E Shram Card Benefits: या आर्टिकलमध्ये आम्ही ई श्रम कार्डचे कोणते फायदे आहेत? आणि योजनेमधून कोणाला फायदे दिले जातात? याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.
ई श्रम कार्ड ही एक पेन्शन योजना आहे. ज्याची सुरुवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली होती. या योजनेचा फायदा भारतामधील सर्व कामगार नागरिकांना दिला जातो. ज्याचे मुख्य उद्देश देशामधील असंघटित कामगारांना त्यांच्या उतार वयामध्ये त्यांची आर्थिक स्थिरता कायम ठेवणे आहे.
योजनेच्या माध्यमातून कामगारांना किती रुपयांची आर्थिक मदत केली जाते? आणि कोणत्या वर्षांमध्ये त्यांना पेन्शन सुरु करण्यात येते? हे लेखामध्ये पाहायला मिळेल.
ई श्रम कार्डचे फायदे
- भारत देशामधील कामगार वर्गाला त्यांच्या उतार वयामध्ये सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी या योजनेचा फायदा होतो.
- कामगार वर्गातील 18 ते 40 वयोगटामधील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतात.
- योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थ्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरु केली जाते.
- या पेन्शनद्वारे नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
- योजनेमधून असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना लाभ देण्यात येतो, ज्यामध्ये बांधकाम कामगार, रस्त्यावरील वेंडर्स, मासेमारी करणारे, शेती संबंधित क्षेत्रामध्ये कार्य करणारे, रिक्षा चालविणारे, चिंदीवाले आणि हॅन्डलूमचे वस्तू तयार करणारे यांना या कार्डचा फायदा दिला जातो.
- कामगार नागरिक योजनेच्या पोर्टलमध्ये जाऊन सहजरित्या श्रम कार्ड काढू शकतात.
- त्याचप्रमाणे ज्यांना ऑनलाइन प्रकिया जमत नाही, ते जन सेवा केंद्र (CSC) मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने काढू शकतात.
Read More: