केंद्र सरकारने भारत देशामधील नागरिकांना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी PM Vidya Lakshmi Yojana ची सुरुवात केली आहे. ज्याच्या माध्यमातून भारत देशामधील गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण प्राप्त करण्यासाठी 10 लाख रुपये रक्कम देण्यात येते.
आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणात अशा मुलांची संख्या आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्या कारणामुळे त्यांना हवे तसे शिक्षण घेता नाही. त्यामुळे याचे नुकसान देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होते.
Read More: PM Vidya Lakshmi Yojana Documents Required
त्याचप्रमाणे पीएम विद्यालक्ष्मी योजना अंतर्गत सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारने पोर्टल देखील उघडले आहे. ज्यामध्ये शासनातर्फे वेळोवेळी पोर्टल उघडून रजिस्ट्रेशन सुरु करण्यात येते.
PM Vidya Lakshmi Yojana काय आहे?
पीएम विद्यालक्ष्मी योजना ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 06 नोव्हेंबर, 2024 मध्ये सुरु करण्यात आली. ज्यामध्ये भारत देशामधील विद्यार्थ्यांना सहभागी करून उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.
Read More: 3 Things To Know About Vidya Lakshmi Yojana In Marathi
योजनेमधून लाभार्थी विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे गॅरेंटी व मॉर्गेज देण्याची गरज लागत नाही. योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारने सुरु केलेल्या विद्यालक्ष्मी पोर्टलमध्ये जावे लागेल.
तसेच या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र सरकारने 3,600 कोटी रुपयांचा बजेट सादर केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 2024-25 पासून ते 2030-31 कालावधीपर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Read More: Vidya Lakshmi Yojana Apply Online
PM Vidya Lakshmi Yojana ची पात्रता काय आहे?
पीएम विद्यालक्ष्मी योजनामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे दिलेल्या पात्रतेच्या अटी जाणून घेणे आवश्यक आहे.
- योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमीतकमी बारावी शिक्षण पूर्ण असणे.
- त्याचप्रकारे बारावी पूर्ण असून त्यामध्ये 50% टक्केवारीपेक्षा जास्त गुण असणे.
- योजनेमध्ये अर्ज करत असलेल्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
- उच्च शिक्षणासाठी कर्जाचा लाभ घेण्याकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- तसेच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताना शैक्षणिक पुरावा, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, वार्षिक उत्पन्नाचा दाखला व पॅनकार्ड यांसारखे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.