Ayushman Card Eligibility 2024: या नागरिकांना आयुष्यमान कार्ड दिले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Ayushman Card Eligibility 2024: देशामधील गरजू नागरिकांना आयुष्यमान भारत योजनाच्या माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय सुरक्षा प्रदान केली जाते. देशामधील ज्या नागरिकांचे आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि हॉस्पिटलमधील खर्च ज्यांना भागवता येत नाही, त्यांना योजनेच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड प्रदान केले जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामध्ये महागाईला घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये समस्या निर्माण झाली आहे, ज्याचा तोटा सामान्य नागरिकांना होतो आहे. ज्यामध्ये खूप लोकसंख्या अशी आहे, ज्यांना हॉस्पिटलचे खर्च उचलणे परवडत नाही. अशा नागिरकांना आर्थिक व आरोग्य विषयक मदत करण्याचा उद्देश भारत सरकारने योजनेच्या माध्यमातून घेतला आहे.

Ayushman Card चे फायदे काय आहेत?

  • आयुष्यमान कार्डच्या मदतीने कोणत्याही खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेऊ शकता. 
  • योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या सदस्याच्या कुटुंबामधील एका पेक्षा जास्त नागरिक फायदा घेऊ शकतात. 
  • त्याचप्रकारे कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतचा विमा सुरक्षा प्रदान केला जातो. 
  • योजनामध्ये जवळपास 1929 वैद्यकीय शस्त्रक्रिया उपचारांचा खर्च समावेश आहे. 
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे जुने काही गंभीर आजार असतील देखील बरे केले जाते.

Ayushman Card साठी कोण पात्र आहेत?

  • आयुष्यमान कार्डचा लाभ हा भारत देशामधील गरीब वर्गातील नागरिकांना दिला जातो. 
  • देशातील असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेले नागरिक योजनेसाठी पात्र आहेत. 
  • सामाजिक, आर्थिक आणि जात गणना (SECC) 2011 च्या कायद्यामध्ये येणाऱ्या कुटुंबाना योजनेचा लाभ देण्यात येतो. 
  • कार्डसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकाचे महिन्याचे पगार 10 हजार रुपयांपेक्षा कमी असणे. 
  • दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती आणि आदिवासी वर्गातील नागरिक कार्डसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. 
  • तसेच बांधकाम कामगार, पेंटर, वेल्डर्स, कारागीर, टेलर्स, वाहतूक कामगार, वाहन चालकाचा हेल्पर, घरगुती कामगार, प्लम्बर, मजदूर, कुली, कंडक्टर आणि सुरक्षा रक्षक हे नागरिक योजनेसाठी पात्र आहेत.

Read Also: