Atal Pension Yojana 2024: 1 जून, 2015 रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अटल पेन्शन योजना सुरु केली होती. या योजनेमध्ये भारत देशामधील 18 ते 40 वयोगटातील प्रत्येक नागरिक यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लाभार्थींना 60 वर्षाचे झाल्यावर केंद्र सरकारतर्फे पेन्शन प्रदान केली जाते. या पेन्शनची रक्कम दरमहा 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत लाभार्थींना प्राप्त होते.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश देशामधील प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवणे हा आहे. यामधून लाभार्थीना मिळणारी रक्कम ही त्यांच्या योगदान आणि वयावर अवलंबून असते. त्याचसोबत जर लाभार्थी व्यक्तीचे 60 वयाच्या आधी निधन झाले तर पेन्शनमधून मिळणारी रक्कम त्यांच्या परिवाराला प्राप्त होते. ही योजना प्रत्येक व्यक्तीच्या म्हातारपणामध्ये आर्थिक मदत म्हणून चांगल्या प्रकारे काम करू शकते.
APY मध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी आम्ही दिलेला संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा. यामध्ये योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती या लेखातुन मिळेल.
Atal Pension Yojana in Marathi
आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जून, 2015 रोजी अटल पेन्शन योजना सुरु केली. यामधून भारतातील नागरिकांसाठी वयाच्या साठाव्या वर्षापासून दरमहा पेन्शनच्या स्वरूपात 1 हजार रुपये पासून ते 5 हजार रुपये पर्यंत रक्कम बँकेत ट्रान्सफर केली जाते.
या योजने अंतर्गत लाभार्थी व्यक्ती दर महिने 42 रुपये ते 210 रुपये प्रीमियम 60 वर्षाचे होईपर्यंत भरू शकतात. त्यानंतर त्या भरलेल्या रक्कमेनुसार केंद्र सरकार 50% पेन्शन भर घालून योगदान देते. वय 18 ते 40 वर्षातील नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
APY Scheme Details
योजनाचे नाव | अटल पेन्शन योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकारने |
कधी सुरु केली | 1 जून, 2015 रोजी |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
विभाग | आर्थिक सेवा विभाग |
उद्देश | भारतातील नागरिकांना पेन्शन स्कीम प्रदान करणे |
लाभ | 1,000 रुपये ते 5,000 रुपये पेन्शन |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | enps.nsdl.com |
Atal Pension Scheme Aim
केंद्र सरकारने चालू केलेल्या अटल पेन्शन योजनाचे उद्देश देशामधील नागरिकांना सेवानिवृत्ती नंतर आर्थिक स्वरूपात मदत करणे. जेणेकरून म्हातारपणामध्ये त्या नागरिकांना आत्मनिर्भर राहून आपले भविष्य विकसित करण्यात मदत मिळू शकेल. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने म्हातारपणी होणाऱ्या समस्यांना दूर करता येऊ शकेल.
त्याचप्रमाणे देशामध्ये काही वर्ग असे आहेत, ज्यांना सेवानिवृत्ती नंतर या आर्थिक सुविधा दिल्या जातात. परंतु आपल्या देशात असा मोठा वर्ग आहे, ज्यांना अशा प्रकारच्या सुविधांची गरज आहे. त्यांना ही योजना अत्यंत मदतगार आणि फायदेशीर ठरू शकेल.
Atal Pension Yojana Benefits
- या योजनेमध्ये भारतातील सगळे नागरिक अर्ज करून आपल्या भविष्याला साकार करू शकतात.
- या योजने अंतर्गत वय 18 ते 40 वर्षाचे नागरिक सुद्धा सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
- भविष्यामध्ये या गुंतवणुकीमधून किमान पेन्शन रक्कम रु. 1000 रु., 2000 रु., 3000 रु., 4000रु., 5000 रु APY द्वारे निवडू शकता.
- अर्जदाराचे भविष्यामध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला / पतीला त्यांची पेंशन आयुष्यभर दिली जाणार.
- जर भविष्यामध्ये पती-पत्नी यांच्या निधनानंतर त्यांच्या नॉमिनीला पेन्शनची रक्कम दिली जाणार.
- APY मध्ये भरलेल्या रक्कमेनुसार 50% रक्कम केंद्र सरकारतर्फे दिली जाणार.
- या स्कीममध्ये अर्जदाराने उघडलेले खाते ते कधी ही बंद करू शकतात. त्यासाठी फक्त त्यांना त्यासंबंधित फॉर्म भरून बँकेत जमा करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही 60 वर्षाचे होईपर्यंत गुंतवणूक नाही केली तर तुम्हाला सरकारतर्फे मिळणारे फायदे प्राप्त होणार नाही.
- तुम्ही बँकेत जाऊन ऑटोमॅटिक पेमेंट चालू ठेवल्यावर नियमितप्रमाणे तुमची रक्कम खात्यामध्ये जमा होईल.
- तसे गुंतवणूक करताना तुम्ही कमी रक्कमेपासून करू शकता परंतु तुम्ही 210 रुपयाची मासिक रक्कम भरल्यास पेन्शनसुद्धा त्यानुसारच मिळेल.
Atal Pension Scheme Eligibility
- अटल पेंशन योजनामध्ये भारतातील स्थानिक रहिवासी नागरिक पात्र ठरतील.
- APY मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्ष असणे गरजेचे आहे.
- या योजने अंतर्गत लाभार्थींना 50% रक्कम स्वतःकडून गुंतवणे आवश्यक आहे.
- इनकम टॅक्स भरणारे नागरिक यामध्ये अर्ज करू शकत नाही.
- लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास केलेली गुंतवणुकीचे रक्कम फक्त नॉमिनीला प्राप्त होणार.
- योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा लाभ 60 वर्षा नंतर होईल.
- या उपक्रमामध्ये अर्ज करण्यासाठी बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये सेविंग अकाउंट असणे आवश्यक आहे.
Atal Pension Yojana Required Documents
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँकेत लिंक असणे)
- वयाचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर तोही आधारकार्ड सोबत लिंक असलेला
- बँक खाते अथवा पोस्ट खाते
- ई-मेल आयडी
- पॅनकार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
Atal Pension Yojana Online Apply
- अटल पेन्शन योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर होम पेज उघडेल.
- त्या होम पेजच्या मेनूमध्ये Atal Pension Yojana (APY) त्यावर स्क्रोल करायचे आहे.
- त्याच मेनूमध्ये तुम्हाला APY Registration असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर Online APY Subscriber Registration Form उघडेल.
- फॉर्ममध्ये विचारली गेलेली वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरून घेणे.
- फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकून बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर ओटीपी येईल.
- तो ओटीपी टाकून क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय येतील बँक एक आणि बँक दोन.
- यामध्ये तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पर्याय येतील.
- तुमच्या सोयीनुसार एका पर्यायावर क्लिक करणे.
- त्या पर्यायानुसार पेमेंट करून घेणे.
- त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कमी कमीत 210 रुपये दर महिन्याला प्रीमियम भरावे लागेल.
- शेवटी सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रकिया पूर्ण झाली आहे.
Atal Pension Yojana Offline Registration
- अटल पेन्शन योजनामध्ये ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या खाते असलेल्या बँकेत जायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या बँकेमधील अधिकाऱ्याकडून APY form घ्यायचा आहे.
- काही शंका असल्यास बँकेच्या अधिकाऱ्याकडून संपूर्ण माहिती घ्या.
- त्यानंतर बँकेतून आणलेल्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरणे.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे त्याच्यासोबत जोडून घेणे.
- भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन बँकेत जाऊन जमा करणे.
- अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.
अटल पेन्शनचे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?
- सर्वात आधी तुम्हाला इनकम टॅक्स पेयरचा पर्याय येईल त्यावर नाही करणे. जर तुम्ही इनकम टॅक्स पेयर असाल तर या योजनेमध्ये अर्ज करू शकत नाही.
- त्यानंतर तुमचे ज्या बँकेमध्ये सेविंग खाते ते निवडणे.
- तुमच्या बँकेच्या ब्रांचचे नाव टाकून घेणे.
- तुमच्या बँक अकाउंटचा प्रकार निवडून घेणे.
- तुमचे बँक अकाउंट नंबर टाकून घेणे. बँक IFSC कोड टाकून घेणे.
- जर तुमचे आधारकार्ड लिंक नसेल तर ऑफलाईन निवडणे.
- तुमचे आधारकार्ड बँके सोबत जोडलेले असल्यास केवायसी पर्याय निवडणे.
- त्यानंतर तुमचे ई-मेल आयडी टाकून घेणे.
- तुमच्या आधारकार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर टाकणे.
- जर तुमचे केवायसी नसेल तर ऑफलाईन आधारकार्ड झिप फाईलनुसार अपलोड करणे.
- तुमच्या आधारकार्डचा शेवटचा नंबर टाकणे.
- पेन्शन अमाऊंट तुमच्या सोयीनुसार निवडणे.
- तुम्ही महिन्यातून, तीन महिन्यातून किंवा 6 महिन्यातून गुंतवणुकीचे रक्कम भरणार आहे ते निवडणे.
- सूचना वाचून टिकमार्क करून घेणे.
- शेवटी कॅप्चा कोड टाकणे.
- अशाप्रकारे तुमचा संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झालेला आहे.
निष्कर्ष
आम्ही या लेखामध्ये Atal Pension Yojana याबद्दल तुम्हाला सविस्तररित्या संपूर्ण माहिती सांगितली आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? याचे फायदे काय आहेत? यासाठी कोण पात्र आहेत? आवश्यक कागदपत्रे कोणती? तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो? त्याशिवाय ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितली आहे.
या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील नागरिकांना भविष्यामध्ये विकसित होण्यासाठी ही आर्थिक गुंतवणुक फायदेशीर ठरेल. यामध्ये जे इच्छुक असतील ते आम्ही दिलेल्या प्रकिया नुसार अर्ज करून भविष्यामध्ये लाभ घेऊ शकतात.
आम्ही आशा करतो, आमचा हा लेख तुम्हाला आवडलाच असेल, तुमच्या जवळच्या गरजू लोकांना हा लेख पाठवून त्यांनासुद्धा भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास मदत करा आणि अशाच फायदेशीर योजनासाठी आम्हाला Subscribe करून ठेवा किंवा आपल्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा.
FAQs
अटल पेन्शन योजना ऑनलाइन कशी काढायची?
त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन काढायची.
अटल पेन्शन योजना कधी सुरू करण्यात आली?
केंद्र सरकारतर्फे 1 जून, 2015 रोजी ही योजना सुरु करण्यात आली.
अटल पेन्शन योजना कशी सुरू करावी?
ही योजना सुरु करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा तुमच्या रजिस्टर बँकमध्ये जाऊन सुरु करू शकता.
मी माझे APY खाते कसे बंद करू?
तुम्ही तुमचे APY खाते तुमच्या बँकेतून फॉर्म घेऊन तो भरून देऊन खाते बंद करू शकता.
APY साठी कोण पात्र नाही?
APY साठी इनकम टॅक्स भरणारे पात्र नाही.
अटल पेन्शन योजनेत किती विमा आहे?
या योजनेमध्ये 1000 रुपये पासून ते 5000 रुपये विमा आहे.
APY साठी मासिक पेमेंट किती आहे?
यासाठी मासिक पेमेंट 210 रुपये आहे.
Read More: