Atal Pension Yojana Registration: अटल पेन्शन योजना कशी सुरू करावी? पहा संपूर्ण प्रकिया

Atal Pension Yojana Registration: अटल पेन्शन योजना सुरु करण्यासाठी तुम्हाला आर्टिकलमध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन प्रकियेला स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

अटल पेन्शन योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या ऑनलाइन पोर्टलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या बँक शाखेत देखील जाऊन योजनेचा फॉर्म भरून खाते उघडू शकता. 

या योजना अंतर्गत खाते उघडणाऱ्या लाभार्थ्यांना 1 हजार रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यत वर्षाच्या 60 वयानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन बँकेत जमा केली जाते. या उपक्रमाची सुरुवात केंद्र सरकारने भारतामधील सर्व नागरिकांना आर्थिक दृष्टया स्थिर राहण्यासाठी 2015 रोजी केली होती. 

अटल पेन्शन योजना सुरु करण्याच्या ऑनलाइन प्रकिया 

  • नागरिकांना योजनेमध्ये खाते सुरु करण्यासाठी मोबाईलमध्ये enps.nsdl.com ही वेबसाइट उघडावी लागेल. 
  • मोबाईलमध्ये वेबसाइट उघडल्यानंतर पोर्टलचे डॅशबोर्ड स्क्रीनवर दिसेल. 
  • त्या डॅशबोर्डमध्ये खाली स्क्रोल केल्यावर APY Subscriber मध्ये Register Now चा पर्याय निवडायचा. 
  • त्यानंतर New Registration ऑपशन सिलेक्ट करून योजनेचा फॉर्म उघडून येईल. 
  • फॉर्मच्या सुरुवातीला तुम्ही टॅक्स पेअर आहेत का? याची निवड No मध्ये करा. जर तुम्ही कर भरत असाल तर योजनेचा लाभ नाही मिळणार. 
  • पुढे तुमचे कोणत्या बँकेमध्ये खाते आहे? त्याची निवड करा. 
  • निवडलेल्या बँकेचे NLCC/Branch Name भरून घ्या. 
  • तुमचे बँके अकाउंट कोणत्या प्रकारचे आहे, त्याची निवड करा. 
  • त्यानंतर तुमचे बँक अकाउंट नंबर आणि IFS कोड भरून घ्या. 
  • पुढे तुमचे आधारकार्ड नंबर आणि ई-मेल आयडी भरून KYC पूर्ण करा. 
  • तुम्ही पेन्शनची रक्कम किती ठेवणार आहे? त्याची निवड करून घेणे. 
  • त्याचप्रमाणे तुम्ही प्रतिमाह, तिमाही किंवा 6 महिन्याने प्रीमियम जमा करणार त्याचे ऑपशन निवडा. 
  • Declaration पूर्ण वाचून टिकमार्क करून कॅप्चा कोड भरणे. 
  • त्यानंतर शेवटी Generate OTP च्या बटनावर क्लिक करणे. 
  • मोबाईलमध्ये आलेला ओटीपी भरून घ्या आणि सुरुवातीचे प्रीमियम पे करा.

Read More: