमातून 12000 रुपये देखील सुद्धा देण्यात येतात. तसेच 10 हजार रुपये सुद्धा अवजारे घेण्यासाठी देण्यात येतात. जे नागरिक ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असून ते कामगार असतील तर आवास योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

Read More: PM Awas Yojana New Gramin List Check

ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन कसे करायचे? त्यासाठी कोण पात्र असणार? तसेच अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? अशा सर्व गोष्टी आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहे तर शेवट पर्यंत लेख नीट पहा.

Gramin Awas Yojana काय आहे?

ग्रामीण आवास योजनाची सुरुवात केंद्र सरकारने 01 एप्रिल, 2016 रोजी केली होती. ज्याच्या माध्यमातून भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या कुटुंबाला स्वतःचे घर प्राप्त करण्यासाठी 1,20,000 रुपये रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्यात येते. ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश व डोंगराळ भागामध्ये राहत असलेल्या कुटुंबाला सरकारच्यामार्फत 1 लाख 30 हजार रुपये रक्कम देण्यात येते.

Read More: पीएम आवास योजनासाठी सरकारने दिली मोठी बातमी, मध्यम वर्गाला होणार फायदा

Gramin Awas Yojana साठी कोण पात्र आहेत?

ग्रामीण आवास योजनामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे कामगार दारिद्रय रेषेखाली असून त्यांची नावे सामाजिक आर्थिक व जाती जनगणना 2011 च्या यादीमध्ये असावे.

तसेच कामगारांना योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी E-Shram Card असणे अनिवार्य आहे. ग्रामीण क्षेत्रामधील नागरिकांना योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे घर नसावे. योजनेमध्ये अर्ज करताना कामगारांना आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करावी लागणार.

Read More: PM Awas Yojana 2024: आवास योजनातून बनवा आपले पक्के घर, घ्या असा लाभ

Gramin Awas Yojana ची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

कामगारांना ग्रामीण आवास योजनामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार जमा करावी लागणार आहेत.

  • बँकेचे पासबुक
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • वयाचे पुरावे
  • मोबाईल नंबर
  • ई श्रम कार्ड
  • स्थानिक रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला

Gramin Awas Yojana मध्ये अर्ज कसे करायचे?

कामगार वर्ग ग्रामीण आवास योजना अंतर्गत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ज्यामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी नागरिकांना सरकारने सुरु केलेल्या PMAY Urban च्या वेबसाइटमध्ये जावे लागेल.

तसेच ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही ते नागरिक सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकतात. फक्त ऑफलाईन रजिस्ट्रेशन करताना योजनेसाठी लागणारी कागदपत्रे झेरॉक्स करून घेऊन जाणे.