Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024: 100% अनुदान फळबागांची शेतकऱ्यांना मिळणार, असा घ्या लाभ

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024: महाराष्ट्र शासनातर्फे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांना विविध शेती प्रकिया व त्यातून मिळणाऱ्या उत्पादन वाढीसाठी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील शेतकरी वर्गातील नागरिकांना फळबागांच्या लागवडीसाठी 100% अनुदान प्रदान केले जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारने अनुसूचित जाती व जमाती आणि इतर वर्गातील शेतकरी वर्गाला योगदान मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली होती. परंतु त्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना अर्ज करून सुद्धा लाभ मिळाले नाही. 

तसेच काही शेतकऱ्यांना पात्रता नसल्यामुळे सुद्धा वगळण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांना योगदान प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2018-19 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणली. 

महाराष्ट्रामधील शेतकरी वर्गाला विविध प्रकारच्या कृषी पद्धतीमधून उत्पन्न वाढ होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हे महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच योजने संबंधित आपण आर्टिकलमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. 

त्याचसोबत कोणकोणत्या फळ पिकांसाठी अनुदान देण्यात येणार? कोणकोणत्या फळबागांसाठी किती अनुदान प्रदान करण्यात येतो? शेतकरी वर्ग कशा प्रकारे फायदा घेऊ शकतात? त्याचसोबत योजनेसाठी असणाऱ्या अटी, पात्रता आणि सूचना याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana in Marathi 

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आणि या योजनेची अंमलबजावणी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत करण्यात येते. 

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी लाभार्थ्यांना विविध फळबागांची लागवड करण्यासाठी 100% अनुदान प्रदान करण्यात येते. हे प्रदान करताना शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये आर्थिक अनुदान दिले जाते, ते म्हणजे पहिल्या वर्षाच्या टप्प्यात 50%, दुसऱ्या वर्षामध्ये 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% प्रमाणे अनुदान देण्यात येते.

Fruit Crops under Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनामध्ये समावेश असलेल्या फळ पिकांची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

  • आंबा 
  • काजू 
  • पेरू 
  • डाळिंब 
  • संत्रा 
  • मोसंबी 
  • लिंबू 
  • नारळ 
  • सीताफळ 
  • आवळा 
  • चिंच 
  • जांभूळ 
  • कोकम 
  • फणस 
  • अंजीर 
  • चिकू 

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Details

योजनेचे नावभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
सुरु केलीमहाराष्ट्र सरकारने
कधी सुरु केली06 जुलै, 2018 मध्ये
डिपार्टमेंटकृषी विभाग, महाराष्ट्र शासन
उद्देशराज्यामधील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी योगदान प्रदान करणे
अनुदान100%
लाभार्थीशेतकरी बांधव
लाभफळ बाग लागवडीसाठी पूर्ण सबसिडी
अर्ज प्रकियाऑनलाईन
हेल्पलाईन नंबर022-61316429

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Objectives 

शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाचे मुख्य उद्देश त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात मदत करणे आहे. त्याचप्रमाणे काही पिकांच्या शेती महाराष्ट्रात होत असल्याकारणामुळे विविध प्रकारच्या पीक रचनेच्या वापर करण्यास प्रोत्साहन देणे. 

तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कच्च्या मालाच्या प्रकिया उद्योगांमध्ये उत्पादनाची वाढ होण्यास मदत करण्यासाठी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान प्रदान केले जाते. 

जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये एकाच शेतीच्या प्रकारावरती अवलंबून राहता येणार नाही. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पिकांची शेती वाढल्यामुळे उत्पन्न वाढ होण्यास सुद्धा मदत होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Eligibility 

शेतकऱ्यांना अर्ज करून लाभ मिळविण्यासाठी आधी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनामध्ये पात्रता असणे आवश्यक आहे, त्यासाठी खालीलप्रमाणे काही अटी शासनाने लागू केल्या आहेत. 

  • योजनेमध्ये अर्ज करणारे नागरिक शेतकरी असून ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे. 
  • ही योजना संस्थात्मक कृषी कार्यास नसून ती फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांसाठीच आहे. 
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन संच फळबाग लागवडी करताना असणे बंधनकारक आहे. 
  • ज्या शेतकऱ्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्यांना शासनेतर्फे पहिले प्राधान्य देण्यात येणार. 
  • नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावानुसार 7/12 कागदपत्रे असली पाहिजेत. 
  • त्याचप्रमाणे कुळाची नावे 7/12 कागदपत्रांवर असल्यास कुळाची समिती असणे बंधनकारक आहे. 
  • तसेच शेतीमध्ये संयुक्त मालकी असेल तर अर्ज करत असलेले व्यक्ती त्यांच्या मर्यादित हिशेनुसार योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. 
  • ज्या नागरिकांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामध्ये लाभ घेतले असतील ते या योजनेसाठी पात्र नाही. 
  • परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 प्रमाणे वनपट्टे धारक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मान्यता दिली आहे. 
  • दिव्यांग, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरींना योजनेमध्ये प्राधान्य दिले जाते.
  • कोकण क्षेत्रातील शेतकऱ्यांना जास्तीस्त जास्त 10 हेक्टर आणि उरलेल्या महाराष्ट्र राज्यामधील अन्नदात्यांना 6 हेक्टर फळबाग लागवडीचा योजनेमधून लाभ देण्यात येणार. 
  • तसेच एक अर्जदार शेतकरी एका पेक्षा जास्त फळ पिकांसाठी अर्ज करू शकतो. 

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Required Documents 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनामध्ये ऑनलाइन अर्ज करतेवेळी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे क्रमानुसार यादी मांडण्यात आलेली आहे. 

  • जमिनीचा 7/12
  • 8A उतारा 
  • जमिनीचे मालकी हक्क कागदपत्रे 
  • शेतकरी अर्जदाराचे हमीपत्र 
  • खातेदारकाचे संमतीपत्र (संयुक्त खातेदार असतील तर) 
  • जातीचा पुरावा 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खात्याचे पुरावे

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Online Registration

शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रकिया शोधत असतील, ते खालीलप्रमाणे सविस्तारित्या स्टेप बाय स्टेप सांगण्यात आलेल्या आहेत. 

पोर्टलसाठी लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे 

  • फळबाग लागवड योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला Mahadbt ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. 
  • महाडीबीटी पोर्टलच्या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर तुम्हाला ज्यांच्या नावाने योगदान घ्यायचे आहे, त्यांचे संपूर्ण नाव भरून घ्या.
  • अर्जदाराचे नाव भरल्यानंतर वापरकर्त्याचे नाव त्यामध्ये तुम्ही आधार क्रमांक देखील टाकला तरीही चालेल. 
  • पुढे तुम्हाला एक सुरक्षित पासवर्ड तयार करून घ्यावा लागेल. 
  • पासवर्ड तयार करून दोन वेळा विचारलेल्या ठिकाणी टाकून घेणे. 
  • त्यानंतर तुम्हाला ई-मेल आयडी विचारले असतील ते भरू शकता किंवा नाही भरले तरी चालेल. 
  • पुढे मोबाईल नंबर विचारला असेल तो भरून घेणे. 
  • मोबाईल नंबर भरल्यानंतर वेरिफिकेशन करण्यासाठी ओटीपी पाठवला जाईल तो त्यामध्ये टाकून घेणे. 
  • नंतर कॅप्चा कोड दिसेल तो व्यवस्थित भरून नोंदणी करा यावर क्लिक करा. 
  • तुमचा पोर्टलसाठी लागणार आयडी पासवर्ड तयार झालेला आहे, तो कुठे तरी नोंद करून ठेवा. 

फळबाग लागवड योजनामध्ये अर्ज करणे 

  • आयडी व पासवर्ड नोंद केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल. त्यामध्ये कृषी विभाग नाव दिसेल, त्यापुढे अर्ज करा असे पर्याय असेल त्यावर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये 3 प्रकारचे पर्याय बघायला मिळेल. त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा आणि फलोत्पादन असे ऑपशन दिसतील. 
  • त्या तिन्ही पर्यायांमधील फलोत्पादन ऑपशनची निवड तुम्हाला करायची आहे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण भाऊसाहेब फुंडकर फळभाग लागवड योजनाचा फॉर्म उघडेल येईल. 

फळभाग लागवड योजनाचा फॉर्म भरणे 

  • फलोत्पादन फॉर्ममध्ये सुरुवातीला तुमचा तालुका, गाव/शहर आणि तुमचे सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक कोणता आहे? तो निवडणे. 
  • त्यानंतर मुख्य घटक फलोत्पादन निवड करा आणि घटकाचे प्रकारामध्ये इतर घटक असा पर्याय निवडा. 
  • पुढे बाब विचारली असेल, त्यामध्ये बाग लागवड (फळे, फुले, मसाले) याची निवड करा. 
  • उपघटक व बाब टाकून घ्या आणि योजनामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड हे सिलेक्ट करा. 
  • त्यानंतर तुम्हाला कोणत्या फळ पिकासाठी अनुदान पाहिजे आहे? त्याची संपूर्ण यादी येईल त्यामधील एकाची निवड करणे. 
  • पुढे लागवडीचा प्रकार विचारला जाईल त्यामध्ये कलम करणे व रोपे यामधील एकाची निवड करणे. 
  • त्यानंतर पिकातील अंतर 10 x 10 चे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. 
  • तुम्हाला हरितगृहाचा प्रकार व मॉडेल नंबर निवडावा लागेल. 
  • तुमच्या फळबागसाठी प्रस्थावित क्षेत्र हेक्टर व गुंठा प्रमाणे किती आहे? त्यांची नोंद करून घेणे. 
  • नोंद केल्यावर जतन करा हा बटन दाबा. 
  • जतन केल्यानंतर तुमच्या समोर बॉक्स उघडून येईल, त्यामध्ये तुम्हाला आणखी एका पिकासाठी अर्ज करायचा असेल तर Yes करा अन्यथा No वर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज येईल, त्यामधील वरच्या बाजूला अर्ज सादर करा या ऑपशनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर पॉप अप बॉक्स उघडून येईल, त्यामध्ये OK चे बटन दाबणे. 
  • पुढे पहावर जाऊन तुमच्या समोर अर्ज केलेल्या पिकांची यादी दिसेल. 
  • जर तुम्हाला काही बद्दल किंवा आणखी पिके निवडायची असल्यास अर्ज करून घेणे. 
  • त्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यावर सर्व अर्ज केलेल्या पिकांची माहिती तक्त्यानुसार दिसेल. 
  • त्यानंतर तुम्हाला अटी शर्ती व सूचना याबद्दल माहिती दिली असेल ती टिकमार्क करून अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. 
  • पुढे तुम्हाला अर्जाची काही छोटी रक्कम भरावी लागेल.
  • त्यामध्ये तुम्हाला पेमेंटसाठी विविध प्रकारच्या ऑपशन दिसतील, तुमच्या सोयीनुसार पैसे भरणे.  
  • पैसे भरल्यानंतर तुम्हाला अर्ज केल्याची व फी भरल्याची पोचपावती मिळेल. 

निष्कर्ष 

आर्टिकलच्या माध्यमातून Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana काय आहे? त्यामधून शेतकरी वर्गाला कसा फायदा मिळतो? कोणत्या प्रकारचे पिके फळबागांमध्ये लागवड करू शकतो? योजनेचे मुख्य लक्ष्य काय आहे? कोणत्या विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान प्रदान करण्यात येते? कोणते शेतकरी नागरिक योजनेसाठी पात्र आहेत?

कोणत्या पद्धतीने शेतकरी नोंदणी करू शकतात? अर्ज करण्यासाठी कोणते पोर्टल उघडण्यात आलेले आहेत? त्याचप्रमाणे अर्जाच्या वेळेला आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकिया करावे लागणार? या सर्व प्रश्नांची माहिती सोप्या पद्धतीने सांगण्यात आल्या.

Read More: