E Shram Card Balance Check: घरी बसल्या 2 मिनिटांमध्ये चेक करा ई श्रम कार्डचे पैसे, जाणून घ्या प्रकिया

E Shram Card Balance Check: भारत सरकारने सुरु केलेल्या ई श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगार नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. ज्या कामगार नागरिकांनी योजनेमध्ये सहभागी होऊन ई श्रम कार्ड काढले आहेत, त्यांना सरकारच्या माध्यमातून पैसे पाठविले जातात. लाभार्थ्यांना हे पैसे ऑनलाइन तपासण्यासाठी आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकियांना फॉलो करावे लागेल.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

ई श्रम कार्डचा लाभ भारत देशामधील असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कामगारांना आर्थिक स्वरूपात दिला जातो. ही योजना एक पेन्शन योजना असून कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुरु केली होती.

Read More: E Shram Card Registration: श्रम कार्ड कसे काढायचे? या पद्धतीचा करा वापर

या योजनेच्या माध्यमातून कार्ड धारकांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 3000 रुपये प्रत्येक महिन्याला बँक खात्यामध्ये ट्रांसफर केले जाते. त्याचप्रमाणे एक कामगार त्यांच्या 18 वर्षापासून ते 40 वर्ष वयाच्या आत खाते उघडून प्रत्येक महिन्याला 55 रुपये ते 200 रुपयेपर्यंत रक्कम प्रीमियम स्वरूपात भरू शकतो.

ज्या नागरिकांनी योजनेमध्ये अर्ज करून आपले खाते उघडले आहे आणि पेन्शनचा लाभ घेत आहेत. त्यांना ई श्रम कार्डचे पैसे चेक करायचे असल्यास लेखामध्ये दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो कराव्या लागतील.

Read More: E Shram Card Benefits: ई श्रम कार्डचे फायदे काय आहे? घ्या जाणून

E Shram Card Balance Check कसे करायचे?

तुम्हाला मोबाईलद्वारे घरी बसल्या ई श्रम कार्डचे पैसे तपासण्यासाठी रजिस्ट्रेशन करतेवेळी जो कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, त्या नंबरवरून तुम्हाला 14434 यावर संपर्क साधायचा आहे.

दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला छोटी रिंग वाजून कॉल कट होईल आणि तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती पैसे शिल्लक आहेत?? त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मिळेल.