Bandhkam Kamgar Yojana Benefits: या आर्टिकलच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजना अंतर्गत कोणकोणते फायदे नागरिकांना दिले जातात? याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मदत मिळेल.
महाराष्ट्र राज्यामधील कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने 18 एप्रिल, 2020 रोजी योजनाची सुरुवात केली. ही योजना सुरु कारण्यामागचे सरकारचे मुख्य उद्देश म्हणजे कामगारांना आर्थिक स्वरूपात मदत करणे.
ज्याच्या माध्यमातून त्यांना काही वेळेला काम जरी नाही मिळाले, तर योजनेच्या आधारे मिळणाऱ्या रक्कमेनुसार आपला घर खर्च भागविण्यात मदत होईल.
राज्यामधील पात्र असलेल्या कामगारांना कोणत्या प्रकारचे फायदे दिले जातात? किती रक्कम लाभार्थ्यांना मिळते? यामध्ये महिलांना सुद्धा लाभ मिळतो का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत लेख पहा.
कामगार योजनेचे काय फायदे आहेत?
- या योजनेचा लाभ महाराष्ट्रामधील विविध प्रकारच्या बांधकामात काम करणाऱ्या नागरिकांना दिला जातो.
- योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना कमीतकमी 2 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये रक्कम आर्थिक मदतीच्या स्वरूपात देण्यात येते.
- शासनाच्यामार्फत योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर केले जातात.
- बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या महिला देखील योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- आतापर्यंत योजने अंतर्गत अर्ज करून 12 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आर्थिक मदत मिळविली आहे.
- योजनेमध्ये 18 ते 60 वर्ष पूर्ण असलेले सर्व नागरिक लाभ घेण्यास पात्र आहेत.
- ज्या नागरिकांनी बांधकाम क्षेत्रात कमीतकमी 3 महिने जरी काम केले असतील, तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. फक्त त्यासाठी 90 दिवसांचा पुरावा देणे आवश्यक आहे.
Read More: