PM Adarsh Gram Yojana 2024: 27,000 गावांना आदर्श ग्राम गाव करण्यात येणार, जाणून घ्या माहिती

PM Adarsh Gram Yojana 2024: ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातींच्या (SC) लोकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PMAGY) केंद्र सरकारने सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातींमधील नागरिकांना चांगले शिक्षण, त्यांचे हक्क, भक्कम पायाभूत सुविधा आणि विविध गरजेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार आपल्या भारत देशामध्ये जवळपास 16.6% लोकसंख्या ही अनुसूचित जातीमधील नागरिकांची आहे. आजही देशाच्या काही भागांमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांसोबत दुर्व्यवहार केला जातो. ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी, मंदिरांमध्ये आणि शाळेमध्ये त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. त्याचसोबत शाळेमध्ये ऍडमिशन सुद्धा करून दिले जात नाही. 

या सगळ्या समस्या ग्रामीण भागांमध्ये बघायला मिळतात, यामुळे अशा गावांमध्ये PMAGY योजनेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी योजनामधून कशा प्रकारे केले जाणार आहेत? ते आपण आज लेखातून जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा. 

PM Adarsh Gram Yojana in Marathi

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना एक ग्रामीण विकास प्रोग्राम आहे, ज्याची सुरुवात केंद्र सरकारने 2009-10 च्या आर्थिक वर्षामध्ये पायलट मोडमध्ये केली होती. या पायलट मोडला सुरुवातीला 5 राज्यांमध्ये लागु करण्यात आले होते. 

त्यानंतर योजनेचा प्रथम टप्पा 2014-15 च्या आर्थिक वर्षात चालू केला होता आणि दुसरा टप्पा 2018 रोजी सुरु करण्यात आला होता, परंतु त्यावेळेला काही कारणामुळे केंद्र सरकारचे ध्येय पूर्ण न झाल्यामुळे यामध्ये मुदत वाढ करून 2024-25 च्या आर्थिक वर्षापर्यंत त्याची वाढ करण्यात आली आहे. 

PMAGY म्हणजे प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना याची संपूर्ण अंमलबजावणी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून केली जाते. योजनेची सुरुवात मार्च, 2010 च्या वर्षामध्ये करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये 50% पेक्षा जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या आहे, त्या गावांमध्ये विकास करण्यात येतो. 

Pillars of PM Adarsh Gram Yojana

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अंतर्गत 3 स्तंभाच्या आधारे सक्षमीकरण केले जाते आणि ते तीन स्तंभ कोणकोणते आहेत ? त्याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. 

Social Integration 

गावागावांमध्ये अनुसूचित जातीला घेऊन होणारा दुर्व्यवहार पूर्णपणे थांबवून सामाजिक एकात्मता आणणे. त्याचप्रमाणे आर्टिकल सेक्शन 17 अंतर्गत मूलभूत अधिकार देणे गरजेचे आहे. यामध्ये SC जातीच्या लोकांना योग्यरित्या कामाची संधी नसल्यामूळे, त्यांना गटार व सेप्टिक टाकी साफ करून रोजीरोटी कमवावी लागत होती. या गोष्टींना पूर्णपणे बंद करण्यात आले आणि यामध्ये आता नमस्तेसारख्या काही स्कीम अशा पद्धतीचे काम करत आहेत. 

Education 

दुसऱ्या स्तंभाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या लहान व तरुण पिढींना शिक्षणासाठी त्यांचा मूलभूत अधिकार आहे अशा पद्धतीने प्रोत्साहन दिले जाते. ज्यामध्ये केंद्र सरकार विविध प्रकारच्या Scholarship Yojana च्याआधारे शिक्षण देण्यास त्यांना मदत करत आहे. त्यांना शिक्षणासाठी फंडिंगच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते, त्याचसोबत हॉस्टेल व निवासी स्थानी शाळा उपलब्ध करून दिली जाते. 

Economic Development 

प्रत्येक अनुसुचित जातीच्या गावांमध्ये आर्थिक विकास घडविण्यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. ज्याच्या माध्यमातून लाभार्थी कर्ज घेऊ शकेल. त्याचप्रमाणे उत्पन्न कमविण्यासाठी प्रोग्राम तयार केले जाते. ज्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येते. 

PM Adarsh Gram Yojana 2024 Overview 

योजनेचे नावप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PMAGY)
कार्यक्रमग्रामीण विकास प्रोग्राम
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
कधी सुरु झाली मार्च 2010 रोजी
कोणी सुरु केलीकेंद्र सरकारने
विभागसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार
उद्देशदेशभरातील अनुसूचित जातींच्या गावांना विविध प्रकारच्या सुविधा प्रदान करणे
लाभार्थीग्रामीण क्षेत्रामधील अनुसूचित जातींचे कुटुंब
लाभशिक्षण, रोजगार, बँकिंग सुविधा व गावाचा विकास
अधिकृत वेबसाइटhttps://pmagy.gov.in/

PM Adarsh Gram Yojana Aim

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनाचे मुख्य उद्देश 2024-25 पर्यंत अनुसूचित जातींच्या अंदाजे एकूण 27000 गावांमध्ये सक्षमीकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून SC जातीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मूलभूत अधिकार मिळवा आणि त्यांनाही सर्वसामान्यांमध्ये आदराने राहता येईल. 

या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे सर्व जिल्ह्यांमधील ज्या गावांमध्ये 500 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये 50% पेक्षा जास्त लोकसंख्या अनुसूचित जातीमधील आहेत, त्यांना सामाजिक सुरक्षा, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा, घरे, रस्ते व इतर सुविधांचा लाभ देणे हे ध्येय सरकारचे आहे. त्याचप्रमाणे या नागरिकांसोबत होणारे जातीवाद व भेदभाव कमी करून सामाजिक एकात्मता घेऊन येणे हे सुद्धा प्रयत्न आहेत.  

PM Adarsh Gram Yojana Focus Area 

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अंतर्गत खालील दिलेल्या 10 क्षेत्रांमध्ये 50 प्रकारचे इंडिकेटर्स बघायला मिळतील, यामध्ये एखाद्या गावाला आदर्श ठरविण्यासाठी या दहा क्षेत्रांची यादीनुसार पुष्टी केली जाते. 

  • शिक्षण 
  • आरोग्य व पोषण 
  • सामाजिक सुरक्षा 
  • कौशल्य विकास व रोजगार 
  • ग्रामीण रस्ते व गृहनिर्माण 
  • आर्थिक क्षेत्र 
  • पिण्याचे पाणी व स्वच्छता 
  • कृषी पद्धती 
  • Digitization 
  • वीज व स्वच्छ इंधन 

PM Adarsh Gram Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनाचा फायदा देशभरातील अनुसूचित जातीच्या कुटुंबाना दिला जातो. 
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेल्या SC नागरिकांना विविध सुविधा दिल्या जातात. 
  • PMAGY अंतर्गत गावांना सर्व हवामानामध्ये राहण्यासाठी सक्षम बनविले जाते. जसे गावांमध्ये पाऊस आला तर संपूर्ण संपर्क विस्कळीत होतो, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केली जाते. 
  • गावांमध्ये रस्ते तयार करून शहरी भागांसोबत जोडले जातात, जेणेकरून त्यांना अडचणीमध्ये सर्व सुविधा प्राप्त होतील. 
  • त्याचसोबत त्या गावांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली जाते. 
  • प्रत्येक घरांमध्ये विजेची कनेक्शन व रस्त्यांवर प्रकाशासाठी लाईट लावण्यात येते. 
  • नागरिकांना संवाद किंवा मदतीसाठी पोस्ट ऑफिस, टेलिफोन व सामान्य सेवा केंद्र उभारण्यात येते. 
  • गावांमध्ये सर्व नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बँकिंग सुविधा प्रदान करतात. जेणेकरून त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध होतील. 
  • त्याचप्रमाणे गावांमधील पर्यावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी पाण्याची साठवण, अक्षय ऊर्जा, झाडांची लागवड व जल संस्था उभारण्यात येते. 
  • गावांमधील 3 ते 6 वर्षांखालील मुलांना अंगणवाडीमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. 
  • तसेच 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मध्यम शाळेमध्ये शिक्षण घेण्यात प्रवृत्त करतात. 
  • नागरिकांच्या कुटुंबामधील सदस्यांचे आरोग्य विषयक समस्यांना दूर करण्यासाठी मेडिकल सेवा उपलब्ध करतात. 
  • गर्भवती महिलांना संस्थात्मक डिलिव्हरी करण्यासाठी प्रोत्साहन करणे व त्यांच्या बाळांचे योग्य लसीकरण करणे हे योजनेच्या माध्यमातून होते. 
  • गावामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी पुरुषांना दारू बंदीसाठी जागरूक करतात. 
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे आदर्श गाव तयार करण्यासाठी 21 लाख रुपये प्रत्येक गावाला देण्यात येते. 
  • केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीला 2 वर्षांमध्ये विकास करण्यासाठी खर्च करावे लागते. 
  • शासनाच्या विभागाकडून 3 वर्षांमध्ये सामाजिक व आर्थिक सुधारणा झाली आहे की नाही? ते तपासण्यात येते. 
  • पायाभूत सुविधांना अंमलात आणण्यासाठी योजनेच्यामार्फत समिती तयार करण्यात येते. 
  • 2009-10 च्या सुरुवातीला PMAGY अंतर्गत 5 राज्यांमधील जवळपास 1000 गावांना आदर्श ग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये तामिळनाडू, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश व राजस्थान या पाच गावांचा समावेश आहे. 
  • सुरुवातीच्या या पायलट टप्प्यासाठी केंद्र सरकारने 201 कोटी रुपयांची मदत दिली होती. 
  • 2015-16 च्या पहिल्या टप्प्यामध्ये 11 राज्यांमधील 1500 गावांना आदर्श ग्राम योजनांसाठी समाविष्ट करण्यात आले होते. 
  • पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने 338.10 कोटी रुपये खर्च केले होते. ज्यामध्ये 140 गावांना आदर्श ग्राम घोषित करण्यात आले होते. 
  • प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अंतर्गत पात्र असलेल्या देशामधील जवळपास 26,968 गावांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. 

PM Adarsh Gram Yojana Funding Pattern 

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अंतर्गत नवीन गाव 

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनाच्या माध्यमातून नवीन गावाला 21 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते. यामध्ये 20 लाख रुपये Gap filling घटकांसाठी असतात आणि 1 लाख रुपये प्रशासकीय व इतर खर्च करण्यासाठी असतात. ज्यामध्ये 1:1:1:2 च्या प्रमाणानुसार केंद्र, राज्य, जिल्हा व गावाकडे वाटप करण्यात येते. 

पहिल्या टप्प्यामधील आदर्श ग्राम गाव 

पहिल्या टप्प्यामधील गाव जे आधीच योजनेच्या अंतर्गत लाभ दिले गेले आहेत, अशा गावाला 10 लाख रुपये देण्यात येते. ज्यामध्ये 9.50 लाख रुपये गॅप फिलिंग घटकांसाठी देतात आणि राहिलेली रक्कम केंद्र, राज्य, जिल्हा व गाव प्रशासनाला 1:1:1:2 प्रमाणा प्रमाणे देतात. 

निष्कर्ष 

अशा पद्धतीने PM Adarsh Gram Yojana संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आमच्या लेखातून करण्यात आला. यामध्ये आम्ही योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणत्या नागरिकांना यामध्ये लाभ दिले जाणार? यामागचा केंद्र सरकारचा उद्देश काय होता? यामध्ये कोणत्या स्तंभाचा समावेश करण्यात आला? यासाठी कोणती वेबसाइट केंद्र सरकरने तयार केली आहे? यामधून कोणकोणते फायदे गावांना होणार? कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष्य केंद्रित करतात? यामध्ये कशा प्रकारचा खर्च करण्यात येतो व किती रुपये? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आली. 

तुम्हाला आमचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना पाठवा व त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेण्यास प्रोत्साहन द्या. अशाच योजनांच्या माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या Telegram किंवा WhatsApp चॅनेलला जॉईन करा. 

FAQs

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना कधी सुरु झाली? 

केंद्र सरकारने ही योजना मार्च, 2010 साली सुरु केली होती. 

PMAGY योजना काय आहे? 

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामधील अनुसूचित जाती (SC) वर्गातील लोकांना पायाभूत सुविधा व इतर फायदे मिळवून देण्यात येते. 

आदर्श ग्राम योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

या योजनेसाठी ग्रामीण भागातील अनुसूचित जातीमधील कुटुंब पात्र आहेत. 

पुढे वाचा: