E Shram Card Pension Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे देशभरातील असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गासाठी ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून मजूर आणि कामगार वर्गांना केंद्र सरकारतर्फे पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार. या आर्थिक मदतीमध्ये 60 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना आणि मजुरांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पेन्शन दिली जाणार.
या योजनेच्या अंतर्गत कामगारांना भेटणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या म्हातारपणी त्यांना कोणतेही काम न करता आपला उदरनिर्वाह करता येणार आहे. जर तुम्हीसुद्धा श्रमिक कार्ड धारक आहात किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आहेत? आणि या योजनामध्ये अर्ज करायचा आहे, तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल. कारण या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या ई-श्रम कार्ड पेन्शन योजना संबंधित उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रकिया याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.
E Shram Card Pension Yojana in Marathi
असंघटित क्षेत्रामध्ये मजदुरी करणारे असे असंख्य लाखो करोड़ो कामगार आपल्या भारत देशामध्ये आहेत. अशाच प्रकारच्या संघटित क्षेत्रामधील काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारकडून ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक मदत देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे.
ज्यामध्ये कामगारांना दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणजेच वर्षाला 36,000 रुपये पेन्शन स्वरूपात त्यांना प्राप्त होणार. ज्या कामगारांचे वय 60 वर्ष ओलांडून गेले आहेत त्यांनाच या पेन्शनमधून रक्कम प्राप्त करता येणार.
इच्छुक कामगार अर्जदाराला यामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीला श्रम योगी मानधन योजना अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच 60 वर्षाचे होईपर्यंत 3000 रुपये लाभ घेण्यासाठी तुम्हाला आतापासूनच दरमहा 55 ते 200 रुपये प्रीमियम भरावे लागेल. या योजनेमध्ये लाभार्थी कामगारांना दर महिन्याला 50% रक्कम भरावी लागेल आणि 50% रक्कम केंद्र सरकारतर्फे योगदान देण्यात येणार आहे. ही एक प्रकारे PF सारखीच स्कीम आहे.
Shram Card Pension Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | ई-श्रम कार्ड पेन्शन योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकारने |
कधी सुरु केली | 2024 |
संबधित विभाग | Ministry of Labour and Employment |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
उद्देश | असंघटित क्षेत्रामधील कामगारांना आर्थिक मदत |
लाभार्थी | असंघटित क्षेत्रामधील कामगार वर्ग |
लाभ | प्रतिमहा 3000 रुपये पेन्शन |
अर्ज पद्धत | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | eshram.gov.in |
E Shram Pension Scheme Purpose
केंद्र सरकारने सुरु केलेल्या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाचे उद्देश भारत देशामधील असंख्य कामगार वर्गातील लोकांना आर्थिक मदत पुरवणे हे आहे. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गातील लोकांना म्हातारपणी सरकारी कर्मचाऱ्यांसारख्या काही सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना म्हातारपणी काही न काही अडचणींना सामोरे जावे लागते, अशातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या योजनेच्या मार्फ़त मिळणाऱ्या पेन्शनमुळे काही प्रमाणात त्यांना आर्थिक समस्यांना दूर करण्यात मदत होऊ शकते.
E Shram Pension Scheme Benefits
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाचे फायदे ई-श्रम कार्ड धारकांना होणार.
- या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे कामगारांना सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी आधार मिळेल.
- या योजनेमधून कामगार वर्गातील लोक 60 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रतिमहिना 3000 रुपये पेन्शन पाठवली जाणार.
- PM Shram Yogi Mandhan Yojana अंतर्गत नोंदणी केली असेल, तर कामगारांना एकूण 36,000 रुपयांचा लाभ वर्षाला प्राप्त करता येईल.
- या उपक्रमातून होणाऱ्या मदतीमुळे या वर्गातील लोकांचे उज्ज्वल भविष्य विकसित होण्यासाठी मदत मिळेल.
- या योजनेमध्ये असंघटित कामगारांमधील स्ट्रीट वेंडर्स, बांधकाम लेबर, रिक्षावाले, हॅन्डलूमवाले, शेतीसंबधित काम करणारे, मासेमारी करणारे, चिंद्यावाले इत्यादी वर्गातील लोक पात्र आहेत.
- जर 60 वर्षानंतर त्या व्यक्तीचे निधन झाले असेल, तर मिळणाऱ्या पेन्शनची 50% रक्कम ही त्या व्यक्तीच्या पत्नीला मिळणार.
ई-श्रम पेन्शन योजना पात्रता
- असंघटित क्षेत्रामधील कामगार वर्ग या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनासाठी पात्र ठरतील.
- हे कामगार भारत देशाचे मूळचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम कार्ड असणे महत्त्वाचे आहे.
- त्याचप्रमाणे, यामध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी PM Shram Yogi Mandhan Yojana अंतर्गत नोंदणी केलेली पाहिजेत.
- या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असणे.
- अर्ज करणारे कामगारांचे वय 18 ते 40 वर्षाच्या आत असणे.
- अर्जदाराचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत जोडलेले असणे गरजेचे आहे.
- त्याचसोबत यामध्ये सहभागी होणाऱ्यांचे EPFO/ESIC/NPS यामध्ये अकाउंट नसले पाहिजे.
E Shram Pension Yojana Required Documents
असंघटित कामगारांना अर्ज करताना ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाचे आवश्यक कागदपत्रे यांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- ई-श्रम कार्ड
- अर्जदाराचे आधारकार्ड
- पॅनकार्ड
- आधारकार्ड सोबत लिंक बँक खात्याचे पासबुक
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
E Shram Card Pension Yojana Online Registration
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर त्या वेबसाईटचे होम पेज उघडेल.
- त्या होम पेजवर तुम्हाला Schemes असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- Schemes वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PM-SYM च्या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.
- त्या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला योजनासंबंधीत सगळी माहिती प्राप्त होईल.
- त्याच पेजवर login चा पर्याय असेल त्यावर क्लिक करून घेणे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज खुलेल त्यामध्ये Self Enrollment च्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर विचारातील ते टाकून Proceed चे बटन दाबणे.
- तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो त्यामध्ये टाकणे.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर E Shram Pension Form उघडेल.
- त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती काळजीपूर्वक भरून घेणे.
- यामध्ये लागणारे सगळे कागदपत्रे स्कॅन करून करून अपलोड करणे.
- भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर त्या फॉर्मची पावती येईल ती प्रिंट करून सांभाळून ठेवणे.
- अशा प्रकारे तुमचा ऑनलाईन अर्ज यशस्वीरीत्या संपन्न होईल.
E Shram Card Pension Yojana Offline Registration
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जन सेवा केंद्र (CSC Center) ला भेट द्यावी लागेल.
- जन सेवा केंद्र (CSC Center) मध्ये गेल्यावर तेथील अधिकाऱ्याला या योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सांगा.
- त्यानंतर तुमचे आवश्यक सगळे कागदपत्रे त्या अधिकाऱ्याकडे जमा करा.
- त्यानंतर तुमचे ऑफलाईन अर्ज जन सेवा केंद्र (CSC Center) तर्फे करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज झाल्यानंतर ते तुम्हाला पावती देतील ते सांभाळून ठेवणे.
- जन सेवा केंद्र तर्फे अर्ज करून झाल्यावर तुमच्या कडून काही फी घेतील.
- अशा प्रकारे तुमचे ऑफलाईन प्रकियानुसार अर्ज पूर्ण होईल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
ई-श्रम कार्ड बनविण्यासाठी अर्ज प्रकिया
- सर्वात प्रथम तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल.
- त्या होम पेजमध्ये तुम्हाला Register On E Shram यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर आधारला लिंक असलेले मोबाईल नंबर विचारतील तो टाकून घेणे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
- तो OTP टाकून घ्या आणि वेरिफिकेशन करा.
- त्यानंतर तुमच्या समोर संबंधित अर्जासाठी फॉर्म उघडेल.
- त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमचे श्रम कार्ड तयार होईल.
E Shram Card Payment List 2024 Check
- सर्वात आधी ई-श्रम कार्ड पेमेंटची यादी तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजवर E Shram Card Payment List 2024 या पर्यायावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमच्या समोर पेमेंटची पूर्ण यादी प्राप्त होईल.
निष्कर्ष
आम्ही या लेखातून तुम्हाला E Shram Card Pension Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये सांगितली. यामध्ये आम्ही या योजनेचे मुख्य उद्देश काय? त्यांचे फायदे काय आहेत? त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र कोण आहेत? तसेच अर्ज करून लाभ घेण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकियांबद्दल सांगितले. त्या शिवाय श्रम कार्डसाठी कसे अर्ज करू शकतो? हे सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगितले.
आम्ही आशा करतो, आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेलच, जर आवडला असेल तर तुमच्या जवळील असंघटित कामगारांना हा लेख Share करून त्यांच्या भविष्यात होणाऱ्या आर्थिक समस्यांना दूर करायला मदत करा.
अशाच नवनवीन योजनांबाबतीत जाणून घेण्यासाठी आम्हाला Subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram व WhatsApp चॅनेलला जॉईन करून अपडेट्स घेऊ शकता.
FAQs
इ-श्रम कार्डसाठी कोण नोंदणी करू शकतो?
इ-श्रम कार्डसाठी भारत देशामधील असंघटित क्षेत्रामधील कामगार वर्ग नोंदणी करू शकतो.
श्रम कार्ड मधून 3000 रुपये कसे मिळवायचे?
श्रम कार्ड मधून 3000 रुपये 60 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही या योजने अंतर्गत पेन्शन मिळवू शकता.
श्रम योजनेचा फायदा काय आहे?
श्रम योजनेमधून देशामधील असंघटित क्षेत्रामधील कामगारांना 60 वर्षाचे झाल्यावर 3000 रुपये पेन्शन स्वरूपात रक्कम सरकारतर्फे मिळणार.
इ-श्रम कार्ड बनविण्यासाठी कागदपत्रे कोणते लागतील?
इ-श्रम कार्ड बनविण्यासाठी कागदपत्रे कामगारांचे आधारकार्ड आणि मोबाईल नंबर लागेल.
हे सुद्धा वाचा: