Berojgari Bhatta Yojana Maharashtra 2024: केंद्र व राज्य सरकार यांनी बेरोजगार वर्गामधील तरुण पिढीसाठी बेरोजगारी भत्ता योजना सुरु केली. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत प्रदान करतात.
आपल्या भारतामध्ये जवळपास सर्वच राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येसुद्धा लागू करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातील विद्यार्थी वर्ग अर्ज करून लाभ घेत आहेत. त्याचसोबत काही जणांनी अजून लाभ घेतलेला नाही, कारण त्यांना या योजने संबंधित संपूर्ण माहिती मिळाली नाही.
आपल्या लेखात तुम्हाला बेरोजगारी भत्ता योजना काय आहे? त्यांची उद्देश काय आहेत? यामध्ये कोणकोणते फायदे दिले जातात? फायदे घेण्यासाठी कोणती पात्रता लागू करण्यात आले आहेत? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार? आणि अर्ज कशा प्रकारे करू शकतो? तसेच तरुणांना कुठे जाऊन फॉर्म जमा करायचा आहे? अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मदत मिळेल.
जर तुम्ही बेरोजगार आहात आणि तुम्हाला दर महिने योजनेतून आर्थिक मदत मिळवायची असेल तर आर्टिकल शेवट्पर्यंत पहा.
Berojgari Bhatta Yojana in Marathi
सर्वात प्रथम केंद्र सरकारतर्फे बेरोजगारी भत्ता योजनेची घोषणा करण्यात आली होती. सरकारतर्फे जवळपास सर्व राज्यांमध्ये बेरोजगार तरुणांची संख्या कमी व्हावी यासाठी ही योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली. 2020 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा या योजनेची मोहीम हाती घेऊन तरुण पिढींना मदत करण्यास सुरुवात केलेली आहे.
आपल्या राज्यामध्ये काही असे तरुण आहेत, जे सुशिक्षित असून त्यांना हव्या तशा नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळे त्यांना दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकार या योजनेमधून बेरोजगार तरुणांना प्रतिमाह 5,000 रुपयांची आर्थिक मदत करते.
लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्सफर केली जाते. जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीसाठी कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. कारण या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग करते.
Berojgari Bhatta Yojana Maharashtra 2024 Overview
योजनेचे नाव | बेरोजगार भत्ता योजना महाराष्ट्र |
श्रेणी | केंद्र व राज्य सरकारी योजना |
कधी सुरु केली | वर्ष 2020 साली |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र राज्य सरकारी योजना |
विभाग | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन |
उद्देश | राज्यामधील बेरोजगार वर्गातील तरुण पिढीला आर्थिक स्वरूपात मदत करणे |
लाभार्थी | महाराष्ट्रामधील बेरोजगार तरुण |
लाभ | प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळणार |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | rojgar.mahaswayam.gov.in |
Berojgari Bhatta Yojana Aim
महाराष्ट्र राज्य शासनाने सुरु केलेल्या बेरोजगार भत्ता योजनाचे मुख्य उद्देश राज्यामधील बेरोजगारीचे प्रमाण कमी करून तरुण पिढींना आत्मनिर्भर बनविणे आहे. जेणेकरून तरुण पिढीला आपले आयुष्य उज्ज्वल व आर्थिक दृष्टया मजबूत तयार करण्यात मदत मिळेल.
बेरोजगारीची समस्या पूर्ण देशभरात चालू आहे. कारण नवनवीन यंत्रणा सुरु करण्यात येत आहेत. त्यामध्ये नोकरीची संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये काही जणांना चांगली नोकरी मिळण्यास मदत होते. परंतु असे काही बेरोजगार तरुण आहेत, त्यांना आपल्या इच्छेनुसार कामाचे क्षेत्र निवडण्यास संधी प्राप्त होत नाही.
तरुणांना संधी न मिळाल्यामुळे ते नेहमी नोकरीच्या शोधात भटकत असतात. यामध्ये त्यांना त्यांच्या स्किलवरती काम करायला अडचण येते. तरुणांना योग्यरित्या आर्थिक मदत मिळण्यासाठी व आवडते क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ मिळवा. यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून काम करत आहेत.
Berojgari Bhatta Yojana Benefits
- बेरोजगारी भत्ता योजनाचे फायदे देशामधील व आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना दिला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत पुरवतात.
- योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमधून तरुण पिढीना नोकरी शोधताना दैनंदिन खर्चाची चिंता करावी लागणार नाही.
- लाभार्थ्यांना जोपर्यंत चांगली नोकरी प्राप्त होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सरकार योजनेमधून आर्थिक मदत दिली जाणार.
- योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
- महाराष्ट्र सरकार ही आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दर महिन्याला DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून ट्रान्स्फर करतात.
- राज्य सरकारचे मुख्य ध्येय राज्यामधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन तरुणांना चांगली नोकरी मिळण्यास मदत करणे आहे.
- लाभार्थी या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेमधून कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो. जेणेकरून त्याला पुढे नोकरी मिळण्यास मदत मिळेल.
- त्याचसोबत या आर्थिक मदतीनुसार व्यवसाय क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी प्रशिक्षणसुद्धा घेऊ शकतात.
- आपल्या राज्यातील तरुण पिढींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.
Berojgari Bhatta Yojana Eligibility
बेरोजगार तरुणांना लाभ घेण्यासाठी बेरोजगारी भत्ता योजनामध्ये पात्र असणे गरजेचे आहे. यासाठी खालीलप्रमाणे पात्रतेच्या संपूर्ण अटींबद्दल माहिती दिलेली आहे.
- सर्वात प्रथम अर्ज करणारा तरुण एक बेरोजगार असला पाहिजे.
- जो तरुण योजनेमध्ये लाभ घेणार आहे, तो महाराष्ट्र राज्याचा मूळ स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकाचे वय 21 ते 35 वर्षाच्या खाली असणे.
- बेरोजगार तरुणाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्ज करण्यासाठी तरुणाचे शिक्षण कमीत कमीत 12 वी पास असणे गरजेचे आहे.
- कोणत्याही प्रोफेशनल डिग्री किंवा कोर्स केलेला तरुण यामध्ये सहभागी होण्यास पात्र नाही.
- अर्जदारांकडे स्वतःचे बँक अकाउंट असून ते आधारकार्ड आणि मोबाईल नंबरसोबत लिंक असणे.
- त्याचप्रमाणे सहभागी होणारे अर्जदार तरुण कोणत्याही सरकारी क्षेत्रात नोकरीसाठी कार्यरत नसावे.
- अर्ज करणारा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात नोकरीला नसणे.
- अर्जदारांकडे योजने संबंधित आवश्यक असणारे कागदपत्रे सोबतीला असणे.
Berojgari Bhatta Yojana Required Documents
अर्जदारांना अर्ज करण्यापूर्वी बेरोजगारी भत्ता योजनाचे आवश्यक कागदपत्रे जमा करणे महत्त्वाचे आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे यादी दिलेली आहे.
- कोणत्याही नोकरीवर कार्यरत नसलेले घोषणा पत्र
- तरुणाचे आधाकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे)
- ओळखपत्र
- वयाचा पुरावा
- तरुणाच्या राहत्या घराचा पत्ता (रहिवासी प्रमाणपत्र)
- कुटुंबातील वार्षिक उत्पनाचा दाखला
- बँक खात्याचे पुरावे (बँकेचे पासबुक व माहिती)
- बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- 12 वीमध्ये पास झाल्याचा पुरावा (मार्कशीट)
Berojgari Bhatta Yojana Registration
बेरोजगारांना लाभ घेण्यासाठी बेरोजगारी भत्ता योजनामध्ये अर्ज करावा लागेल, अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनुसार स्टेप बाय स्टेप प्रक्रिया फॉलो करावे लागतील.
- तरुणांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनाच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- योजनेच्या वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल.
- त्या डॅशबोर्डमध्ये सुरुवातीला तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल.
- पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करताना काही वैयक्तिक माहिती भरून यूजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्या.
- त्यानंतर Jobseeker लॉगिनमध्ये यूजर आयडी व पासवर्ड टाकून पोर्टलमध्ये जावा.
- पोर्टलमध्ये लॉगइन झाल्यानंतर तुम्हाला योजने संबंधित रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल.
- तो रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुमच्यासमोर उघडून आल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली असेल.
- त्या माहितीमध्ये तुमचे नाव, आधार नंबर, मोबाइल नंबर व इतर माहिती लक्षपूर्वक भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
- फाईल अपलोड केल्यानंतर तपासणी करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारतील तो टाकायचा.
- त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो भरून घेऊन सबमिट बटणावर क्लिक करायचे.
- अशा पद्धतीने तुमचे ऑनलाइन अर्ज व्यवस्थितरित्या पार पडले आहेत.
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून तुमचे अर्ज तपासले जातील.
- त्यामध्ये तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत पाठविली जाईल.
बेरोजगारी भत्ता योजनेसाठी तक्रार कशी करायची?
- Berojgari Bhatta Yojana अंतर्गत Grievance पाठविण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
- वेबसाइटमध्ये गेल्यानतंर तुम्हाला होमपेजमध्ये जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन करून झाल्यानंतर तुम्हाला Grievance पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तक्रारीचा फॉर्म उघडून येईल.
- त्या तक्रारीच्या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण माहिती, मोबाईल नंबर आणि तुमची समस्या भरावी लागेल.
- तक्रार मांडून झाल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही योजने संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी तक्रार मांडू शकता.
निष्कर्ष
आमच्या या लेखातून Berojgari Bhatta Yojana संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही दिली. यामध्ये योजना कधी सुरु करण्यात आली? का सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु करण्यात आली? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? यामधून कोणत्या प्रकारचे फायदे दिले जातात? कोण यासाठी पात्र आहेत? पात्र असलेल्या तरुणांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? अर्जदारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावे लागणार? कशा पद्धतीने अर्ज करू शकता? आणि जर काही अडचण आल्यास तक्रार कशी पाठवू शकता? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाने राबवलेली बेरोजगारी भत्ता योजना तरुण पिढीसाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही बेरोजगार असाल व योजनेमध्ये पात्र असाल तर आम्ही दिलेल्या अर्जाच्या माहितीनुसार अर्ज करून लाभ मिळवा.
आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबातील गरजू तरुणांना पाठवून त्यांनाही आर्थिक लाभ मिळण्यास मदत करा. त्याचप्रमाणे फायदेशीर योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा.
FAQs
बेरोजगारी भत्ता योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यामधील बारावी पास असलेले तरुण नागरिक पात्र आहेत.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana ची सुरुवात कधी झाली?
महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची सुरुवात 2020 रोजी केली होती.
बेरोजगारी भत्ता योजनेमधून किती रुपये मिळतात?
या योजनेमधून लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये डीबीटीमार्फत बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
पुढे वाचा: