Gas Cylinder Yojana Online Registration 2024: फ्री गॅस सिलेंडरसाठी सुरु झाले ऑनलाईन रजिस्ट्रेशन, असे करा अर्ज

Gas Cylinder Yojana Online Registration 2024: काही वेळासाठी फ्री गॅस सिलेंडर योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन केंद्र सरकारच्या माध्यमातून PMUY पोर्टल द्वारे सुरु करण्यात आलेले आहे. अजून पर्यंत तुम्ही Pradhan Mantri Ujjawala Yojana अंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेतला नसेल तर घरी बसल्या आताच ऑनलाईन अर्ज करा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 चालू केले आहे. ज्याच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या नागरिकांना भारत सरकार मोफत एक गॅस सिलेंडर, फ्रीमध्ये गॅस शेगडी आणि प्रत्येक महिन्याला ३०० रुपये सबसिडी बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. 

तुम्ही गॅस सिलेंडर योजनासाठी अर्ज केले नसतील, तर आजच्या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप अर्ज प्रकिया पाहायला मिळेल. त्याचसोबत कशा प्रकारे तुम्ही अर्जाचा फॉर्म भरू शकता? कोणत्या पद्धतीने फ्री सिलेंडर प्राप्त करू शकता? आणि प्रत्येक महिन्याला योजनेमधून सबसिडी मिळण्यासाठी कसा फॉर्म भरायचा? हे देखील शेवटपर्यंत लेखातून जाऊन घेण्यास मिळेल.

Gas Cylinder Yojana Details 2024

योजनेचे नावप्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY)
रजिस्ट्रेशन प्रकियाऑनलाईन/ऑफलाईन
डिपार्टमेंटMinistry of Petroleum and Natural Gas, GoI
लॉन्च केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
लॉन्च केव्हा केली01 मे, 2016 मध्ये
पात्रगरीब वर्गातील कुटुंब
लाभफ्री सिलेंडर व गॅस
सबसिडी300 रुपये
हेल्पलाईन संपर्क1800-266-6696

Gas Cylinder Yojana ची पात्रता काय आहे? 

  • गॅस सिलेंडर योजनासाठी अर्ज करणारी महिला भारताची स्थायिक रहिवासी असणे. 
  • त्या महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजेत. 
  • अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे LPG कनेक्शन नसावे. 
  • देशामधील मागासवर्गीय व दारिद्रय रेषेखालील असलेल्या महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात. 
  • त्याचप्रमाणे SECC 2011 च्या जनगणनामध्ये समावेश असलेल्या कुटुंबातील महिला योजने अंतर्गत पात्र आहेत. 
  • भारतातील अनुसूचित जाती व जमाती आणि OBC वर्गातील महिलांना अर्ज करण्यास परवानगी आहे. 
  • Antyodaya Anna Yojana आणि Pradhan  Mantri  Awas  Yojana Gramin अंतर्गत समावेश असलेल्या महिला वर्ग योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Gas Cylinder Yojana साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे? 

  • महिलेचे बँक खात्यासोबत लिंक असलेले आधारकार्ड 
  • BPL कार्ड 
  • मोबाईल नंबर (आधारसोबत लिंक असणे) 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • जातीचा दाखला 
  • महिलेच्या वयाचे पुरावे 
  • बँक खात्याची संपूर्ण माहिती व पुरावा 
  • ई-मेल आयडी 
  • मतदान कार्ड

Gas Cylinder Yojana Online Apply Process 

गॅस सिलेंडर योजनामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेसला फॉलो करावे लागणार आहे आणि या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून फ्री गॅस सिलेंडर मिळवू शकता. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल उघडणे 

  • मोफत गॅस सिलेंडर प्राप्त करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुगलमध्ये जाऊन PMUY असे टाकायचे आहे. 
  • त्यानंतर गुगलमध्ये पहिल्या क्रमांकावर केंद्र सरकारने तयार केलेली PMUY ची अधिकृत वेबसाइट दिसेल, त्यावर क्लिक करणे. 
  • तुमच्या स्क्रीनमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना नाव असलेला डॅशबोर्ड उघडून येईल. 
  • त्या डॅशबोर्डवर मेनुबारमधील Apply for New Ujjawala 2.0 Connection या पर्यायामध्ये जाणे. 
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनमध्ये फ्री गॅस सिलेंडर योजनेसाठी कोण पात्र असणार? आणि अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे? याची माहिती जाणून घेण्यास मिळेल. 
  • माहिती वाचून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच डॅशबोर्डमध्ये वरच्या बाजूला अर्जाची लिंक दिसेल किंवा खाली स्क्रोल केल्यानंतर ऑनलाईन पोर्टल लिंक दिसेल यामधील कोणत्याही पर्यायाची निवड करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर तीन वेगवेगळ्या गॅस कंपन्यांची यादी खुलेल. 
  • त्या यादीमध्ये Indane, Bharatgas आणि HP Gas असे पर्याय दिसतील. 
  • त्यामधील तुमच्या आवडीप्रमाणे व क्षेत्राजवळील कोणत्याही एका एजन्सीची निवड करा. 

LPG Connection रजिस्टर करणे 

  • एचपी गॅस पर्यायामध्ये कसे रजिस्ट्रेशन करायचे? ते दाखवतो. 
  • एचपी गॅसच्या पर्यायाची निवड केल्यानंतर तुमच्या समोर त्यांची वेबसाइट उघडलेली दिसेल. 
  • त्यानंतर तुम्हाला Register for LPG Connection पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये सुरुवातीला तुम्हाला कनेक्शनचे दोन प्रकार दिसतील, त्यामधील Ujjawala Beneficiary Connection ला टिक करा. 
  • पुढे तुम्हाला Declaration बॉक्समध्ये पात्रता वाचून टिकमार्क करायची आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला Distributor चे नाव माहित नसेल, त्यामध्ये Name Wise सिलेक्ट न करता Location Wise वर टिक करा. 
  • लोकेशन पर्याय निवडल्यावर तुम्ही कोणत्या राज्याचे आहात? तुमचा जिल्हा कोणता आहे? ते निवडणे. 
  • पुढे तुमच्या जिल्ह्याप्रमाणे तुमच्या क्षेत्राजवळील Distributor ची यादी येईल, त्यामधील एकाची निवड करणे. 
  • निवड केल्यानंतर त्या डिस्ट्रिब्युटरचा पत्ता व सर्व माहिती दिसेल व नंतर Next बटणावर क्लिक करा. 

Pradhan Mantri Ujjawala Yojana Application Form भरणे

इथून पुढे फ्री गॅस सिलेंडर योजनाचा फॉर्म भरत असताना जे काही स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली जाईल, ती तुम्ही फॉलो करा नाहीतर लाभ मिळणार नाही. 

KYC Application भरणे 

  • फ्री गॅस सिलेंडर योजनाची सबसिडी मिळण्यासाठी तुम्हाला KYC करणे आवश्यक आहे. 
  • केवायसी करण्यासाठी ज्या महिलेच्या नावाने अर्ज करत आहात, त्यांचे आधार क्रमांक सुरुवातीला भरावे लागेल. 

महिलेची वैयक्तिक माहिती देणे 

  • आधार क्रमांक टाकून झाल्यावर तुमचे संपूर्ण नाव भरायचे आहे. 
  • त्यानंतर तुमचे जन्म दिनांक dd/mm/yyyy या फॉर्मॅटप्रमाणे भरा. 
  • तुमची जात कोणती आहे? ज्यामध्ये Others, OBC, ST आणि SC विचारले जाईल त्यापैकी एकाची निवड करा. 

तुमच्या रेशकार्डची माहिती देणे 

  • रेशनकार्डची माहिती भरताना तुमचे राज्य कोणते आहे? त्याची निवड करा किंवा काही वेळेला ती ऑटोमॅटिकली आधारकार्डप्रमाणे भरून येईल. 
  • तुम्ही रेशन कार्ड कधी बनविले होते? त्याचे दिनांक द्या. 
  • त्यानंतर तुमच्या रेशनकार्डचे नंबर भरा व डुप्लिकेट आहे का? तेही तपासू शकता. 

तुमचे कनेक्शन पत्ता व संपर्क माहिती देणे

  • गॅस सिलेंडर योजना अंतर्गत LPG कनेक्शन लावण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागातील आहेत त्याची निवड करा. 
  • त्यानंतर तुमचे घर क्रमांक, रस्त्याचे नाव, राज्य, जिल्हा आणि पिनकोड नंबर भरून घ्या. 
  • पुढे तुमची ई-मेल आयडी व आधारकार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर द्या. 
  • तुमच्या जवळ ऑफिस व घरचा संपर्क नंबर असेल तर भरा किंवा नाही भरला तरीही चालेल. 

तुमच्या बँक खात्याची माहिती भरणे 

  • घरचा पत्ता दिल्यानंतर बँकेची माहिती देण्यासाठी तुम्ही आधार क्रमांक किंवा संपूर्ण डिस्टेल्स भरायची ऑपशन दिसतील, त्यामधील एकाची निवड तुमच्या सोयीनुसार करा. 
  • तुमच्या बँकेची माहिती देण्यासाठी IFSC किंवा MICR कोड टाकून घेणे. 
  • पुढे बँकेचे खाते क्रमांक व ब्रांचचे नाव भरून घेणे. 

LPG कनेक्शनची माहिती देणे 

  • बँकेची माहिती भरल्यावर कनेक्शनची ३ प्रकार दिसतील. 
  • त्यामध्ये 14.2 kg SBC, 5 kg SBC आणि 5 kg DBC असे प्रकार मिळेल. 
  • आपण उज्ज्वला योजना अंतर्गत लाभ घेत असल्या कारणाने 14.2 kg चा ऑपशन निवडावा लागेल. 

गॅस सिलेंडर योजनाची लागणारे कागदपत्रे अपलोड करणे 

  • सुरवातीला तुम्हाला राहत्या ठिकाणाचा पुरावा देण्यासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची यादी मिळेल. 
  • त्या यादीनुसार कागदपत्राच्या बॉक्सवर टिक करून आयडी क्रमांक भरणे. 
  • त्यानंतर 300 KB अंतर्गत JPG, JPEG, GIF, PNG, PDF किंवा Zip File यापैकी एका फॉरमॅटमध्ये कागदपत्रे स्कॅन करून ती एक-एक करून अपलोड करा. 
  • पुढे 50 KB च्या आत तुमचे पासपोर्ट आकारचे फोटो स्कॅन करून अपलोड करणे. 
  • जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर त्यामध्ये एक लिंक असेल. 
  • त्या लिंकमध्ये फॉर्म दिला असेल तो डाउनलोड करून हाताने भरून घेणे. 
  • फॉर्म भरल्यानंतर स्कॅन करून अपलोड करणे. 

तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांची माहिती भरणे 

  • यामध्ये तुम्हाला Add Member चा ऑपशन दिसेल तो निवडा. 
  • त्यानंतर तुमच्या कुटुंबामधील सर्व सदस्यांची माहिती ऍड करा. 
  • त्या माहितीमध्ये सदस्यसोबत नाते, त्यांचे आधार क्रमांक, जन्म दिनांक आणि लिंग द्यावे लागेल. 
  • तुमच्या सदस्यांमधील कोणाचे आधारकार्ड नसल्यास त्याच करणे सिलेक्ट करणे. 
  • काही माहिती चुकीची असल्यास Delete Member चा ऑपशन क्लिक करून पुन्हा ऍड करू शकता. 

गॅस सिलेंडर योजनाचा फॉर्म सबमिट करणे

  • तुमच्या कुटुंबाची माहिती दिल्यावर declaration चा बॉक्स टिक करून घेणे. 
  • त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा कोड दिला असेल तो वाचून व्यवस्थित भरणे. 
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर एकदा व्यवस्थित आहे का? तो तपासून घ्या. 
  • फॉर्म तापसल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. 
  • उज्ज्वला योजनेचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस येईल. 
  • त्या एसएमएसमध्ये रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल, तो सांभाळून ठेवणे. 
  • अशा पद्धतीने तुमचा योजनेचा पूर्णपणे फॉर्म भरून झालेला आहे. 

Gas Cylinder Yojana ची स्थिती कशी तपासायची? 

  • गॅस सिलेंडर योजनाचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिब्युटरच्या पोर्टलमध्ये प्रवेश करावा लागेल. 
  • पोर्टलमध्ये गेल्यानंतर Check Status च्या ऑपशनमध्ये जावा. 
  • तिथे गेल्यानंतर तुमच्या समोर चेक रजिस्ट्रेशन स्टेटसचा फॉर्म ओपन होईल. 
  • त्या फॉर्ममध्ये सर्वात आधी तुम्हाला Ujjawala हा पर्याय टिक करायचा आहे. 
  • त्यानंतर उज्ज्वला योजनामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला Reference Number मिळाला असेल, तो भरून घेणे. 
  • तुमचे जन्म दिनांक भरन घेणे. 
  • पुढे कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटसच्या बटनावर क्लिक करणे. 
  • अशा प्रकारे तुम्ही अर्ज केलेले स्टेटसची पडताळणी करू शकता. 

निष्कर्ष 

अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला Gas Cylinder Yojana Online Registration कसे करायचे ते लेखामधून मार्गदर्शन केले. तसेच गॅस सिलेंडर योजनेचा फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया, हेल्पलाईन नंबर, योजनेचे डिपार्टमेंट, लाभ, आवश्यक कागदपत्रे, पात्रतेच्या अटी आणि अर्जाची स्टेटस कसे पाहायचे हे लेखाच्यामार्फत सविस्तर सांगितले.