Free Silai Machine Yojana 2024: सुरु झाली फ्री शिलाई मशीन योजना, झटपट करा अर्ज

Free Silai Machine Yojana 2024: प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांनी फ्री शिलाई मशीन योजना देशामधील महिलांना मजबूत आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या महिलांना फ्रीमध्ये शिलाई मशीन दिली जाणार आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

जेणेकरून स्त्रिया घरी बसून शिलाईचे काम करून आपला रोजगार निर्माण करू शकतील. या योजना अंतर्गत भारत देशातील प्रत्येक राज्यामधील 50,000 लाभार्थी महिलांना यांचा लाभ घेता येणार आहे.

ज्या स्त्रिया घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, परंतु आपल्या कुटुंबासाठी आर्थिक मदत म्हणून कमाई करायचा विचार करत आहेत तर ही योजना त्यांच्यासाठी उत्तम ठरेल. या योजनेच्या माध्यमातून अशाच आर्थिक स्वरूपातील दुर्बळ वर्गातील महिलांना रोजगार प्राप्त करण्यासाठी लाभ होईल. 

जर तुम्हाला सुद्धा फ्री शिलाई मशीन योजनामध्ये अर्ज करून लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक तुम्हाला वाचावा लागेल. यामध्ये आम्ही पीएम शिलाई मशीन योजनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. जसे योजनेचे उद्देश, पात्रता, फायदे, वैशिष्ट्ये, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि बरेच काही. 

Free Silai Machine Yojana in Marathi

केंद्र सरकारने सुरु केलेल्या फ्री शिलाई मशीन योजना ही देशाभरातील महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या योजने अंतर्गत महिलांना मोफत शिलाई यंत्रणा देण्यात येणार आहेत.

त्यामुळे गरीब वर्गातील महिला घरबसल्या शिलाईचे काम करून आपल्या घरची आर्थिक परिस्तिथी सुधारू शकते. त्याचसोबत आत्मनिर्भर होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक मजबुती देऊ शकते. या योजनेमध्ये 20 ते 40 वयोगटातील स्त्रियांनाच याचा लाभ घेता येणार आहे.

Free Silai Machine Yojana 2024 Overview

यॊजनाचे नावफ्री शिलाई मशीन योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीद्वारे
उद्देशमहिलांना मोफत शिवण मशीन वाटप
कार्यालयमहिला व बाळ विकास विभाग
लाभार्थीदेशामधील गरीब वर्गातील महिला
अर्ज पद्धतऑनलाईन / ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटservices.india.gov.in

Silai Machine Yojana Objectives

या योजनेच्या मार्फत प्रत्येक राज्यातील गरीब वर्गातील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मोफत शिवण मशीन दिली जाणार. केंद्र सरकारने सुरु केलेल्या फ्री शिलाई मशीन योजनेच्या मागचे मुख्य उद्देश म्हणजे महिला स्वावलंबी राहून स्वतःचा रोजगार निर्माण करून आपल्या परिवाराला आर्थिक मदत मिळवून देणे हा आहे. 

त्याचसोबत महिलांना आपली गुणवत्ता वाढविण्यासाठी मोफत ट्रेनिंगसुद्धा या योजनेच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी स्त्रियांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून प्रशिक्षणासाठी जवळच्या उपलब्ध असलेल्या ट्रेनिंग सेंटरला भेट द्यावी लागेल.

Free Sewing Machine Scheme Benefits and Features

  • या शिलाई मशीन योजनेच्या मार्फत देशातील महिला आर्थिक स्वरूपात रोजगार प्राप्त करून आपल्या गरजा पूर्ण करू शकतात. 
  • या योजनेचा फायदा देशातील प्रत्येक राज्यामधील 50,000 पेक्षा जास्त महिलांना घेता येणार. 
  • ग्रामीण आणि शहरी भागातील महिला वर्ग या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. 
  • स्त्रिया मोफत मशीनचा वापर करून चांगल्या प्रकारे कमाई  करू शकतात. 
  • केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिवण मशीनवर ट्रेडमार्क, किंमत आणि विकत घेतलेले दिनांक सुद्धा असेल. 
  • या योजनेच्या मार्फत प्रत्येक राज्यातील महिलांना नोकरीची संधी प्राप्त होईल. 
  • या मोफत शिवण मशीनचा लाभ एक महिला फक्त एकाच वेळी घेऊ शकते. 
  • या योजने अंतर्गत 20 ते 40 वर्ष वय असलेली महिला सहभागी होऊन आपले जीवन आर्थिक स्वरूपात आणि सामाजिक स्वरूपात सुधारू शकते.

या १० राज्यांना मिळणार फ्री शिलाई मशीन 

सध्या देशामधील काही राज्यांमध्ये फ्री सिलाई मशीन योजना लागू करण्यात आलेली आहे. परंतु काही काळानंतर संपूर्ण  भारत देशातील राज्यामध्ये याची सुरुवात करण्यात येईल. आता सध्या फक्त या खालील दिलेल्या राज्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. 

  • महाराष्ट्र 
  • गुजरात 
  • उत्तर प्रदेश 
  • मध्य प्रदेश 
  • राजस्थान 
  • हरियाणा 
  • कर्नाटक 
  • बिहार 
  • तमिळनाडू 
  • छत्तीसगड

Silai Machine Yojana Documents 

  • आधारकार्ड 
  • ओळख पत्र 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • शिवणकामाचे प्रमाणपत्र 
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • अपंग असतील तर अपंगत्व प्रमाणपत्र 
  • समुदाय प्रमाणपत्र
  • अर्जदार विधवा असेल तर पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र 
  • शिधापत्रिका 
  • जातीचा दाखला 

Free Silai Machine Yojana Eligibility 

फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्जदार महिलांना सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. खालील दिलेल्या पात्रतामध्ये महिला बसत असेल तर त्या योजनेमध्ये अर्ज करू शकतात. 

  • या योजनेमध्ये देशामधील गरीब वर्गातील महिला पात्र आहेत. 
  • मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षाच्या खाली असणे आवश्यक आहे. 
  • या योजनेमध्ये देशभरातील अपंगत्व आणि विधवा महिला सहभागी होऊ शकतात. 
  • अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीमध्ये नसले पाहिजेत. 
  • महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. 
  • या योजनामधील पात्र असलेल्या महिला भारताच्या नागरिक असणे आवश्यक आहे. 

Free Silai Machine Yojana Registration 

फ्री शिलाई मशीन योजनामध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 जुलै असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा घ्या. या योजना अंतर्गत महिलांना शिलाई मशीन यंत्रणा घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागेल. या योजनेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज कसे करू शकतो? ते खालीलप्रमाणे दिलेले आहे. 

Free Sewing Machine Scheme Online Apply 

  • सगळ्यात आधी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर अधिकृत वेबसाईटचा होम पेज उघडून येईल. 
  • त्या होमपेजमध्ये अर्ज करायच्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. 
  • त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. 
  • त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. 
  • सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर  Silai Machine Application form दिसेल. 
  • त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली सर्व माहिती ध्यानपूर्वक पुरवणे.
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये अपलोड करणे. 
  • अपलोड करून झाल्यावर शेवटी तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. 
  • अशा प्रकारे तुमचा ऑनलाईन अर्ज पूर्ण होईल आणि तुम्हाला शिवण मशीन प्राप्त होईल. 

Free Sewing Machine Scheme Offline Apply

  • सर्वात प्रथम तुम्हाला या सिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. 
  • त्यानंतर अधिकृत वेबसाईटचा होम पेजवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी एप्लिकेशन फॉर्म डाउनलोड वर क्लिक करणे. 
  • डाउनलोड झालेला एप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घेणे. 
  • प्रिंट काढून झाल्यानंतर फॉर्ममध्ये विचारल्या गेलेल्या माहितीनुसार फॉर्म भरून घेणे. 
  • फॉर्ममध्ये माहिती भरून झाल्यावर महिलेचे पासपोर्ट साईझ फोटो चिकटवणे. 
  • त्याच सोबत आवश्यक कागदपत्रेही सोबत लावणे. 
  • माहिती आणि कागदपत्रे लावून झाल्यावर शेवटी सही करून घेणे. 
  • फॉर्म आणि सगळे कागदपत्रे तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करणे. 
  • फॉर्म सबमिट करून झाल्यावर कार्यालयामधून तुम्हाला पावती मिळेल ती जपून ठेवणे. 
  • अशाप्रकारे तुमची ऑफलाईन प्रकिया पार होईल आणि तुम्हाला मोफत शिलाई मशीन प्राप्त होईल. 

फ्री शिलाई मशीन योजनाचे फॉर्म कसे भरायचे? 

तुमच्या जवळ फॉर्म उपलब्ध नसल्यास, ऑनलाईन फॉर्म कसा डाउनलोड करायचा ते या लेखातुन कळेल किंवा आमच्या telegram channel मध्ये तुम्हाला फॉर्म मिळून जाईल. हा फॉर्म ऑफलाईन अर्जासाठी देण्यासाठी लेखी पद्धतीने भरणे आवश्यक आहे, त्यासाठी फॉर्मची एक कॉपी काढून घेणे. 

  • सगळ्यात आधी अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव टाकणे. 
  • त्यानंतर female च्या पर्याय वर टिक करून लेखी सुद्धा उतरवणे. 
  • महिलेचे राहत असलेला संपूर्ण पत्ता लिहून घेणे. 
  • महिलेची जन्म तारीख टाकणे. 
  • महिला कोणत्या caste ची आहे ते भरून घेणे. 
  • शिलाई मशीन का घेत आहे? दिलेल्या चारपैकी एका कारणावर टिकमार्क करणे. 
  • तुमच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची अचूक नोंद करणे. 
  • जर तुमच्याकडे पूर्वी कधी शिवण मशीन मिळाली आहे का? तिथे नाही करणे. 
  • शिलाई काम कुठून शिकलात त्याची नोंद करणे. 
  • अर्जदाराचे पासपोर्ट साईझ फोटो चिटकवणे. 
  • फॉर्मच्या शेवटी महिलेची सही करून घेणे. 
  • त्यानंतर फॉर्म मध्ये विचारले गेलेले कागदपत्र सोबत जोडणे. 
  • अशाप्रकारे संपूर्ण फॉर्म भरून झाला आहे. 

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेताना या चुका करू नये

  • अर्ज करताना चुकीची माहिती भरल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जर महिलेने यापूर्वी शिवण मशीन घेतली असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो. 
  • अर्जदार महिला जर राज्याच्या बाहेरील असेल तर अर्ज नाकारले जातील. 
  • फॉर्म संपूर्ण न भरल्यामुळे अर्ज रद्द केला जाऊ शकतो. 
  • जर कुटुंबामध्ये कोणी सरकारी कार्यालयात काम करत असेल तर अर्ज रद्द होईल. 
  • या योजनेमध्ये शिवणकामाचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज मान्य केले जाणार नाही. 

निष्कर्ष 

आम्ही आशा करतो, Free Silai Machine Yojana याबद्दल तुम्हाला या लेखातून सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती समजली असेलच. या लेखामध्ये आम्ही ही योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहे? फायदे काय आहे? कोणत्या राज्यांसाठी आहे? आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत? ऑफलाईन आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन पद्धत, महत्त्वाच्या टिप्स अशी सगळी माहिती आम्ही यातून पुरवली. या योजनेतून स्त्रियांना आत्मनिर्भर राहून चांगला रोजगार कमविण्यासाठी एक चांगली संधी आहे. 

आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या गरजू महिलांनासुद्धा हा share करा आणि अशाच नवनवीन योजनांबाबत माहितीसाठी आम्हाला subscribe करू शकता किंवा social मीडियाला follow करू शकता.

FAQs

मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज कसा करायचा? 

मोफत शिलाई मशीनसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा. 

शिलाई मशीन कोणत्या राज्यांना मिळणार आहे? 

केंद्र सरकार तर्फे सिलाई मशीन महाराष्ट्र, गुजरात, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड या राज्यांना मिळणार आहे.

Free Sewing Machine Scheme साठी महिलेचे वय किती असले पाहिजेत? 

Free Sewing Machine Scheme साठी महिलेचे वय 20 ते 40 वर्षापेक्षा कमी असले पाहिजे.

हे सुद्धा वाचा: