PM Vishwakarma Yojana 2024: नेमकी काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?

PM Vishwakarma Yojana 2024: केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना या नावाने नवीन योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या अंतर्गत विश्वकर्मा समुदायामधील 140 पेक्षाही जास्त जातींना याचा लाभ घेता येणार तेही कमी व्याज दरात. यामध्ये या समुदायातील जातींच्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपये लोन आणि 15,000 रुपये रक्कम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत दिली जात आहेत. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Table of Contents

पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत समुदायातील लोकांना खूप कमी व्याज दरात लोन केंद्र सरकारद्वारे दिले जात आहे, त्याचसोबत विविध प्रकारच्या सुविधा जसे की, व्यावसायिक प्रशिक्षण, टूल किट आणि स्टायपेंड हे सुद्धा दिले जाते. 

या योजने अंतर्गत जे पात्र उमेदवार असतील, ते PM Vishwakarma च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 

PM Vishwakarma Yojana in Marathi च्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी जे इच्छुक नागरिक असतील, त्यांनी हा संपूर्ण लेख शेवट पर्यंत वाचा.  

अशी महत्वपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत, त्यामुळे हा लेख लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा. 

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे? | What is PM Vishwakarma Yojana?  

या योजनाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी केली.

या योजनेच्या अंतर्गत देशभरातील पात्र असलेले लाभार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध प्रकारचे फ्री प्रशिक्षण दिले जाते. त्याचसोबत प्रशिक्षण घेताना प्रतिदिन 500 रुपये वेतन दिले जाईल. 

त्याशिवाय व्यवसायासाठी लागणारे टूलकिट (Toolkit) विकत घेण्यासाठी फ्री 15,000 रुपये सुद्धा बँकेत ट्रांसफर केले जातील, जे सरकारला परत करण्याची आवश्यकता नाही. 

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना अंतर्गत समुदायातील नागरिकांना स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी सरकार 3 लाख रुपये लोन सुद्धा दिले जाते. 

PM Vishwakarma Yojana 2024 Overview

योजनाचे नाव Pradhan Mantri Vishwakarma Yojana
सुरु केलेकेंद्र सरकार
Launch Date17 सप्टेंबर 2023
लाभार्थीसमुदायातील सगळ्या जातींच्या लोकांसाठी
अर्ज प्रक्रियाOnline / Offline
उद्देश फ्री कौशल्य ट्रेनिंग आणि उद्योगासाठी लोन प्राप्त करण्यासाठी
कोणासाठी देशभरातील कारागीर व शिल्पकार
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
बजेट13,000 करोड रूपये
डिपार्टमेंटसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय
अधिकृत वेबसाइटpmvishwakarma.gov.in
अर्जाची शेवटी तारीख2028 पर्यंत
Maharashtra Helpline / Contact No.022-22617641/42/43

पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? | Objectives

Pradhan Mantri Vishwakarma Yojana ही केंद्रीय सरकारने भारत देशामधील पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार या वर्गाना आर्थिक लाभ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली. 

त्याचसोबत आपल्या देशातील गरीब वर्गाला ट्रेनिंग प्रदान करून पारंपारिक उत्पादन आणि सेवा वाढवून लोकांना आर्थिक लाभ मिळणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. 

भरपूर प्रकारच्या जातीमधील लोकांना गरिबीमुळे कामकाजातील क्षेत्रामध्ये प्रशिक्षण भेटत नाही, त्याचसोबत काही व्यवसाय सुरु करायला आर्थिक मदत मिळत नाही. 

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय तर्फे ही प्रमुख योजनेची सुरुवात केली. या योजनेतर्फे लोकांना स्वतःचा रोजगार सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात लोन उपलब्ध केले गेले. 

सरकारने उद्योगांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्याचसोबत चांगला रोजगार निर्माण होण्यासाठी मार्केटिंग सपोर्ट म्हणून National Committee for Marketing (NCM) यांची सुद्धा नेमणूक केली. 

यामध्ये NCM तर्फे सदस्याला गुणवत्ता पत्र दिले जाईल, त्याचसोबत त्याच्या व्यवसायाची ब्रँडिंग आणि प्रमोशनसुद्धा केली जाते. त्याशिवाय E-commerce सोबत उद्योग लिंक करून trade fairs जाहिराती सुद्धा केल्या जात आहेत. 

PM विश्वकर्मा योजनेचा फायदा काय? | Benefits 

  • समुदायाच्या संबंधीत सगळ्या जातीच्या लोकांना याचा लाभ मिळणार. 
  • या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक व्यवसाय करण्यासाठी सरकारतर्फे 3 लाख लोन उपलब्ध करून भेटणार. 
  • PM Vishwakarma कर्जाचा व्याज दर निश्चित केलेल्या सवलतीनुसार 5% p.a. टक्के  असणार. 
  • हे लोन दोन टप्यात भेटणार पहिल्या टप्यात 1 लाख रुपये लोन पुराव्याशिवाय 18 महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये 30 महिन्यांच्या कालावधीसाठी या अनुक्रमानुसार मिळेल. 
  • सगळ्या लोकांच्या गरजेनुसार 15,000 रुपये टूलकिट विकत घेण्यासाठी प्रदान केले जाणार. 
  • PM Vishwakarma Scheme तर्फे लोकांना फ्री मध्ये व्यावसायिक कौशल प्रशिक्षण दिले जातील. 5 ते 7 दिवसाचे (40 hours) बेसिक आणि 15 ते अधिक दिवस (120 Hours) ऍडव्हान्स (असा प्रशिक्षणाचा कालावधी असणार) 
  • प्रशिक्षण घेण्याच्या दरम्यान केंद्रीय सरकार प्रतिदिन 500 रुपये वेतन सुद्धा प्रदान करणार. 
  • या योजने अंतर्गत प्रशिक्षण आणि ट्रेनिंग झाल्यावर P M Vishwakarma Certificate आणि कारागीर ID Card दिले जाणार. 
  • या योजनेसाठी सरकारने 13,000 कोटीचा बजेट मंजूर केला. 
  • शिल्पकार आणि कुशल कारागिरांना या योजनेच्या मार्फत MSME सोबत जोडण्यासाठी बँकेसोबत जोडले जाते.
  • या अंतर्गत उद्योगाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्केटिंग सपोर्टसुद्धा दिला जाईल. 

विश्वकर्मा योजनेचा लाभार्थी कोण आहे? | Beneficiary

PM Vishwakarma Scheme मध्ये 18 प्रकारचे पारंपरिक व्यवसायांचा समावेश केला असून समुदायातील 140 हुन अधिक जातींना याचा लाभ दिला जाणार. 

  • सुतार 
  • कुंभार
  • न्हावी 
  • शिंपी 
  • बोटी बनविणारे 
  • शस्त्र बनविणारे 
  • मोची 
  • सोनार 
  • लोहार 
  • शिल्पकार 
  • राज मिस्त्री 
  • धोबी 
  • टोपली, चटई व झाडू बनविणारे 
  • पारंपारिक बाहुली व खेळणी बनविणारे 
  • टाळा बनविणारे 
  • हातोडा व टूलकिट निर्माते 
  • मास्यांची जाळी बनविणारे 
  • माळ बनविणारे 

विश्वकर्मा कर्ज योजनेसाठी कोण पात्र आहे? | PM Vishwakarma Yojana Eligibility 

  • या योजनामध्ये 140 पेक्षा जास्त जातीच्या अंतर्गत या समुदायातील उमेदवार पात्र आहेत. 
  • Pradhan Mantri Vishwakarma Scheme मध्ये अर्ज करणारे व्यक्ती शिल्पकार किंवा कुशल कारागीर असणे गरजेचे आहे. 
  • अर्ज करण्यासाठी त्या व्यक्तीचा रोजगार नसला पाहिजे आणि ई-श्रम कार्ड असणे महत्त्वाचे आहे.  
  • यामध्ये अर्ज करण्यासाठी त्या व्यक्तीचा जातीचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे.  
  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांनाच असून त्यांचे वय 18 वर्षाहुन अधिक असले पाहिजे. 
  • तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एकाच सदस्याला या स्कीमचा लाभ घेता येणार आहे. 
  • ही स्कीम फक्त गरीब आणि खालच्या वर्गातील सदस्यांसाठी आहे.

विश्वकर्मा योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? |  PM Vishwakarma Yojana Required Documents 

  • जातीचे प्रमाणपत्र/दाखला 
  • निवास स्थानाचा पुरावा 
  • बँक खात्याचे पासबुक 
  • ओळखपत्र 
  • पासपोर्ट साइज फोटो 
  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • ई-मेल आयडी 
  • चालू असलेला सध्याचा मोबाईल नंबर 
  • ई-श्रम कार्ड 
  • राशन कार्ड 
  • मजदूरी कार्ड

पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी कशी करावी? | PM Vishwakarma Yojana Online Apply 2024

ज्या व्यक्तींना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जमत नाही, त्यांनी ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहू शकता किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSS), जनसेवक किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनासाठी अर्ज करू शकता. 

Registration 

PM Vishwakarma Yojana मध्ये Registration करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स ऑनलाइन प्रकियानुसार स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 

  • सगळ्यात पहिले तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनाची अधिकृत वेबसाइट उघडा. 
  • अधिकृत वेबसाइटच्या home पेजवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी apply बटन दिसेल त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर CSC पोर्टला जाऊन यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून login करून घ्या. 
  • जिथे अर्ज करायचा आहे त्याचे एप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर उघडेल. 
  • सगळयात पहिला तुम्हाला एप्लिकेशन फॉर्ममध्ये मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून वेरिफाई करून घ्या. 
  • त्यानंतर स्क्रिनवर दिलेल्या सूचना वाचून त्यानुसार पूर्ण फॉर्म भरून घ्या. 
  • तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्यासाठी स्कॅन कॉपी लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर PM Vishwakarma Certificate डाउनलोड करायला पर्याय येईल त्यावर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करा.
  • सर्टिफिकेट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्या आतमध्ये तुमची Vishwakarma Digital ID भेटून जाईल जी अर्ज करण्यासाठी कामाला येईल. 
  • ती प्रक्रिया झाल्यानंतर login बटनवर क्लिक करून तुम्ही ज्या मोबाइल नंबरने रजिस्ट्रेशन केले आहे त्याने लॉगिन करा. 
  • यानंतर अर्ज करण्यासाठी तुमच्यासमोर मुख्य एप्लिकेशन फॉर्म उघडेल, त्यामध्ये खूप प्रकारची माहिती तुम्हाला विचारली जाईल त्याप्रमाणे योग्यरित्या नोंदणी करून अर्ज करणे. 

पीएम विश्वकर्मा योजना अर्जाची स्थिती कशी तपासायची? | PM Vishwakarma Yojana Status Check 

  • विश्वकर्मा योजना अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सगळयात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला ओपन करावे लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या समोर वेबसाइटच्या होम पेजची स्क्रीन ओपन होईल. 
  • स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला Applicant Beneficiary login हा पर्याय वेबसाइटवर दिसेल त्यावर क्लिक करा.
  •  Applicant Beneficiary login केल्यानंतर तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल त्यावर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकून घेणे. 
  • त्यानंतर ध्यानपूर्वक captcha code टाकून login वर क्लिक करणे. 
  • Login करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती बघायला मिळेल.

निष्कर्ष 

आम्ही आशा करतो, की PM Vishwakarma Yojana बद्दल या लेखातून तुम्हाला सविस्तररित्या माहिती मिळालीच असेल. तुम्ही सुद्धा उद्योग करू पाहात असाल आणि या लेखात दिलेल्या श्रेणीमध्ये बसत असाल.तर तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होऊन भारत देशाच्या प्रगतीच्या वाटचालीसाठी एक छोटी मदत करून तुमचा रोजगार वाढवू शकता. 

अशाच योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला follow करा आणि daily updateसाठी आमच्या social Media platform ला visit करू शकता. 

त्याचसोबत हा लेख तुम्हाला आवडला असेल तर गरजू लोकांना share करायला विसरू नका. 

FAQs

पीएम विश्वकर्मा कर्जाचा व्याज दर किती आहे?

पीएम विश्वकर्मा कर्जाचा व्याज दर हा 5% निश्चित केला आहे.  

PM vishwakarma.gov मध्ये नोंदणी कशी करावी?

PM vishwakarma.gov मध्ये नोंदणी करण्यासाठी  CSC पोर्टरला जाऊन तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड login करून दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करणे. 

पीएम विश्वकर्मा योजनेत CSC लॉगिन म्हणजे काय?

पीएम विश्वकर्मा योजनेत CSC (Common Services Centers) लॉगिन म्हणजे नागरिकांना किंवा ऑपेरेटर यांना डिजिटल सेवा पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी सक्षम असते.

पुढे वाचा: