Beti Bachao Beti Padhao Yojana 2024: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 रोजी मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (BBBP) सुरु केली होती. केंद्र सरकारने ही योजना मुलींना चांगले शिक्षण मिळावे, आर्थिक सुरक्षा देणे आणि मुलींवरती होणाऱ्या भेदभावांना कमी करणे यासाठी सुरु केली आहे.
2011 च्या जनगणना लिंग प्रमाण पाहिले तर, त्यामध्ये मुलांच्या संख्यपेक्षा मुलींची संख्या फार कमी आहे. यामध्ये काही मुलींना शिक्षण आणि तिचे भविष्य उज्ज्वल सुद्धा करून दिले जात नाहीये. यामुळे मुलींना अशा गोष्टीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी केंद्र सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमाची सुरुवात केली होती.
तर आज आपण या लेखात याच योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये योजना का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? कशासाठी सुरु केली? कधी सुरु केली? सुरु करण्यामागील उद्देश काय होते? यांचे फायदे काय आहेत? यामध्ये काम कसे केले जाते? यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती आहेत? यासाठी अर्ज कशाप्रकारे करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात यासाठी शेवटपर्यंत लेख पहा.
Beti Bachao Beti Padhao Yojana in Marathi
हरियाणामधील पानीपत जिल्ह्यामध्ये प्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाची सुरुवात 22 जानेवारी 2015 रोजी केली होती. भारताच्या 2001 च्या जनगणनानुसार 1000 मुलांच्या तुलनेत 927 मुली आणि 2011 च्या जनगणनानुसार 1000 मुलांच्या तुलनेत 943 मुली यामध्ये फक्त थोड्या प्रमाणातच मुलीची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु मुलींच्या संख्यांमध्ये जास्त काहीसुधार दिसून येत नाही.
यासाठी केंद्र BBBP म्हणजेच बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहीम हाती घेतली. यामध्ये महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, कुटुंब कल्याण मंत्रालय व शिक्षा मंत्रालय या चार प्रकारचे मंत्रालय संगठीत काम करत आहेत.
या योजनेमध्ये केंद्र सरकारने त्यावेळेला 100 जिल्ह्यांसाठी 100 कोटी रुपयांची आर्थिक मदतीने सुरु केली होती. यामधून मुलींसोबत होणारे भेदभाव थांबविणे, लिंग चाचणी थांबविणे, सुरक्षा सुनिश्चित करणे, स्त्री व पुरुष समान भागीदारी देणे, जागरूकता वाढविणे तसेच त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन गुणवत्ता वाढविणे यांसारखे उपक्रम योजनेच्या माध्यमातून केले जाते.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना माहिती 2024 Overview
योजनाचे नाव | बेटी बचाओ बेटी पढाओ योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु केली | 22 जानेवारी, 2015 |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
उद्देश | भारतामधील मुलीचे प्रमाण वाढविणे व शिक्षा प्रदान करणे |
लाभार्थी | भारतामधील मुली |
अधिकृत वेबसाइट | https://wcd.nic.in/bbbp-schemes |
Beti Bachao Beti Padhao Scheme Aim
हरियाणामध्ये मुलानांच्या तुलनेत मुलींची संख्या सगळ्यात कमी होती, यासाठी केंद्र सरकारने वर्ष 2015 रोजी हरियाणा राज्यातून पहिली सुरुवात केली होती. यामागे केंद्र सरकारचे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाचे मुख्य उद्देश देशामधील लिंग प्रमाणात सुधार आणणे आणि मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षा प्रदान करणे होते.
त्यावेळेस समाजामध्ये मुलींना उच्च दर्जा दिला जात नव्हता. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुषांना घेऊन प्रत्येक क्षेत्रात भेदभाव केले जात होते. काही लोकांना मुलीचा जन्म नको म्हणून मुल पाडलं जात होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सुरक्षेला घेऊन समस्या होत होत्या. मुलींना शिक्षण करून दिले जात नव्हते.
अशा प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने BBBP योजनाची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून मुलींना चांगले शिक्षण प्रदान करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा हेतू सरकार करते आहे.
Beti Bachao Beti Padhao Yojana Benefits
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाचे फायदे देशभरातील राज्यात, जिल्ह्यात व गावांमध्ये मोहीम चालवली जाते.
- या होणाऱ्या मोहिमेमुळे देशामधील बाल लिंग गुणोत्तरमध्ये वाढ व समान भागीदारी देण्यात आली.
- त्याचप्रमाणे या योजनेतून विविध प्रकारचे सुविधा केंद्र सरकार पुरवत आहेत जसे मेडिकल खर्च व खर्चामध्ये आर्थिक भर कमी करण्यासाठी सबसिडींचा लाभ दिला जातो.
- केंद्र सरकारने भविष्यात होणाऱ्या शिक्षणासाठी व लग्नाच्या खर्चासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. यातून कुटुंबातील सदस्य काही रक्कम भरून भविष्यात मोठी गुंतवणूक वाढीसाठी सरकारकडून व्याज जास्त दिली जाते.
- साकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या अशा योजनांमुळे कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचे चिंता न करता फायदा घेण्यात मदत होते व मुलींचे जीवन उज्ज्वल करण्यात प्रोत्साहन मिळते.
- यामध्ये कोणत्याही प्रकारचे डायरेक्ट बेनेफिट नाही मिळत, यामध्ये विविध प्रकारचे योजना चालू करून विविध कार्यालयांच्या माध्यमातून यामध्ये सुधार आणण्यात मदत होते.
- केंद्र सरकारने सुरुवातील 100 जिल्ह्यांमध्ये मोहीम राबिवली होती, परंतु जुलै 2022 मध्ये ही योजना संपूर्ण भारतमध्ये लागू करण्यात आलेली आहे.
Beti Bachao Beti Padhao Yojana Beneficiaries Target Groups
श्रेणी | वर्णन |
प्राथमिक | पहिले व महत्त्वाचे प्राधान्य आई-वडील, तरुण आणि नवविवाहित जोडपे, गर्भवती महिला व स्तनपान करणारी आई |
माध्यमिक | तरुण पिढी, मुलगा व मुली, वैयक्तिक हॉस्पिटल, नर्सिंग होम, सासर परिवार, डॉक्टर व डायग्नोस्टिक सेंटर |
तृत्तीयक | जागरूकता पसरवणारे लोक जसे अधिकारी वर्ग, धार्मिक नेता, स्वयंसेवी संस्था, फ्रंटलाइन कार्यकर्ता, महिला एसएचजी/सामूहिक, पीआरआई, मीडिया, उद्योग संघ, डॉक्टर संघ व इतर लोकांचा समूह |
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अंतर्गत OSC Centers उभारले जातील
देशामध्ये जागरूकता पसरविण्यासाठी तसेच विविध प्रकारचे सुविधा लाभ देण्यासाठी डिजिटल मीडियाचा उपयोग केला जात होता, परंतु आता या योजनामध्ये काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना जास्त प्रमाणात प्रभाव पाडण्यासाठी 300 नवीन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
या 300 नवीन केंद्राच्या माध्यमातून महिलांना होणाऱ्या हिंसामधून मदत करण्यासाठी वन स्टॉप सेंटर आणि आत्मरक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये OSC सेंटरमध्ये 12 वर्षाखालील मुला व मुलींना पाच दिवसाचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांकडून दिले जाणार आहे.
Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 Administration
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात केंद्र सरकारतर्फे करण्यात आली.
- ही मोहीम केंद्रातील व राज्यामधील जिल्हा अधिकारी आणि जिल्हा मजिस्ट्रेट यांच्यातर्फे राबविण्यात येते.
- जिल्हा अधिकारी आणि जिल्हा मजिस्ट्रेट यांच्या कार्यालयाला केंद्र सरकारकडून योजनांसाठी आर्थिक मदत दिली जाते.
- योजनांच्या अर्थ संकल्पनेत नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारी महिला व बाल विकास मंत्रालयाला दिली जाते.
- यामध्ये योजना संबंधित जबाबदार हे महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव संचालक व संबंधित अधिकारी असतील.
- योजनेच्या अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामधील डीओपी हे नोडल अधिकारी असतील.
- आईसीडीसी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या योजना लागू करण्यात येतात.
BBBP Yojana Reporting
- केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनांची ऑनलाइन सूचना प्रणाली निरीक्षण करण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी विकसित केली आहे.
- प्रत्येक जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांना वेबसाइटवर ऑनलाइन MIS लाईव्ह केल्यामुळे प्रवेश करण्यासाठी नाव व पासवर्ड दिलेला आहे.
- यामध्ये जिल्हा, ब्लॉक व ग्रामपंचायत स्थरांवरती सेवा सुधारण्यासाठी मोहीम राबविणे
- DM व DC यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची निवड केली जाते.
- योजना संबंधित राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे नियमित अहवाल व पोटोग्राफिक कागदपत्रे जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केले जाते.
- त्याचसोबत तीन महिन्यांच्या आधारावर प्रगती रिपोर्ट शिक्षा विभागातील नोडल अधिकाऱ्याकडून पोर्टलवर प्रकशित केला जातो.
- त्याचप्रमाणे वार्षिक भौतिक रिपोर्ट, SOE व उपयोग प्रमाणपत्र जिल्हाप्रमाणे जमा केला जातो.
Beti Bachao Beti Padhao Yojana Success
- केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतून देशामध्ये चांगल्याप्रकारे यश मिळत आहेत.
- देशामधील शाळेत मुलींसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- तामिळनाडूमधील कुड्डलोर जिल्ह्यामधील 2015 मध्ये 886 पेक्षा जास्त वाढून 895 इतके 2016 मध्ये बाल लिंग प्रमाण फरक झाला आहे.
- 2015-16 च्या शिक्षा संबंधित जिल्हा सुच प्रणालीनुसार मुलींचे नाव नोंदणी हे 76% वाढून 80.97% इतकी झाली आहे.
- देशामधील एकूण 146 जिल्ह्यांमध्ये संस्थागत वितरणामध्ये सुधार होण्यात मदत झाली आहे.
- 2015 मध्ये ज्या मुली प्राथमिक शाळेत शिकत होते, त्यामधील ड्रॉप आऊट टक्केवारी दीड टक्के कमी होऊन 2016 मध्ये एक टक्का झाला आहे.
- देशामधील एकूण 119 जिल्ह्यांकडून तीन महिन्याचे प्रगती रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे.
- देशभरातील 59491 पेक्षा जास्त लोकांनी सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडले आहेत.
निष्कर्ष
आमच्या या लेखातून Beti Bachao Beti Padhao Yojana बद्दल संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगण्यात आल्या. यामध्ये आम्ही योजना का राबविण्यात आली? कधी घोषणा करण्यात आली? त्यांचे महत्त्व काय होते? यामध्ये किती मुली व मुले आहेत? हे सुरु करण्याचे उद्देश काय होते? त्यामध्ये कोणत्या प्रकाराचे फायदे मुलींना घेता येतात? कोणते वर्ग यामध्ये टार्गेट केले आहेत? किती सेंटर मुलींच्या हितासाठी उभारण्यात आले? या योजनेमध्ये काम कसे चालते? कशाप्रकारे रिपोर्ट केले जाते? योजना किती यश मिळाले? अशा सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले.
या योजना अंतर्गत देशामध्ये काही काही ठिकाणी फसवणूक सुद्धा केली जात आहे. यासाठी सगळ्या नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या शंका वाटल्यास त्वरित पोलिसांना कळविणे आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे. कोणत्याही प्रकारच्या समस्या झाल्यातर अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन संपर्क साधू शकता.
आमच्या या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळील लोकांना पाठवून मुलींबद्दल जागरूकता पसरवा आणि सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या.
सरकारतर्फे सुरु करण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीसाठी तुम्ही Subscribe करू शकता किंवा आमच्या WhatsApp/Telegram चॅनेलला जॉईन करून अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरवात कधी झाली?
केंद्र सरकारने 22 जानेवारी, 2015 रोजी या योजनेची सुरुवात केली.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना काय आहे?
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशामधील मुलीचे लिंग प्रमाण वाढविण्यास मदत करते.
सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा काय आहे?
या योजने अंतर्गत मुलीचे आई वडील भविष्यामधील शिक्षणाचा व लग्नाचा खर्च भागविण्यासाठी गुंतवणूक करू शकतात.
पुढे वाचा: