Bandhkam Kamgar Yojana 2024: महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थींना राज्य सरकारतर्फे 2000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या संख्येने बांधमकाम कामगार स्थलांतर करून या क्षेत्रामध्ये विविध कामात सहभागी होतात. हा कामगार वर्ग आपल्या राज्यातील विकासामध्ये मोठी भूमिका बजावत असतो.
हे बजावत असताना त्यांना काही वेळेला काम ही नसते, त्याचसोबत त्यांच्या जीवाला ही धोका असतो. अशातच त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक भागात लक्ष देता येत नाही. यामध्ये त्यांच्या कुटुंबातील स्त्री आणि पुरुष हे दोघेही कामात राबत असतात.
या सगळ्या समस्यांचा आणि परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना आर्थिक सुविधा आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे.
या योजने अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्यासाठी आम्ही दिलेला संपूर्ण लेख शेवटपर्यंत पाहा. यामध्ये आम्ही योजनासंबंधित उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रकिया, अर्जाचा फॉर्म, स्मार्ट कार्ड आणि यादी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
Bandhkam Kamgar Yojana in Marathi
महाराष्ट्र राज्य सरकारने 18 एप्रिल, 2020 रोजी बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली. यासाठी सरकारने MAHABOCW म्हणजेच Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board पोर्टलची स्थापना केली.
या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक मदत ऑनलाईन पुरवली जाते. यामुळे सोप्या पद्धतीने कामगार वर्ग ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकतील. या योजनेमधून लाभार्थींच्या कुटुंबाला 2 हजार रुपये पासून ते 5 हजार रुपये पर्यंत आर्थिक स्वरूपात मदत केली जाते.
बांधकाम कामगार योजना माहिती
योजनाचे नाव | Bandhkam Kamgar Yojana |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | महाराष्ट्रातील सरकारने |
कधी सुरु केली | 18 एप्रिल, 2020 रोजी |
मंत्रालय | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ |
उद्देश | बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहाय्य |
लाभ | 2000 रुपये ते 5000 रुपये |
लाभार्थी | Bhandhkam Kamgar |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Scheme Purpose
राज्य सरकारने 2020 रोजी सुरु केलेल्या बांधकाम कामगार योजनाचे उद्देश राज्यामधील विविध बांधकाम क्षेत्रामधील कामगारांना आर्थिक मदतीचा लाभ पुरवणे. तसेच त्यांचे जीवन कठीण आणि असुरक्षित असल्याकारणामुळे त्यांना हक्काचे संरक्षण पुरवणे आणि आर्थिक स्थितीमध्ये स्थिरता आणणे हा सरकारचा हेतू आहे.
बांधकाम कामगार योजना फायदे
- बांधकाम कामगारांना या योजनेच्या माध्यमातून 2 हजार ते 5 हजार रुपये बँक खात्यामध्ये पाठविले जाणार.
- कामगार या योजनेमध्ये सोप्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतो.
- राज्य सरकारतर्फे मिळणाऱ्या रक्कमेतून त्यांना स्वतःच्या गरजा पुरवण्यास मदत मिळेल.
- या योजने अंतर्गत कामगार वर्गातील स्त्रिया व पुरुष हे दोघेही अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
- असंघटित आणि संघटित क्षेत्रामधील कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- कोरोनामध्ये जवळपास 12 लाखाहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाला आहे.
- सरकारतर्फे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे कर्मचारी स्वतंत्रपणे काम करू शकतात.
- कर्मचारी स्वतंत्र काम करत राहिले तर राज्याचा आणि त्यांचाही विकास होण्यास मदत होईल.
- पँडेमिकसारख्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने जवळपास 12 लाख बांधकाम कामगारांना आर्थिक मदत पुरवली आहे.
Bandhkam Kamgar Yojana Eligibility
- बांधकाम कामगार योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाखाली असणे गरजेचे आहे.
- त्या कर्मचाऱ्याची नोंदणी कामगार कल्याण मंडळाकडे असणे आवश्यक आहे.
- कर्मचारी या क्षेत्रामध्ये मागील एका वर्षात कमीत कमी 3 महिने काम केल्याचा अनुभव असणे.
- अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे महत्त्वाचे आहे.
Bandhkam Kamgar Yojana Documents
अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
- रेशनकार्ड
- आधारकार्ड
- रहिवासी दाखला
- वार्षिक उत्पनाचा दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (Experience Letter)
- बँक खात्याचे पासबुक
- ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- वयाचे प्रमाणपत्र
बांधकाम कामगार यादी 2024
- इमारती
- रस्ते
- रेल्वे
- हवाई क्षेत्र
- ट्रामवे
- सिंचन व पायाभूत सुविधा निर्माण करणे
- जलकुंभ
- पाणी निर्वाह
- पूल
- टेलिग्राफ व परदेशी संप्रेषण
- इलेक्ट्रिकल कामे (वायरिंग, वितरण, टेंशनिंग)
- स्वयंपाक करण्यासाठी मॉड्युलर युनिट स्थापना
- ऊर्जा-कार्यक्षम उपकरणांची स्थापना
- सिमेंट कॉंक्रिट साहित्य तयार करणे
- वॉटर कुलिंग टॉवर
- दगड कापणे, तोडणे व दळणे
- ट्रान्समिशन टॉवर व इतर कामे
- अग्निशामक यंत्रणांची स्थापना व दुरुस्ती
- सुरक्षा दरवाजे आणि उपकरणे बसवणे
- स्वयंचलित लिफ्टची स्थापना
- फरशी पॉलिश व कापणे
- वातानुकूलन उपकरणांची स्थापना आणि दुरुस्ती
- पेंट, वार्निशसह सुतारकाम
- गटाराचे व प्लम्बिंगची कामे
- लोखंडी किंवा धातूंचे ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार व स्थापना करणारे
- अंतर्गत कामे जसे सुतारकाम, छत, प्रकाश व्यवस्था, POP
- ग्लास कटिंग, प्लास्टरिंग आणि पॅनेलिंग
- विटा तसेच छप्पर तयार करणे (1948 अंतर्गत फॅक्टरी कायदा समावेश नाही)
- खेळ कीच मनोरंजनाचे बांधकाम
- माहिती फलक, रस्त्यावरील फर्निचर, प्रवासी निवारा, बस स्थानक, सिलिंग बांधकाम
- रोटरीचे बांधकाम
- सार्वजनिक उद्याने, पदपथ निसर्गरम्य क्षेत्र निर्मिती
- कारंजे स्थापना
- रेडिओ
- बोगदे
- दूरध्वनी
- दूरदर्शन
- धरण कालवे
- तटबंदी व जलवाहतुकीचे कामे
- पूर नियंत्रण कामे
- तेल व वायू प्रतिष्ठान
- विजेचे निर्मिती, प्रसारण व वितरण
- वीज तारा
- वायरलेस
- पाईपलाईन
- टॉवर्स
- जलवाहिनी
Bandhkam Kamgar Yojana Online Apply
बांधकाम कामगार योजनाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
- अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला MAHABOCW च्या अधिकृत वेबसाईट उघडायची आहे.
- तुमच्या समोर होमपेज उघडेल त्यामध्ये Workers मेनूमध्ये जाऊन Workers Registration वर क्लिक करा.
- तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल तेव्हा तुम्हाला पात्रतासाठी Check Your Eligibility and Proceed to register माहिती विचारतील त्यानुसार टिकमार्क करून Check Your Eligibility वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठ (Home Page) च्या पर्यायावर क्लिक करून डॅशबोर्डमध्ये पोहचाल.
- डॅशबोर्डमध्ये डाव्या बाजूला बांधकाम कामगार नोंदणी नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुम्ही आधार नंबर व वापरात असलेला मोबाईल नंबर टाकून Proceed to Form या बटणावर क्लिक करा.
- तुमच्या समोर बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म उघडून येईल. त्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, लिंग, आधार क्रमांक, वैवाहिक स्थिती, जन्म तारीख, वय, वर्गवारी, मोबाईल नंबर आंणि आधारकार्ड प्रमाणे पत्ता अशी वैयक्तिक माहिती टाकणे.
- पुन्हा कौटुंबिक माहिती विचारली असेल, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर नियोक्ता तपशील म्हणजेच 90 दिवसाच्या कामकाजाची माहिती भरून घ्या.
- पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो, आधारकार्ड व 90 दिवसांचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.
- शेवटी टिकमार्क करून Save या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही सबमिट केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपीसाठी क्लिक करणे.
- तुमच्या मोबाईल वर ओटीपी येईल तो भरून घेणे.
- सेव केल्यानंतर तुम्हाला BOCW Application नंबर मिळेल व पोचपावती मिळेल.
- त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये SMS द्वारे कळविण्यात येईल.
- तुमच्या समोर उघडलेली पावती PDF मध्ये डाउनलोड करून घ्या.
- अशाप्रकारे तुमचा या योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज पूर्ण झालेला आहे.
Bandhkam Kamgar Yojana Login
- सर्वात प्रथम तुम्हाला MAHABOCW च्याअधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- तुमच्या समोर होमपेज उघडलेला असेल.
- त्यामधील Construction Worker Profile Login यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- नंबर टाकून झाल्यावर proceed form वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही MAHABOCW Portal मध्ये लॉगिन होणार.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढावे?
Bandhkam Kamgar Smart Card काढण्यासाठी आधी तुम्हाला या योजनेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला कार्ड प्राप्त होणार. जर तुम्ही नोंदणी केली असेल आणि तुम्हाला स्मार्ट कार्ड काढायचे असेल तर खाली दिलेल्या प्रकियेनुसार तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता.
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जावे लागेल.
- त्यानंतर बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड फॉर्म कार्यालयातील अधिकाऱ्याकडून प्राप्त करा.
- त्या फॉर्ममध्ये विचारले गेलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घ्या.
- फॉर्म भरून झाल्यावर लागणारे कागदपत्रे जोडून घ्या.
- त्यानंतर तो फॉर्म आणि कागदपत्रे परत कार्यालयामध्ये जाऊन जमा करा.
- जमा केलेले फॉर्म तपासले जातील, त्यानंतर तुमच्या मोबाइलवर SMS द्वारे कळविण्यात येईल.
- अर्ज स्वीकारून झाल्यानंतर तुम्हाला 7 ते 14 दिवसांमध्ये पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर स्मार्ट कार्ड पोहचवले जाईल.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
या योजने अंतर्गत तुम्हाला अर्ज करून लाभ घेण्यासाठी ऑनलाइन फॉर्म हवा असेल तर खालील दिलेल्या प्रकियानुसार फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा आमच्या telegram चॅनेलला भेट देऊन फॉर्म प्राप्त करू शकता.
- सर्वात प्रथम तुम्ही MAHABOCW वेबसाइटवर visit करा.
- त्यानंतर तुमच्या समोर त्या वेबसाइटचे होमपेज उघडेल.
- त्या होमपेजच्या मेनूमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला Download असा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Construction Worker’s Registration Form (for Reference) असा पर्याय दिसेल.
- त्याच्या बाजूला निळ्या रंगात तुम्हाला download चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण फॉर्म PDF उघडून येईल.
- ते PDF सेव करून प्रिंट करून घ्या.
- अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म प्राप्त होईल.
Bandhkam Kamgar Yojana Helpline Number
बांधकाम योजने अंतर्गत अर्ज करताना काही अडचणी आल्यातर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून हेल्प घेऊ शकता किंवा खाली दिलेल्या महाराष्ट्रामधील कार्यालयाच्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने हेल्प घेऊ शकता. खाली दिलेली संपूर्ण माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून घेण्यात आलेली आहे.
संपर्क: 022-2657-2631/022-2657-2632
ई-मेल आयडी: bocwwboardmaha@gmail.com
हेल्पडेस्क टोल फ्री नंबर : 1800-8892-816
कार्यालयाचे संपूर्ण पत्ता: Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board, पाचवा मजला, MMTC House, प्लॉट नंबर C-22, E – ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई – पिनकोड 40051, महाराष्ट्र
निष्कर्ष
अशा रीतीने आम्ही या लेखातून तुम्हाला Bandhkam Kamgar Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली. त्याचप्रमाणे, या योजनेचा कसा लाभ घेऊ शकतो? त्यांचे उद्देश काय? कोण कोण पात्र असणार आहे? त्यांची पूर्ण यादी, त्यांचे फायदे काय? अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती? पोर्टल लॉगिन कसे करायचे? स्मार्ट कार्ड कसे काढायचे? काही हेल्पसाठी हेल्पलाईन नंबर आणि अर्ज करण्यासाठी फॉर्म याबद्दल सविस्तारित्या मार्गदर्शन केले.
आम्ही दिलेल्या कामगारांच्या यादीप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर, या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक मदत सरकारकडून मिळवून घ्या आणि हा लेख तुमच्या या क्षेत्रामधील मित्रांना पाठवा.
अशाच नवनवीन फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी आम्हाला Subscribe करा किंवा Social मीडियाला फॉलो करा.
FAQs
बांधकाम कामगार योजना काय आहे?
या योजेनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार वर्गाला राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाते.
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
यामध्ये नोंदणी करण्यासाठी mahabocw या वेबसाइटवर जाऊन करू शकता.
महाराष्ट्रात bocw नोंदणीसाठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्रात bocw नोंदणी अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करावा लागेल.
पुढे वाचा: