Deendayal Antyodaya Yojana 2024: दीनदयाळ अंत्योदय योजना हे National Rural Livelihood Mission चा भाग असून DAY-NRLM या नावाने ओळखले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योजनेच्या माध्यमातून मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेल्या गरिबी रेषेखालील नागरिकांना व्यवसायासाठी प्रशिक्षण देऊन आथिर्क स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आहे.
आपण आपल्या आजच्या लेखामध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना काय आहे? ती कधी सुरु करण्यात आली? कोनातर्फे सुरु करण्यात आली? त्यामध्ये कोणते मंत्रालय अंमलबजावणी करते? ती सुरु करण्यामागचे उद्देश काय होते? यामध्ये कोणते फायदे दिले जाते? कोणते नागरिक यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत?
तसेच यामध्ये कोणते फंडिंग पॅटर्न वापरले जाते? Self Help Group काय आहे? त्यांना किती कर्ज उपलब्ध करून दिले जातात? यामध्ये किती प्रकारच्या स्कीम्सचा समावेश आहे? अशा सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.
Deendayal Antyodaya Yojana in Marathi
दीनदयाळ अंत्योदय योजनाची सुरुवात जुन, 2011 रोजी Swarna जयंती ग्राम स्वरोजगार योजना (SGSY) या नावाने केली होती. परंतु 29 मार्च, 2016 रोजी केंद्र केंद्र सरकारतर्फे नावामध्ये दुरुस्थी करून DAY-NRLM असे ठेवण्यात आले. DAY म्हणजेच दीनदयाळ अंत्योदय योजना आणि NRLM चा अर्थ राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्रती अभियान असा होतो.
DAY-NRLM या योजनेची अंमलबजावणी Ministry of Rural Development (MoRD) करते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना स्वतःचे रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य प्रदान करते आणि त्याचसोबत रोजगारासाठी आर्थिक मदतसुद्धा करते. जेणेकरून ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेल्या स्त्री व पुरुषांना गरिबी रेषेमधून बाहेर काढण्यात मदत होईल.
Funding Support under Deendayal Antyodaya Yojana
दीनदयाळ अंत्योदय योजना ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे योजनेच्या खर्चामध्ये काही भाग केंद्र सरकारचा असतो तर काही भाग राज्य सरकारचा. योजनेमध्ये फंडिंगचे प्रमाण 75:35 असा ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार 75% रक्कम देते आणि 35% राज्य सरकार आर्थिक मदत करते.
परंतु काही प्रमुख राज्य आहेत, जसे डोंगराळ व केंद्र शासित प्रदेश यामध्ये केंद्र व राज्य सरकारमध्ये 90:10 प्रमाण ठेवले जाते. ज्यामध्ये केंद्र सरकार 90% खर्च करते आणि 10% राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च करण्यात येते. या प्रमुख राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मेघालया, मिझरोम, नागालँडमी त्रिपुरा, जम्मू व काश्मीर यांचा समावेश आहे.
जसे NRLM हे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्रती अभियान आहे, तसेच स्टेस्टमध्ये SRLM म्हणजे राज्य ग्रामीण जीवनोत्रती अभियान सुरु केले जाते. राज्यामध्ये SRLM चे बँक खाते असते, त्यामध्ये केंद्र सरकार आर्थिक मदत पाठवते. राज्य सरकार आपल्यानुसार त्या पैशांचे वापर योजनेमध्ये करतात. केंद्र व राज्य सरकारतर्फे योजनेमध्ये लागणार पैसे कुठे व कसे वापरले गेले हे जिल्हा पातळीवर तपासले जाते.
Deendayal Antyodaya Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | दीनदयाळ अंत्योदय योजना (DAY) |
प्रोग्राम | National Rural Livelihood Mission (NRLM) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु झाली | जून 2011 रोजी |
दुरुस्थी | 29 मार्च, 2016 रोजी |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशामधील गरिबी कमी करण्यासाठी गरिबांना प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगारासाठी तयार करणे |
लाभार्थी | ग्रामीण क्षेत्रामधील कुटुंब |
लाभ | कौशल्य प्रशिक्षण, रोजगार निर्मिती व आर्थिक मदत |
अर्ज प्रकिया | ऑनलाइन |
Deendayal Antyodaya Yojana Aim
दीनदयाळ अंत्योदय योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना अत्यंत गरिबीमधून बाहेर घेऊन येणे आहे. यासाठी केंद्र सरकार ग्रामीण क्षेत्रामध्ये Self Help Group (SHG) तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते. या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये गरिबी रेषेखालील लोकांचा समावेश केला जातो.
याच ग्रुपला आर्थिक मदत दिली जाते, परंतु त्यांना कौशल्य प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. जेणेकरून भविष्यात जरी आर्थिक अडचण आली तर प्रत्येक नागरिक आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतः पैसे कमविण्यासाठी सक्षम राहील. केंद्र सरकारचे याच प्रकारचे टिकाऊपणाचे रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांना तयार करणे व देशामधील गरिबी कमी करणे हे ध्येय आहे.
DAY-NRLM Mission Components
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्रती अभियानचे चार मुख्य घटक आहेत आणि या घटकानुसार योजनेचे संपूर्ण काम राबविले जाते, ते खालीलप्रमाणे सांगितले आहे.
Social Mobilization, Community Institution and Capacity Building
या मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावातील महिलांना सामाजिक एकत्रीकरण केला जाते, ज्यामध्ये SHG ग्रुपचा समावेश असतो. या SHG ग्रुपमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला सहभागी केले जाते. यामुळे एक समुदाय संस्था तयार करण्यात मदत होते. या संस्थेमधील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवली जाते.
Financial Inclusion
यामध्ये अशा ग्रुपला योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिले जाते. कारण काही ग्रामीण भागामध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध नसतात, त्याचप्रमाणे त्यांना पैशांची देवाण – घेवाण करण्यासाठी समस्या होतात.
Livelihood Promotion
या घटकांमधून गरिबीमध्ये असलेल्या सुरुवातीला महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ते सक्षम झाल्यानंतर त्यांना रोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते. म्हणजेच त्यांना स्वबळावर आत्मनिर्भर बनवून उत्पन्न कमविण्यासाठी मदत केले जाते.
Convergence
सेल्फ हेल्प ग्रुपला केंद्र सरकार बँकिंग सुविधा अंतर्गत रोजगार निर्माण करण्यासाठी मदत व्हावी यासाठी कर्ज उपलब्ध करून देते. त्याचसोबत आर्थिक साक्षरता सुद्धा प्रदान केली जाते. जेणेकरून लाभार्थ्याला आर्थिक लाभ घेण्यात मदत होते.
Deendayal Antyodaya Yojana Benefits
- दीनदयाळ अंत्योदय योजनाचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना दिले जातो.
- या योजनेच्या माध्यमातून सेल्फ हेल्प ग्रुपला विविध प्रकारचे सुविधा व फायदे उपलब्ध करून दिले जाते.
- ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार 25% फंड Aajeevika Skill Development Programme (ASDP) याना प्रदान करते.
- NRLM च्या माध्यमातून पब्लिक सेक्टर बँकांना सर्व जिल्ह्यांमध्ये Rural Self Employment Training Institutes उघडायला प्रोत्साहन देत आहेत.
- त्याचप्रमाणे नागरिकांना डिजिटल फायनान्स बद्दल माहिती देण्यासाठी National Economic Transformation Project सुद्धा चालू करण्यात आले.
- DAY-NRLM अंतर्गत जे SHG ग्रुप उघडले जाते, त्यामध्ये महिलांचे वेगळे समूह व पुरुषांचे वेगळे समूह तयार केले जाते.
- या SHG ग्रुपला केंद्र व राज्य सरकारकडून योजनेच्यामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Self Help Group (SHG) under DAY-NRLM
सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे गरीब लोकांचा एक समूह तयार केला जातो, ज्यामध्ये 10 ते 12 लोकांचा समावेश असतो. या ग्रुपमध्ये प्रत्येक गावातील कुटुंबामधील कोना एका नागरिकांचा समावेश केला जातो. अशा काही भागांमध्ये जिथे डोंगराळ क्षेत्र आहे आणि कमी कुटुंब आहेत, अशा परिस्थितीमध्ये 5 ते 10 जणांचा ग्रुप तयार केला जातो.
सेल्फ हेल्प ग्रुपच्या मदतीने समूहातील नागरिकांचे समस्या दूर करण्यासाठी आर्थिक व सामाजिक स्थरावर मदत करते. यांचे मुख्य उद्देश नागरिकांकडून योगदान गोळा करून सेविंग करणे आणि ज्या नागरिकांना गरज आहे त्यांना मदत करणे.
NABARD च्या माध्यमातून या ग्रुपचे निरीक्षण केले जाते. ज्यामध्ये ग्रुप व्यवस्थितरीत्या चालतो आहे का? ग्रुपचे सदस्य सर्व रिकॉर्ड ठेवत आहेत ना? त्यांचे हफ्त्यामधून सभा होते का? या गोष्टींचे निरीक्षण करून NABARD च्या माध्यमातून रेटिंग दिले जाते. या रेटिंगच्या मदतीने सेल्फ हेल्प ग्रुपला NRLM सहभागी केले जाते व विविध प्रकारचे सुविधा दिले जाते.
Deendayal Antyodaya Yojana under SHG Eligibility
- दीनदयाळ अंत्योदय योजनामध्ये पात्र सेल्फ हेल्प ग्रुप असणार आहेत.
- या सेल्फ हेल्प ग्रुपचे 6 महिने पूर्ण असणे आवश्यक आहे.
- पात्रतेसाठी ग्रुपला पंचसुत्रनुसार अटी फॉलो करणे.
- स्त्री व पुरुष एकत्र ग्रुपमध्ये सहभागी नसणे.
- ग्रुपने सर्व पेमेंट वेळेवर भरलेले असणे.
- NABARD नुसार रेटिंग असणे महत्त्वाचे आहे.
- यामध्ये जवळपास 70% पेक्षा जास्त BPL रेषेखालील नागरिकांचा समावेश असणे.
Financial Assistance to SHG under Deendayal Antyodaya Yojana
- दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत केंद्र सरकार एका ग्रुपला 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंतचा Revolving Fund (RF) सपोर्ट प्रदान करते.
- योजनेच्या माध्यमातून ग्रुपला 3 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्द करते, यामध्ये बँक 7% प्रमाणे वर्षाला व्याज दर लागू करते.
- त्याचप्रमाणे दिलेल्या वेळच्या आधी लोन चुकते केले तर 7% मधील 3% बँकेतर्फे सूट देण्यात येते.
- जर ग्रुपला 5 लाखांचे लोन हवे असल्यास बँक 10% प्रमाणे व्याज दर घेते.
- DAY-NRLM अंतर्गत रजिस्टर असलेल्या SHG ग्रुपमधील एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज Pradhan Mantri Mudra Yojana अंतर्गत दिले जाते.
- SHG सदस्यमधील नागरिकाचे बँक खाते Pradhan Mantri Jan Dhan Yojana मध्ये असेल, तर 5,000 रुपयांपर्यंत overdraft सुविधासुद्धा पुरविली जाते.
- त्याचप्रमाणे 10 लाखांपर्यंत लोन प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठेव व मार्जिन घेतले जात नाही.
निष्कर्ष
या लेखाच्या माध्यमातून Deendayal Antyodaya Yojana, National Rural Livelihood Mission आणि सेल्फ हेल्प ग्रुप संबंधित संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली. ज्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिक कशापद्धतीने लाभ घेऊ शकतात? त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा फायदा दिला जातो? कशाप्रकारे त्यांची गरीबी कमी केली जाते? ग्रुप कशाप्रकारे खोलू शकतो? यामध्ये कोणत्या नागरिकांचा समावेश केला जातो? केंद्र व राज्य सरकारकडून किती आर्थिक मदत दिली जाते? ग्रुप किती रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकतात? आणि योजनेमध्ये कशा पद्धतीने काम चालते? या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली.
आमच्या लेखातून दीनदयाळ अंत्योदय योजना संबंधित माहिती उपयुक्त वाटली असेल तर ग्रामीण क्षेत्रातील नागरिकाना पाठवून त्यांना गरिबीमधून बाहेर पडण्यासाठी मदत करा. अशाच फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी तुम्ही योजना मीडियाच्या वेबसाइटला Subscribe करा.
FAQs
DAY-NRLM चा अर्थ काय आहे?
DAY-NRLM चा अर्थ दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्रती अभियान असा आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुपचे सदस्य पात्र आहेत.
दीनदयाळ अंत्योदय योजनेमधून किती कर्ज दिले जाते?
Deendayal Antyodaya Yojana मार्फत 3 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
पुढे वाचा: