Bandhkam Kamgar Yojana Online Form: असा भरा, बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Online Form: या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत, बांधकाम कामगार योजनाचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने कसा भरायचा? 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यामधील बांधकाम करणाऱ्या नागरिकांना बांधकाम कामगार योजनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे 32 स्कीमचे लाभ देण्यात येतात. महाराष्ट्र शासनातर्फे योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या कामगारांना आर्थिक मदत दिली जाते.

तुम्हाला योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर लेखामध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन प्रकिया जाणून घ्या आणि अर्ज करून योजनेचा लाभ मिळवा.

  • सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटीच्या नावाने महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 
  • त्यानंतर Construction Worker Registration च्या ऑप्शनवर क्लिक करणे. 
  • कामगाराचा आधार क्रमांक व चालू असलेला मोबाईल नंबर भरून Proceed Form च्या बटनावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर बांधकाम कामगार योजनाचा ऑनलाइन फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये सुरुवातीला कामगाराचे संपूर्ण नाव, लिंग, वैवाहिक स्थिती, जन्म दिनांक, वय, वर्गवारी आणि मोबाईल नंबर भरून घेणे. 
  • पुढे आधारकार्ड प्रमाणे असलेला पत्ता देणे, ज्यामध्ये घर क्रमांक, रस्ता, गाव, शहर, राज्य, जिल्हा, तालुका, पोस्ट ऑफिस आणि पिनकोड टाकणे. 
  • त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर कौटुंबिक तपशील भरायचा ऑप्शन येईल, त्यामध्ये अर्जदाराची सर्व माहिती ऍटोमॅटिकली आली असेल. 
  • फक्त त्यामध्ये अर्जदाराचे शिक्षण आणि व्यवसाय काय आहे? त्याची माहिती भरून Add More वर क्लिक करणे. 
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबामधील सदस्यांची नॉमिनी म्हणून सर्व माहिती भरून घेणे. 
  • कामगारांना 90 दिवसांचे वर्किंग प्रमाणपत्र ज्या मालकांनी किंवा तहसीलदारने दिले आहे, त्यांची माहिती देणे. 
  • त्यामध्ये कामगाराच्या कामाचे स्वरूप, प्रकार, नोंदणी क्रमांक, जावक क्रमांक आणि दिनांक नोंद करणे. 
  • तसेच ठेकेदाराचे नाव भरून, नियोक्त्याचा जिल्हा व तालुका निवडणे. 
  • पुढे कामगाराचे तीन प्रकारचे कागदपत्रे 2 MB च्या स्वरूपात JPG, JPEG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये स्कॅन करून अपलोड करावे. 
  • त्यामध्ये अर्जदाराचे फोटो, आधारकार्ड आणि 90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र स्कॅन करून जोडावे लागेल. 
  • त्यानंतर Self Declaration च्या पर्यायावर टिक करून Save बटनावर क्लिक करणे. 
  • अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल तो नोंद करून घेणे. 
  • त्यानंतर कामगार योजनाचा अर्ज पूर्ण झालेला आहे, OK बटनावर क्लिक करा. 
  • अर्ज केलेल्या फॉर्मची पावती पीडीएफमध्ये असेल ती कामगाराला प्रिंट करून देणे.

Read More: