पीएम आवास योजनासाठी सरकारने दिली मोठी बातमी, मध्यम वर्गाला होणार फायदा

PM Awas Yojana Big Updates: मंत्रालयाकडून ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील कुटुंबांना पीएम आवास योजना अंतर्गत 18 नोव्हेंबरपर्यंत जवळपास 1.18 कोटी घरांच्या सुविधासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामधील महागाई सर्वत्र वाढत चालली आहे, त्यामध्ये बेरोजगारीचे दर देखील वाढत चालले आहे. अशामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजनाची सुरुवात केली.

Read More: PM Awas Yojana New Gramin List Check 2024: असे चेक करा, पीएम आवास योजना ग्रामीणची नवीन लिस्ट

या योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील ग्रामीण व शहरी भागामध्ये राहत असलेल्या गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारच्यामार्फत सध्या पीएम आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.

योजनेसाठी मिळालेल्या या मंजुरीमुळे भारत देशामधील मध्यम वर्गातील कुटुंबाला त्यांचे स्वतःचे घर मिळण्यास मदत होईल. राज्यसभेमध्ये झालेल्या बैठकीनुसार आतापर्यंत 88 लाख पेक्षा जास्त घरे शहरी भागामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Read More: PM Awas Yojana 2024: आवास योजनातून बनवा आपले पक्के घर, घ्या असा लाभ

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे PMAY-U साठी 18 नोव्हेंबर, 2024 पर्यंत 118.64 लाख घरांची मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये आतापर्यंत शहरी भागातील नागरिकांना 88.02 लाख योजनेच्या अंतर्गत घरे देण्यात आलेली आहे.

राहिलेली घरे अजूनपर्यंत बांधकाम टप्प्यामध्ये असून पूर्ण करायचे चालू आहे, ज्यामध्ये मंत्रालयाकडून PMAY-U च्या पहिल्या टप्प्यामधून अनुभव घेऊन हौसिंग फॉर ऑल मिशन अंतर्गत PMAY-U 2.0 ची सुरुवात करण्यात आली. या 2.0 अंतर्गत 29 राज्यांसोबत केंद्रशासित प्रदेशांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.

Read More: PM Awas Yojana List 2024: पंतप्रधान आवास योजनेची यादी कशी तपासायची?

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना विविध प्रकारे फायदा करून देण्यासाठी मंत्रालयाकडून चार घटक समावेश करण्यात आले. ज्यामध्ये Beneficiary Led Construction (BLC), Interest Subsidy Scheme (ISS), Affordable Housing in Partnership (AHP) आणि Affordable Rental Housing (ARH) या चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.