Ayushman Card Benefits: आयुष्मान कार्डचे काय फायदे आहेत? घ्या जाणून

Ayushman Card Benefits: या आर्टिकलमध्ये आपण आयुष्मान कार्डचे फायदे काय आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर लेख शेवटपर्यंत पहा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामधील गरीब कुटुंबाला वैदकीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने 2018 रोजी आयुष्मान भारत योजना उपक्रमाची सुरुवात केली होती. ज्याच्या माध्यमातून ज्या नागरिकांनी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहेत, त्यांना आयुष्मान कार्ड देण्यात येते. 

या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वैद्यकीय सुरक्षा देण्यात येते. ज्यामध्ये विविध प्रकारचे आरोग्य विषयक समस्यांवरती सामान्य नागरिक उपचार घेऊ शकतात. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक खर्च धारकांना करावे लागत नाही.

या कार्डच्या माध्यमातून कोणकोणते फायदे धारकांना दिले जाते? हे लेखामध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहे.

आयुष्मान कार्डचे फायदे 

  • या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आरोग्य विमा सुरक्षा प्रदान केले जाते. 
  • लाभार्थ्यांना कार्डच्यामार्फत 5 लाख रुपयांचा विमा कव्हर देण्यात येतो. 
  • योजने अंतर्गत ज्या नागरिकांकडे कार्ड आहे, त्यांना कॅशलेस उपचार सुविधाचा लाभ मिळतो. 
  • कोणत्याही राज्यामधील सरकारी व खाजगी हॉस्पिटमध्ये फ्री वैद्यकीय उपचार मिळते. 
  • कुटुंबातील कितीही सदस्य योजनेच्या अंतर्गत सहभागी होऊन कार्डचा वापर करू शकतात. 
  • कार्डच्या मदतीने लाभार्थी जवळपास 1929 वैद्यकीय क्रियासाठी उपचार घेऊ शकतो. 
  • नागरिकांना हॉस्पिटमध्ये भरती होण्यापूर्वीचे तीन दिवसाचे आणि डिस्चार्ज झाल्यानंतरच्या 15 दिवसाचे देखील खर्च देण्यात येते. 
  • औषधे, अन्न सेवा, उपचार, ICU चा खर्च, फ्री सल्ले आणि इतर गोष्टींचा खर्च सुद्धा कार्डमध्ये कव्हर केले जातो. 
  • त्याचप्रमाणे कोणत्याही कार्डधारकांना आधीचे गंभीर आजार असतील त्यावर सुद्धा उपचार करू शकता.
  • तसेच लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून Secondary Care आणि Tertiary Type Hospitalization यांसारखे सुविधा कार्डमार्फत दिले जातात.

Read More: