Favarni Pump Yojana 2024: शेतकऱ्यांना दिले जाणार फ्री फवारणी पंप, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Favarni Pump Yojana 2024: महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना शेतीच्या मदतीसाठी राज्य सरकारने फवारणी पंप योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेती करण्यासाठी लागणारे ऑटोमॅटिक फरवारणी पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून 100% सबसिडी दिले जाणार आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध प्रकारचे योजना आणत असतात. शेतकऱ्यांना शेती करताना निरनिराळ्या यंत्रणा व मशीनची गरज लागत असते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांना आवश्यक असणारे सामान घेण्यास परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या शेतीच्या कामांसाठी वेळ व जास्त मेहनत घ्यावी लागते. 

आपल्या राज्यातील अन्नदाता वर्गाना शेती कामात वेग मिळावा व कमी मेहनत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवा यासाठी राज्य शासनातर्फे Favarni Pump Yojana Online Apply प्रकिया सुरु करण्यात आली. 

तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही घरी बसून सहजरित्या ऑनलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकता. अर्ज करण्यासाठी आम्ही दिलेला हा लेख शेवटपर्यंत पहा. त्याचसोबत आम्ही या लेखात फवारणी पंप योजनेचे उद्देश काय आहेत? ती कधी सुरु करण्यात आली? यामधून कोणते फायदे दिले जाते? यामध्ये लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी काय असणार? तसेच अर्ज करताना आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती? आणि ऑनलाइन अर्ज प्रकिया कसे करू शकता? याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली आहे. 

Favarni Pump Yojana in Marathi 

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत फवारणी यंत्रणा प्रदान करण्यासाठी 2024 मध्ये फवारणी यंत्रणा योजनाची सुरवात केली. ही योजना MahaDBT पोर्टलद्वारे राबिवली जात आहे. याच पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बंधूनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लाभ दिला जातो. 

या योजनेच्या माध्यमातून कापूस उत्पादक व सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मोफत म्हणेजच 100% सबसिडीच्यामार्फत बॅटरीवर चालणारी फवारणी पंप विकत घेण्यास मदत केली जाते. शेतकऱ्यांना Battery Spray Pump घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार ज्याची किंमत 2500 ते 4000 रुपयांच्या आसपास असू शकते. 

सरकारकडून महाडीबीटी पोर्टलच्यामार्फत 1,65,000 Battery Operated Sprayers चे वाटप महाराष्ट्रातील विविध राज्यातील शेतकऱ्यांना केले जाणार आहेत. या योजनेतून शेतकरी वर्गाला पुरेपूर लाभ घेण्यासाठी शासनाने मुदत वाढ सुद्धा करण्यात आली.

Favarni Pump Yojana Details 2024

योजनेचे नावफवारणी पंप योजना
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
सुरु केलीमहाराष्ट्र सरकारने
कधी सुरु केली2024
उद्देशराज्यातील शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रे पंप विकत घेण्यासाठी सबसिडी देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यामधील शेतकरी वर्ग
लाभफ्री फवारणी पंप
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर022-61316429

Favarni Pump Yojana Aim 

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या फवारणी पंप योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील शेतकरी बाधंवाना बॅटरीवर चालणारे फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी शंभर टक्के सबसिडी प्रदान करणे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांस शेती करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि शेतीसुद्धा योग्य पद्धतीने होण्यात मदत मिळेल. 

या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दुर्बळ आहे अशा शेतकऱ्यांना एक मदतीचा हात दिला जातो आहे. ऑटोमॅटिक यंत्रणांचा वापर करून शेतकरी चांगले उत्पन्न वाढवून आपले आर्थिक स्थितीमध्ये बदल करू शकतात. 

Favarni Pump Yojana Benefits

  • फवारणी पंप योजनाचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जातो. 
  • या योजेनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत फवारणी यंत्रणा उपलब्ध करून दिला जातो. 
  • महाराष्ट्र सरकार योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना पंप विकत घेण्यासाठी 100% सबसिडी दिली जाते. 
  • बॅटरी आधारित फवारणी यंत्रणामुळे शेतकरी योग्यरिता फवारणी करू शकतील. 
  • तसेच योग्यरीत्या फवारणी केल्यामुळे पिकांचं आरोग्याला फायदेशीर राहील. 
  • व्यवस्थित शेती झाल्यामुळे उत्पादन वाढण्यात मदत होऊन आर्थिक लाभ वाढू शकेल. 

Favarni Pump Yojana Eligibility 

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी फवारणी पंपसाठी पात्र असणे आवश्यक आहे, त्यासाठी खालील दिलेल्या अटीप्रमाणे पात्रता सिद्ध होणे गरजेचे आहे. 

  • जे शेतकरी या योजनेत अर्ज करणारा आहे तो महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे. 
  • या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे शेत जमीन असणे. 
  • शेतकरी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. 
  • त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांकडे शेत जमीन सातबारा उतारा तसेच 8A चे कागदपत्रे सुद्धा असणे.

Favarni Pump Yojana Required Documents 

फवारणी पंप योजनासाठी आवश्यक कागदात्रे खालीलप्रमाणे यादीनुसार दिले आहेत, ती अर्ज करताना शेतकऱ्यांकडे असणे महत्त्वाचे आहेत. 

  • अर्जदार शेतकरीचे आधारकार्ड (बँक लिंक असलेले) 
  • वार्षिक उत्पन्न दाखला 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • स्वतःचे घोषणा पत्र 
  • बँक खात्याचे पुरावे जसे पासबुकचे पहिले पान 
  • पूर्व समितीचे पत्र 
  • उपकरण विकत घेण्यासाठी आवश्यक असणार कोटेशन 
  • केंद्र सरकारतर्फे मान्यता देण्यात येणार निरीक्षण रिपोर्ट 

Favarni Pump Yojana Apply Online 

ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या फवारणी पंप योजनामध्ये अर्ज करून लाभ घेयचा असेल तर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. शेतकरी घरी बसून सोप्या पद्धतीने MahaDBT च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल. 

  • तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम MahaDBT च्या पोर्टलमध्ये जावे लागेल. 
  • महाडीबीटीच्या पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल. 
  • त्या होमपेजमधील मेनू बारमध्ये जाऊन शेतकरी योजना (Farmer Schemes) या पर्यायाला निवडावे लागेल. 
  • त्यानंतर शेतकरी योजनेच्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्डचा पर्याय दिसेल. 
  • जर तुमच्याकडे आयडी व पासवर्ड नसेल तर तयार करून त्यामध्ये टाकून लॉगिन बटनावर क्लिक करणे. 
  • त्या पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुमाला Online Apply असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर नवीन पेज उघडून येईल त्यांमधील कृषी यंत्र अवजार खरेदी आर्थिक मदतच्या पर्यायाला निवडायचे. 
  • पुढे तुम्हाला मॅनुअल टूल्समध्ये जाऊन मशीनरी टूल्स व पीक सुरक्षा उपकरणांची निवड करावी लागेल. 
  • निवड केल्यानंतर तुम्हाला बॅटरी ऑपरेट फवारणी पंप (कापूस/गठ्ठीत धान्य) वर क्लिक करणे. 
  • त्याच्यामध्ये तुम्हाला काही अटी विचारल्या जातील ते स्वीकारून पुढे जाणे. 
  • पुढे गेल्यानंतर तुमच्या समोर फवारणी पंप योजनाचा फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममधील सर्व काही माहिती वाचून अचूक भरून घेणे. 
  • अचूक माहिती भरल्यावर लागणारे कागदपत्र स्कॅन करा आणि अपलोड करा. 
  • नंतर तुम्हाला पुढची प्रकिया करण्यासाठी 23.60 रुपये भरून सबमिट करणे. 
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला रक्कम भरलेली पावती मिळेल ती डाउनलोड करून घेणे. 
  • अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळवू शकता. 

MahaDBT Portal Applicant Registration 

  • अर्जदार महाडीबीटी पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटमध्ये जावा. 
  • पोर्टलमध्ये गेल्यानंतर New Applicant Registration या ऑपशनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये वैयक्तिक माहिती विचारली असेल. 
  • त्या वैयक्तिक माहितीमध्ये तुमचे नाव, नवीन यूजर आयडी व पासवर्ड, तुमचे ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकावे लागेल. 
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो भरून घेणे. 
  • ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून रजिस्टर बटनावर क्लिक करणे. 
  • अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून लॉगिन आयडी तयार करू शकता. 

Favarni Pump Yojana Application Status Check 

जर तुमचे अर्ज प्रकिया पूर्ण झाले असतील. परंतु त्याचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलमध्ये जाऊन फवारणी पंप योजनाचे स्टेटस तपासू शकता. तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना फॉलो करावे लागेल. 

  • स्टेटस पाहण्यासाठी पहिले तुम्हाला महाडीबीटी पोर्टलच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
  • पोर्टल उघडल्यानंतर तुमच्या समोर होम पेजचे पान उघडेल. 
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करून घेयचे आहे. 
  • लॉगिन करून झाल्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायाला निवडायचे आहे. 
  • पर्यायाची निवड केल्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करायचे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण यादी उघडून येईल, त्यामधील या योजनेचे ऑपशन दिसेल. 
  • त्या ऑपशनला क्लिक करून पुढे जावे लागेल. 
  • पुढे गेल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजनेचे शो स्टेटस असे असेल त्यामध्ये क्लिक करायचे. 
  • त्यानंतर तुम्हाला योजनेचे एप्लिकेशन स्टेटस पाहायला मिळेल. 

निष्कर्ष 

अशाप्रकारे तुम्हाला Favarni Pump Yojana संदर्भात संपूर्ण माहिती या लेखातून मार्गदर्शन केले. यामध्ये आम्ही योजना काय आहे? या योजनेची महत्व काय आहेत? ती कोणातर्फे सुरु करण्यात आली? ती कोणत्या लोकांसाठी सुरु केली? सरकारचे उद्देश काय होते? यातून लाभार्थ्यांना कोणते फायदे दिले जाणार? त्यांचे पात्रतेची अटी कोणत्या आहेत? यामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती? तसेच अर्जदार कशाप्रकारे अर्ज करू शकतात? पोर्टल लॉगिन कसे करायचे? आणि अर्ज करून झाल्यानंतर स्टेटस कसे तपासायचे? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. 

महत्त्वाची बातमी: महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना अर्जाची शेवटची तारीख 16 ऑगस्ट, 2024 पर्यंत होती. परंतु सध्या खूप जणांनी यामध्ये अर्ज केले आहेत. काही पोर्टलच्या टेक्निकल समस्यांमुळे अजून लाभार्थ्यांना लाभ मिळालेलं नाही आणि काहींना अर्ज सुद्धा करण्यात समस्या होत होत्या. ही माहिती आम्ही यासाठी दिली आहे की, पुढे जाऊन आणखी मुदत वाढविल्यानंतर तुम्हाला योजनेचा फायदा घेता येईल. 

तुम्हाला आमचा हा लेख उपयुक्त व माहितीशीर वाटला असेल तर अशाच योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा Telegram ला जॉईन करून अपडेट्स घेऊ शकता. 

FAQs

फवारणी पंप योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गातील नागरिक पात्र आहेत. 

Battery Spray Pump ची किंमत किती पर्यंत असते? 

Battery Spray Pump ची किंमत अडीच ते चार हजारपर्यंत असू शकते. 

फवारणी पंप योजनामध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे? 

या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलमध्ये जाऊन करू शकता.

पुढे वाचा: