Abha Card Registration: आभा कार्ड काढण्यासाठी अर्जदारांना आर्टिकलमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रकिया जाणून घेण्यास मिळेल.
आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट. ज्यामध्ये लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर डिजिटल हेल्थ कार्ड मिळते. ज्यामधून ज्यामध्ये 14 अंकी युनिक नंबर दिला जातो. या हेल्थ कार्डच्या साहाय्याने लाभार्थी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सर्व खर्चाचे व प्रकियाची नोंद अकाउंटमध्ये केली जाते.
भारत देशात आर्थिक क्षेत्रासोबत विविध क्षेत्रामध्ये सुद्धा डिजिटल सुविधा सुरु होत आहे. यासाठी देशातील सर्व नागरिकांना आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. अर्जदार कशा पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कार्ड प्राप्त करू शकतो, याची प्रकिया स्टेप बाय स्टेप लेखात दिलेली आहे.
आभा कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रकिया
- सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आभाची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर पोर्टलची स्क्रीन उघडून येईल, त्यामध्ये योजना संबंधित संपूर्ण माहिती दिलेली असेल ती वाचू शकता.
- पुढे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला Create ABHA Number असा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला स्क्रीनमध्ये आधारकार्ड आणि ड्रायविंग लायसन्सच्या आधारित कार्ड काढू शकता असे दोन पर्याय मिळतील.
- त्यामधील कोणतेही एक पर्याय निवडा. आम्ही सर्वात सोपी पद्धत आधारकार्डची आहे ती निवडतो.
- आधारकार्डच्या पर्यायामध्ये आल्यानंतर सुरुवातीला आधार नंबर भरायचा.
- त्यानतंर नियम वाचून टिकमार्क करा आणि कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
- दुसऱ्या प्रोसेसमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो भरून घ्या.
- पुढे कार्डला लिंक करण्यासाठी मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
- त्यानंतर तुमच्या नावाने असलेलाच ई-मेल आयडी टाका.
- तुमच्या ई-मेल आयडीवर वेरिफिकेशन मेल आला असेल तो व्हेरिफाय करून घेणे.
- Abha Address मध्ये तुमचे नाव टाकून Create च्या पर्यायाला निवडा.
- अशा प्रकारे तुमचे डिजिटल कार्ड तयार होईल.
Read More: