Ayushman Bharat Yojana Card Apply Online: आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड कसे काढावे? याची संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप आर्टिकलमध्ये दिलेली आहे.
आयुष्मान कार्ड काढण्यासाठी केंद्र सरकारने पोर्टल उघडले आहे, त्याच्या माध्यमातून नागरिक घर बसल्या मोबाईलच्या साहाय्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कार्ड प्राप्त करू शकतात.
भारत देशामधील गरीब कुटुंबातील नागरिकांना आरोग्य विषयी समस्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने 2018 रोजी आयुष्मान भारत योजना या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
ज्याच्या माध्यमातून ज्या नागरिकांनी अर्ज केले आहे, त्यांना विमा स्वरूपात कार्ड दिले जाते. त्या कार्डच्या माध्यमातून विविध प्रकारचे वैद्यकीय उपचार लाभार्थी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेऊन शकतो.
कार्ड काढण्यासाठी नागरिकांना PMJAY पोर्टलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. पोर्टलमध्ये कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून कार्ड प्राप्त करायचे? याबद्दल खालीलप्रमाणे ऑनलाईन प्रकिया देण्यात आलेल्या आहेत.
आयुष्मान भारत योजना कार्ड काढायचे प्रकिया
- कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुंहाला Beneficiary Login चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आलेला ओटीपी व्हेरिफाय करून घेणे.
- पुढे तुमचे नाव टाकून राशनकार्ड किंवा आधारकार्डची संख्या बॉक्समध्ये टाका.
- संख्या टाकल्यानंतर तुम्ही पात्र आहेत का? याची खात्री करा.
- त्यानंतर तुमच्यासोबत कुटुंबामधील सर्व सदस्यांचे आधारकार्ड नंबर टाकून eKYC करून घ्या.
- ईकेवायसी दरम्यान तुम्हाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो भरून घेणे.
- पुढे तुमच्या मोबाईलमधील कॅमेराच्या आधारे तुमचे फोटो काढून अपलोड करून घ्या.
- फोटो अपलोड करून झाल्यावर तुम्हाला आयुषमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी प्रकिया मिळेल.
Read More: