E Shram Card Registration: आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकिया वापरून घर बसल्या बनवा नवीन ई श्रम कार्ड. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा.
या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने भारतामधील कामगार लोकांसाठी पेन्शन म्हणून केली आहे. ज्याच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड उपलब्ध आहे, त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी मदत करते.
या कार्डच्या माध्यमातून सर्व धारकांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये रक्कम पेन्शन स्वरूपात देण्यात येते. ज्यामध्ये ते त्यांचे दैनंदिन जीवनामधील आर्थिक खर्च भागविण्यासाठी सक्षम बनतात.
कामगारांना हे फायदे घेण्यासाठी कार्डसाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे? आणि त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे? याबद्दल सविस्तर माहिती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
ई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन प्रकिया
- कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला eshram.gov.in च्या पोर्टलमध्ये प्रवेश करायचा आहे.
- पोर्टलमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला Register on eShram यावर क्लिक करायचे.
- त्यानंतर तुमचा आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
- पुढे तुम्ही EPFO आणि ESIC यामध्ये सदस्य आहेत का? त्याचे Yes किंवा No मध्ये उत्तर देणे.
- स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल तो भरून सेंड ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमचा 14 अंकाचा आधारकार्ड नंबर विचारतील तो भरून घेणे.
- पुढे काही नियम व अटी यादीनुसार दिल्या असतील ते व्यवस्थित वाचून टिकमार्क करा.
- आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो भरून Validate बटन दाबणे.
- त्यानंतर तुमच्या समोर कार्डसाठी योजनेचा फॉर्म उघडून येईल.
- त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती, घराचा पत्ता, कौशल्य, काम आणि बँक खात्याची माहिती भरून घेणे.
- तुमचे आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र आणि बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे.
- शेवटी Self Declaration पाहून टिकमार्क करा आणि सबमिट बटन दाबा.
- त्यानंतर UAN Card Download वर क्लिक करून तुमचे कार्ड प्राप्त करा.
Read More: