Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana 2024: Ultimate Guide in Marathi

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana 2024: केंद्र सरकारने ग्रामीण क्षेत्रातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक प्रशिक्षण देण्यासाठी दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार ग्रामीण भागातील तरुण पिढींना 30 विविध क्षेत्रामधील कौशल्य प्रशिक्षण प्रदान केले जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकाने 2014 रोजी अंत्योदय दिवस साजरी करताना DDU-GKY योजनाची घोषणा केली. जेणेकरून ग्रामीण क्षेत्रामधील तरुणांना योग्य शिक्षण प्राप्त होऊन त्यांना रोजगारासाठी मदत मिळेल. यामध्ये तरुणांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून दिले जाते. ज्यामध्ये कमी कमी 6 हजार रुपये तरुणांना नोकरीमधून पगार मिळावा. 

आज आपल्या लेखाच्या माध्यमातून दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजना काय आहे? त्याचे मुख्य उद्देश काय आहेत? ती का सुरु करण्यात आली होती? कोणत्या व किती राज्यांना योजनेमध्ये सहभागी करण्यात आले आहेत? त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टींचा फायदा करून दिले जातो? त्यांना लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या कोणत्या अटींची गरज आहे? आणि योजनेची अंमलबजावणी कोण व कोणत्या आधारे केले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत, तर आर्टिकल शेवटपर्यंत पहा. 

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana in Marathi 

केंद्र सरकारने दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाची सुरुवात 25 सप्टेंबर, 2014 रोजी केली होती आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने अंत्योदय दिवस 2014 रोजी DDU-GKY ची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जवळपास 27 राज्यांमध्ये व 4 केंद्र शासित प्रदेशांमध्ये या प्रोग्रामची अंमलबजावणी केली जात आहे. 

या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार उद्योगाप्रमाणे दरवर्षी विविध क्षेत्रांमधील कौशल्याचे प्रशिक्षण प्रदान करतात आणि लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये जॉईन करून दिले जाते. ज्यामधून त्यांना विशेष क्षेत्रानुसार पगार मान्य केला जातो. 

 Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Implementation Model 

दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाच्या माध्यमातून तीन स्थरांप्रमाणे अंमलबजावणीच्या मॉडेला फॉलो करावे लागते ते खालीलप्रमाणे दिले आहेत. 

  • DDU-GKY अंतर्गत नॅशनल युनिट तयार केले जाते, ज्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाला पोलिसी तयार करण्यासाठी, टेक्निकल आधार आणि सुविधा एजन्सी उपलब्ध करून देण्याचे काम केंद्र सरकार करते. 
  • मिशन अंतर्गत योजनेसाठी अंमलबजावणी स्पोर्ट राज्य सरकार प्रदान करतात. 
  • योजना अंतर्गत Project Implementing Agencies (PIAs) तर्फे प्रोग्राम तयार केले जातेआणि लाभार्थ्यांना प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रोजेक्टची अंमलबजावणी केले जाते.

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana 2024 Overview

योजनेचे नावदीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
मिशनराष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्रती अभियान (NRLM)
विभागग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार
लाँच केले25 सप्टेंबर, 2014 रोजी
कोणी लॉंच केलीकेंद्र सरकारने
उद्देशग्रामीण भागातील तरुण पिढींना योग्य कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करणे
लाभार्थीग्रामीण क्षेत्रामधील SC, ST, PWD, PVTG व महिला वर्ग
लाभ30 पेक्षा जास्त कौशल्य प्रशिक्षण व नोकरीची संधी
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटddugky.info

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Objectives 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना योग्य प्रशिक्षण प्रदान करून त्यांना चांगले उत्पन्न कमविण्यासाठी सक्षम बनविणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील प्रत्रेक तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत होईल. त्याचसोबत भविष्यामध्ये आपले जीवन उज्ज्वल बनवेल. 

योजनेच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिबी रेषेखालील व तसेच अनुसूचित जाती-जमातीमधील तरुणांना आणि महिलांना दर महिन्याला चांगले पगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्यामध्ये त्यांना कौशल्य योग्यरित्या प्राप्त करून देणे हे ध्येय सरकारने ठेवले आहेत. 

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Benefits 

  • दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाचे फायदे ग्रामीण भागातील गरिबी रेषेखालील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी होतो. 
  • या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमाती, गरिबी रेषेखालील नागरिक व महिला सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 
  • DDU-GKY हा National Rural Livelihood Mission (NRLM) चा भाग आहे, ज्यामध्ये गरिबी कमी करण्यासाठी मिशन चालविले जाते. 
  • या योजनेमध्ये BPL कार्ड धारकांना कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिले जाते, ज्यामधून ते स्वतःला सुशिक्षित बनवतील.
  • लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांचे देशभरामध्ये नियोक्ती करण्यासाठी लागणारे खर्च ग्रामीण विकास मंत्रालय करते. 
  • योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. म्हणजेच केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबातील तरुणांसाठी मोफत शिक्षण मिळण्यास मदत होते. 
  • योजने अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील 50%, महिला वर्गामधील 33%, PWD वर्गातील ३% आणि अल्पसंख्यामधील 15% तरुण व तरुणींसाठी जागा राखीव ठेवण्यात येते. 
  • केंद्र सरकारने योजनेच्या माध्यमातून कमीतकमी ७५% प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात येईल अशी हमी देण्यात आली. 
  • या लाभार्थ्यांचे पगार 6,000 रुपयांपेक्षा जास्त पगार दर महिन्याला असणार. 
  • ज्या जिल्ह्यांमधील लाभार्थी आहेत, त्यांना प्लेसमेंटच्या आधी 1000 रुपये प्रदान केले जाते. 
  • तसेच जर लाभार्थी राज्यामध्ये प्रशिक्षण घेत असेल तर त्यांना ३ महिन्यामध्ये रक्कम दिली जाते. 
  • यामध्ये जर प्लेसमेंट राज्याच्या बाहेर असेल तरी सुद्धा आर्थिक फायदे दिले जाते. 
  • त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून विदेशी क्षेत्रामध्ये सुद्धा प्लेसमेंट केले जाते, ज्यामध्ये लाभार्थ्यांचे पगार जवळपास 30 हजार रुपयांच्या वरती असते. 
  • केंद्र सरकारने जमू आणि काश्मीर राज्यामधील गरीब ग्रामीण तरुणांना प्रकल्पाचा लाभ देण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत. त्यांच्या HIMAYAT नावाने प्रोजेक्ट चालू करण्यात आला होता. 
  • तसेच उत्तर-पूर्व प्रदेश आणि जोखीम असलेल्या 27 जिल्ह्यांमध्ये ROSHINI नावाने प्रोजेक्ट चालू केला होता. 
  • DDU-GKY योजनाच्या माध्यमातून भारत देशामध्ये 877 project Implementation Agencies गरीब विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. 
  • केंद्र सरकारतर्फे योजने अंतर्गत देशभरात जवळपास 2,369 कौशल्य प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात आलेले आहेत. 

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Eligibility

ग्रामीण भागातील नागरिकांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाची पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्र असणे गरजेचे आहेत. 

  • DDU-GKY योजनेमध्ये अर्ज करणारा तरुण वर्ग भारत देशाचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे वय 15 ते 35 वर्षापेक्षा जास्त नसावी. 
  • अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती व जमाती, असुरक्षित आदिवासी गट, महिला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यामधील असल्यास पात्र असणार आहेत.
  • त्याचप्रमाणे SC, ST, PVTG, PWD आणि महिला वर्गातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी ४५ वयापर्यंत 10 वर्ष अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 
  • केंद्र सरकारने योजनेमध्ये महिला वर्गाचा 1/3 म्हणेज 33.33% सहभाग असणे बंधनकारक केले आहेत. 
  • BPL कार्ड असलेले तरुण वर्ग योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. 

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Training Duration

दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत होणाऱ्या प्रशिक्षणाचे कालावधी विविध क्षेत्राच्या विषयावर अवलंबून आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे तास प्रशिक्षण दिले जाते. 

Training DurationTotal Hours 
3 महिने प्रशिक्षण 576 तास 
6 महिने प्रशिक्षण 1152 तास 
9 महिने प्रशिक्षण 1728 तास 
12 महिने प्रशिक्षण 2304 तास 

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Required Documents 

अर्ज करणाऱ्या तरुणांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालीलप्रमाणे यादीनुसार कागपत्रांची माहिती सांगितली आहे. 

  • तरुणांचे आधारकार्ड 
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • दारिद्रय रेषेखालील पुरावा BPL कार्ड (असेल तर) 
  • ओळखपत्र 
  • अंत्योदय अन्न योजनाचे कार्ड (पर्यायी) 
  • अल्पसंख्यामधील असतील तर स्वतःचे हमीपत्र 
  • मनरेगा कार्ड (पर्यायी) 
  • सेल्फ हेल्प ग्रुप पुरवा (पर्यायी) 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजनेमध्ये लाभार्थी असेल तर पुरावा 
  • अपंगत्वत असल्यास पुरावा 

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana Registration 

तरुणांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना फॉलो करून अर्ज करू शकता आणि लाभ मिळवू शकता. 

  • DDU-GKY अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला Kaushal Panjee ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
  • कौशल पंजी वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला Candidate Registration असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला Registration Type पर्यायांमध्ये जावा. 
  • त्यामध्ये गेल्यावर Fresh/New Registration या ऑपशनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर योजने संबंधित माहिती विचारली जाईल ती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • माहिती भरून घेण्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटन दाबणे. 
  • फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला Registration ID मिळेल तो जपून ठेवा. 
  • अशा पद्धतीने योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या प्रक्रिया करू शकता.

निष्कर्ष 

आमच्या या लेखामधून तुम्हाला Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana संबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शन करण्यात आले. ज्यामध्ये योजनाची सुरुवात का करण्यात आली? कोणासाठी करण्यात आली? कधी करण्यात आली? त्यांची अंमलबजावणी कोण करत आहेत? कोणकोणते फायदे यामधून तरुणांना होणार? योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे उद्देश काय आहेत? त्यामध्ये कोणकोणते नागरिक सहभागी होण्यासाठी पात्र असणार? किती कालावधीचा कोर्स प्रदान केले जाते? अशा सर्व गोष्टींबद्दल सांगितले. 

ग्रामीण क्षेत्रामधील गरीब घराण्यामधील आणि दारिद्रयमध्ये फसलेल्या कुटुंबासाठी गिरबीमधून बाहेर काढण्यासाठी तसेच आपल्या मुलांना मोफत व चांगले शिक्षण प्रदान करण्यासाठी योग्य योजना आहे. 

तुम्ही सुद्धा ग्रामीण क्षेत्रामधील आहात आणि पात्र असतील तर केंद्र सरकारने सुरु केलेल्या दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्या आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा. 

FAQs

DDU-GKY चा पूर्ण अर्थ काय आहे? 

DDU-GKY चा पूर्ण अर्थ दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना असा आहे. 

दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेची सुरुवात कधी झाली? 

केंद्र सरकारच्यामार्फत या योजनेची सुरुवात अंत्योदय दिवसानिमित्त 25 सप्टेंबर, 2014 रोजी करण्यात आली. 

दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी कोण पात्र असणार आहे? 

या योजनेमध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला वर्ग, विशेषतः असुरक्षित आदिवासी समाजामधील तरुण आणि सार्वजनिक बांधकाम कामगार वर्ग पात्र असणार आहेत.  

पुढे वाचा: