Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना राज्यातील दुर्बळ निराधार घटकांमधील नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील पुरुषांना व महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1000 रुपये ते 1500 रुपये आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले जातात.
आपल्या राज्यामधील काही महिला असे आहेत, त्यांना कोणत्या न कोणत्या समस्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वतः सोबत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कठीण जाते. त्याचसोबत अपंगत्व, विधवा आणि अनाथ पुरुषांना व महिलांना योग्य शिक्षण व कुटुंबाचा सपोर्ट मिळत नाही. यामुळे ते आर्थिक दृष्टया कमकुवत होतात आणि त्यांना विविध प्रकारच्या आर्थिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते.
परंतु आता अशा नागरिकांना आपल्या दैनंदिन खर्चासाठी चिंता करायची गरज नाही, कारण महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणली आहे. ज्यामधून तुम्हाला आर्थिक स्वरूपात मदत मिळणार आहे.
आता ती आर्थिक मदत योजनेमधून कशी मिळणार? त्याचसोबत योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? त्यामधून महिलांना कोणते फायदे मिळतात? कोणत्या नागरिक यामध्ये पात्र असणार? महिलाना अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? आणि ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसे करू शकतात? याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana in Marathi
महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजनाची सुरुवात राज्यामधील दुर्बळ नागरिकांसाठी केली आहे. ही स्कीम विशेष मदत/पेन्शन योजना असून त्याची अंमलबजावणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग करते.
राज्य सरकारने 2019-20 आधी योजनेची सुरवात केली होती, तेव्हा लाभार्थ्यांना प्रति महिना 600 रुपये पेन्शन दिली जात होती. परंतु 2019-20 च्या अर्थ संकल्पनेत काही बदलून करून ती रक्कम 1000 रुपये इतकी करण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यांमधील पात्र असलेल्या पुरुषांना व महिलांना प्रति महिना 1000 रुपये ते 1500 रुपये रक्कम बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाते. जेणेकरून त्यांना आर्थिक दृष्टया समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि ते या पेन्शनमधून दैनंदिन खर्च करण्यासाठी सक्षम राहतील.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु केली | 2024 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्रमधील सरकारने |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन |
उद्देश | गरिबी व दुर्बळ वर्गातील महिलाना आर्थिक स्वरूपात मदत करून सहाय्य करणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यामधील निराधार घटकांमधील महिला वर्ग व पुरुष |
लाभ | 1000 रुपये ते 1500 रुपये आर्थिक मदत |
अर्ज पद्धत | ऑनलाइन किंवा ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | aaplesarkar.mahaonline.gov.in |
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Objectives
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे मुख्य उद्देश राज्यामधील दारिद्रय रेषेखालील असलेल्या महिलांना आर्थिक मदत करणे आहे. जेणेकरून लाभार्थी महिला आपले दैनंदिन खर्च करण्यासाठी सक्षम राहतील व स्वतः आत्मनिर्भर बनून आपले पालनपोषण करतील.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Benefits
- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे फायदे दारिद्रय रेषेखालील महिला व पुरुष वर्गांना होतो.
- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार लाभार्थ्यांना खर्चासाठी पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत पाठवतात.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून योजने अंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत पोहचवण्याचे काम व निरीक्षण करण्याचे काम करते.
- अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये ते दीड हजार रुपये रक्कम आर्थिक लाभ म्हणून देतात.
- या योजनेमध्ये पात्र असलेले महिला व पुरुष ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.
- राज्य सरकारच्यामार्फत योजनेमधून पाठविली जाणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रतिमाह जमा केली जाते.
- एकाच कुटूंबातील एकपेक्षा जास्त लाभार्थी असतील, तर 1200 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून दिले जाते.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Eligibility
अर्जदारांना अर्ज करण्यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनाची पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- या योजने अंतर्गत ज्या महिला किंवा पुरुष अर्ज करणार आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहेत.
- योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे वय 18 ते 65 वर्षाच्या खालील वयोगटामधील असणे.
- 35 वर्षावरील लग्न न झालेल्या महिलांना सुद्धा लाभ दिले जाते.
- जे नागरिक अर्ज करणार आहेत ते दारिद्रय रेषेखालील असणे किंवा त्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 21,000 च्या खाली असणे.
- राज्यामधील अनाथ मुले व अपंगत्व असलेले नागरिक अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
- ज्या नागरिकांना क्षयरोग, कर्क रोग, एड्स, कुष्ठरोग आजार आहे ते अर्ज करू शकतात.
- त्याचप्रमाणे विधवा व घटस्फोट झालेल्या महिला यामधून लाभ घेण्यास पात्र आहेत.
- तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला वर्ग व देवदासी यामध्ये सहभागी होऊ शकतात.
- ट्रान्सजेंडरसुद्धा या योजनामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ज्या महिलांचे पती तुरुंगात आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात.
- एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Required Documents
संजय गांधी निराधार अनुदान योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे यादीनुसार दिलेली आहेत, त्यानुसार जमा करणे महत्त्वाचे आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे)
- वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला/शिधापत्रिका)
- स्थानिक रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- अनाथ असल्याचा दाखला
- बँक खात्याचे पुरावा (पासबुकचे पहिले पान)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचा दाखला
- अपंगत्व प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- BPL कार्ड / वार्षिक उत्पन्न दाखला
- ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट (जर ट्रान्सजेंडर असाल तर)
- पतीचे मृत्यू दाखला (जर विधवा असाल तर)
- मोबाईल नंबर
- ओळखीचा पुरावा (मतदान कार्ड/पॅनकार्ड/आर एस बी वाय कार्ड/पारपत्र)
- ई-मेल आयडी
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Apply Online
नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनामध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपले सरकार महा ऑनलाइन पोर्टलची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ते घालवून नवीन यूजर? येथे नोंदणी करा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडेल त्यामध्ये पर्याय एक वर मोबाईल नंबर टाकून ओटीपी रजिस्टर करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे यूजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल तो बनवून घ्या.
- ज्या व्यक्तीचे अर्ज करायचे आहे, त्यांचेच आयडी व पासवर्ड करणे.
- त्यानंतर पुन्हा डॅशबोर्डमध्ये येऊन यूजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड आणि जिल्हा निवडून लॉगिन बटनावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्याच्या डाव्या नाजूक यादी असेल, ती स्क्रोल करून सामाजिक नयन व विशेष सहाय्य विभाग पर्याय निवडणे.
- त्यानंतर विशेष सहाय्य असा पर्याय दिसेल त्यावर ब्लु टिक करून पुढे जा यावर क्लिक करा.
- पुन्हा एक पेज उघडेल त्यामध्ये सुद्धा विशेष सहाय्य योजना हेच परत निवडायचे.
- त्यामध्ये तुम्हाला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी बघायला मिळेल.
- तो पूर्ण पेज खालपर्यंत स्क्रोल करत येणे आणि पुढे सुरु करा यावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमचे जन्म दिनांक, वय आणि दारिद्रय रेषेखालील तपशील मध्ये (होय/नाही) ऑपशन निवडून पुढे चला.
- पुढे आल्यावर तुमच्या समोर फॉर्म उघडेल, त्यामध्ये आधार क्रमांक टाकून घेणे, विचारलेली संपूर्ण माहिती भरणे.
- फॉर्ममध्ये खाली गेल्यावर तुमचे स्थानिक पत्ता विचारला जाईल तो भरून क्षेत्र निवडा.
- त्यानंतर तुम्हाला योजनेच्या पात्रतेची माहिती द्यावी लागेल.
- पुन्हा खाली आले की, बँक खात्याचे सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर शेवटी मला मंजूर आहे यावर टिक कर्ण फॉर्म सेव करून घ्या.
- त्यानंतर योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे.
- फाइल अपलोड केल्यानंतर 33 रुपयांचे पेमेंट करून सबमिट पर्यायावर क्लिक करणे.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन अर्ज पूर्ण झाला आणि 30 दिवसांमध्ये तुम्हाला अर्जाचे उत्तर देण्यात येईल.
- काही अडचण आल्यास तुम्ही तहसील कार्यालयात भेट देऊन समस्या सोडवू शकता.
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Apply Offline
तुमच्याकडे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसतील तर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेली प्रकिया करू शकता.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Form लागेल, यासाठी तुम्ही आमच्या Telegram चॅनेला भेट देऊन प्राप्त करू शकता किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन सुद्धा फॉर्म घेऊ शकता.
- तुम्ही अर्जाचा फॉर्म प्राप्त केल्यानंतर त्यामध्ये योजने संबंधित जी काही माहिती लागणार आहे ती अचूक भरून घेणे.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्येनंतर शेवटी सही करून घेणे आणि अंगठ्याचा ठसा देणे.
- त्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडून घेणे.
- फॉर्म व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जाऊन जमा करावे लागेल.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन अर्ज यशस्वीरीत्या करू शकता.
निष्कर्ष
अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला आर्टिकलच्या माध्यमातून Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana संबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. ज्यामध्ये योजनेचे महत्व, त्यांचे उद्देश, त्यामधून होणारे फायदे, लाभ घेण्यासाठी पात्रता, अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज करण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन प्रकिया अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या माहिती सांगितली.
तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये पात्र असाल आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनामध्ये अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही दिलेल्या अर्जाच्या प्रक्रियांना फॉलो करून रजिस्ट्रेशन करु शकता.
त्याचप्रमाणे अशाच फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी योजना मीडियाच्या चॅनेलला फॉलो करू शकता आणि नवीन अपडेट्स मिळवू शकता.
पुढे वाचा: