Atal Pension Yojana Benefits: अटल पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत? घ्या जाणून 

Atal Pension Yojana Benefits: अटल पेन्शन योजनाचे फायदे काय आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील नागरिकांना त्यांच्या निवृत्ती वयानंतर आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने 01 जून, 2015 रोजी अटल पेन्शन योजनाची सुरुवात केली. योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे फायदे देण्यात येतात. 

अटल पेन्शन योजनाचे फायदे कोणाला देण्यात येतात? त्यामध्ये कोणकोणते लाभ दिले जाते? किती रक्कम भरून खाते उघडू शकतो? पेन्शन रक्कम कधी मिळते? आणि नॉमिनीला लाभ देण्यात येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेण्यास मदत मिळेल.

अटल पेन्शनचे फायदे काय आहेत?

  • या योजनाचे फायदा भारत देशामधील पात्र असलेल्या सर्व नागरिकांना दिला जातो.
  • नागरिकांना योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी प्रत्येक महिन्याला कमीत कमी 42 रुपये रक्कम भरावी लागते. 
  • त्याचप्रमाणे आर्थिक दृष्टया स्थिर असलेले नागरिक जास्तीत जास्त 210 रुपये रक्कम प्रतिमाह जमा करू शकतात. 
  • योजना अंतर्गत गुंतवणूक केलेल्या रक्कमेमध्ये केंद्र सरकार 50% रक्कम जमा करते. 
  • लाभार्थ्यांनी योजनामध्ये जमा केलेली रक्कम ही वयाच्या 60 वर्षानंतर काढू शकतात. 
  • 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला बँक खात्यामध्ये निवडलेल्या स्लॉटनुसार पेन्शन जमा होते. 
  • अर्जदार व्यक्ती 1,000 रुपये ते 5,000 रुपयांच्या मधील कोणतीही रक्कम पेन्शनसाठी निवडू शकतात. 
  • कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलेले तरुण वर्ग देखील योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. 
  • त्याचसोबत जास्तीत जास्त 40 वर्षाखालील नागरिक योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. 
  • भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रीमियम भरू शकत नसल्यास खाते बंद करू शकता. 
  • ज्या व्यक्तीच्या नावे खाते आहे, त्याचे निधन झाल्यास नॉमिनी ठेवलेल्या नागरिकांना रक्कम दिली जाते. 
  • तसेच खातेदारकाच्या पती किंवा पत्नीला पेन्शनची रक्कम देण्यात येते.

Read More: