Atal Pension Yojana Eligibility: केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना कोणासाठी सुरु केली आहे? आणि त्यांची पात्रता काय आहे? याबद्दल लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घ्या.
अटल पेन्शन योजनामध्ये पात्र असलेल्या नागरिकांना भविष्यामध्ये प्रतिमाह 1,000 रुपये पासून ते 5,000 रुपये पर्यंत आर्थिक लाभ दिला जातो. ही योजना एक गुंतवणूक सुविधा असून त्यामध्ये केंद्र सरकारचे 50% योगदान असते.
केंद्र सरकारने 2015 रोजी सुरु केलेल्या योजनेतून लाभार्थ्यांना भविष्यात चांगली रक्कम कमविण्यासाठी कमीत कमी 42 रुपये पासून ते जास्तीत जास्त 210 रुपये रक्कम प्रत्येक महिन्याला गुंतवावी लागते.
आता या योजनेमधून चांगली गुंतवणूक करून आर्थिक लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहेत? त्यासाठी गुंतवणूकदारांचे वय किती असावे? आणि कोण योजनेसाठी अपात्र असणार? याबद्दलची संपूर्ण माहिती लेखातून जाणून घ्या.
अटल पेन्शन योजनाची पात्रता
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच भारत देशामधील स्थानिक रहिवास्यांनाच फक्त योजनेचा लाभ देण्यात येतो.
- योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्जदारांकडे आपले बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत खाते असणे गरजेचे आहे.
- गुंतवणूकदारांना योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर कमीत कमी 42 रुपये रक्कम प्रतिमाह गुंतवणे बंधनकारक आहे.
- योजनेमध्ये लाभार्थ्यांनी गुंतवलेली रक्कम ही वयाच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शनचा लाभ देण्यात येतो.
- योजने अंतर्गत गुंतवणूक करत असलेले नागरिक कधीही खाते बंद करू शकतात.
- टॅक्स भरत असलेले नागरिक योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अपात्र आहेत.
- गुंतवणुकीची रक्कम योग्यरीत्या जमा होण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते आधारकार्डसोबत लिंक असणे.
Read More: