PM Daksh Yojana 2024: केंद्र सरकारने भारत देशामधील तरुणांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री दक्ष योजना सुरु केली. योजनेच्या माध्यमातून देशभरातील बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
दक्षता म्हणजे विविध क्षेत्रात योग्य अभ्यास करून स्वतःला तयार करणे आहे. प्रधानमंत्री दक्ष योजना अंतर्गत विशेष क्षेत्राच्या वर्गातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना आणखी आणखी कौशल्यपूर्ण बनविले जाते. जेणेकरून त्यांच्या रोजगारांमध्ये आर्थिक वाढ होईल आणि कामाच्या ठिकाणी वरचढ स्थान मिळण्यात मदत होते.
आपल्या लेखातून प्रधानमंत्री दक्ष योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश कोणते आहेत? त्यामधून नागरिकांना कोणते फायदे मिळतात? यासाठी कोण पात्र असणार आहेत? कोणत्या प्रकारचे शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाते? तरुणांना अर्ज करताना आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती? बेरोजगार तरुण कशा प्रकारे अर्ज करू शकतो? त्याचप्रमाणे योजनेमध्ये असणारे अभ्यासक्रमाची यादी व प्रशिक्षण प्रोग्राम कसे तपासायचे? अशा सर्व गोष्टींबद्दल पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.
PM Daksh Yojana in Marathi
केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री दक्ष योजनाची सुरुवात 2020-21 च्या आर्थिक वर्षांमध्ये करण्यात आली होती आणि ही योजना Ministry of Social Justice and Empowerment अंतर्गत राबिवली जाते. PM Daksh चा संपूर्ण अर्थ प्रधानमंत्री दक्ष आणि कुशलता संपन्न हितग्रही असा आहे. या योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय क्षेत्रातील नागरिकांना प्रशिक्षण दिले जाते व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
ही योजना नॅशनल ऍक्शन प्लॅन म्हणून सुरु करण्यात आली आहे, ज्यामधून उपेक्षित नागरिकांना कौशल्य प्रदान केले जाते. योजने अंतर्गत समावेश असलेले वर्गांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे. त्याचसोबत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तीन विविध डिपार्टमेंटला सहभागी करण्यात आलेले आहेत.
PM Daksh Yojana Beneficiaries Category
- इतर मागास वर्ग (OBCs)
- आर्थिकदृष्टया मागास वर्ग (EBCs)
- डीनोटिफाइड (त्यांची ओळख नसलेले)
- भटक्या जमाती
- अर्ध भटक्या जमाती (आदिवासी) (DNTs)
- अनुसूचित जाती (SCs)
- सफाई कामगार
- कचरा उचलणारे
PM Daksh Yojana Implementation
- National Scheduled Castes Finance and Development Corporation (NSFDC)
- National Backward Classes Finance and Development Corporation (NBCFDC)
- National Safai Karamcharis Finance and Development Corporation (NSKFDC)
प्रधानमंत्री दक्ष योजनाची माहिती 2024
योजनाचे नाव | प्रधानमंत्री दक्ष योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉंच केली | 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये |
कोणी लॉन्च केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशामधील मागास वगार्तील नागरिकांना प्रशिक्षण देऊन आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम बनविणे |
लाभार्थी | भारत देशामधील मागासवर्गीय नागरिक |
लाभ | प्रशिक्षण व रोजगाराची संधी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmdaksh.dosje.gov.in |
PM Daksh Yojana Objective
केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री दक्ष योजनाचे मुख्य उद्देश देशभरातील मागासवर्गीय व इतर दुर्बळ गटातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करणे आहे. त्याचप्रमाणे बेरोजगार वर्गातील तरुणांची सक्षम पातळी वाढविणे.
सप्टेंबर 2023 च्या वर्षात भारताचा बेरोजगारी प्रमाण 12 महिन्यात 7.09% कमी झाली आहे. यामुळे भारत देशामध्ये रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून सरकारचे मुख्य टार्गेट आहे.
योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षित करून रोजगाराच्यामार्फत सामाजिक व आर्थिक विकास करणे हे केंद्र सरकारचे मुख्य लक्ष्य आहेत. नागरिकांना सामाजिक व आर्थिक दृष्टया सक्षम बनवून त्यांच्यासोबत देशाचीसुद्धा प्रगती करण्यास मदत होईल.
PM Daksh Yojana Benefits
- प्रधानमंत्री दक्ष योजनाचे फायदे भारत देशामधील विविध प्रकारच्या मागासवर्गातील नागरिकांना दिले जातो.
- ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम असून संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते.
- केंद्र सरकारचे योजनेच्या माध्यमातून 2025-26 पर्यंत जवळपास 2,71,000 नागरिकांना कौशल्य प्रदान करणे लक्ष्य आहे.
- PM Daksh योजनेसाठी केंद्र सरकारने एकूण 450.25 कोटी रुपये आर्थिक वाटप केले आहेत.
- योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते, त्यामध्ये 100% अनुदान केंद्र सरकार करते.
- लाभार्थ्यांना योजनेमध्ये शॉर्ट टर्म व लॉंग टर्म प्रशिक्षण प्रदान केले जाते.
- त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना प्रशिक्षण घेत प्रत्येक महिन्याला 1000 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत आर्थिक स्वरूपात स्टायपेंड दिले जाते.
- योजने अंतर्गत Reskilling व Upskilling क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये आधीपासून काम करत असलेले सहभागी प्रशिक्षण घेऊन अजून कौशल्य वाढवू शकतात.
- त्याचसोबत प्रत्येक लाभार्थीला भरपाई रक्कम 3000 रुपये दिले जाते, ज्यामध्ये 2500 रुपये PM-Daksh व 80% उपस्थिती असल्यावर 500 रुपये वाढीव दिले जाते.
- योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण झालेल्या लाभार्थ्यांना ट्रेनिंग प्रमाणपत्र वाटप करतात.
- त्याचसोबत केंद्र सरकारतर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना ट्रेनिंग प्रमाणपत्राच्यानुसार नोकरी उपलब्द केली जाते.
- योजने अंतर्गत पात्र असलेले बेरोजगार तरुण व आधीच कामामध्ये कार्यरत असलेले नागरिक सहभागी होऊ शकतात.
Types of PM Daksh Training Programme
- Up-Skilling/Reskilling: आधीच नोकरी करत असलेल्या लाभार्थ्यांना 5 ते 35 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते, यामध्ये त्यांना प्रशिक्षण घेत 3000 रुपये ते 8000 रुपये वेतन म्हणून दिले जाते.
- Short Term Training: यामध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांना 3 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी व 22,000 वेतन स्वरुपात आर्थिक मदत देतात.
- Entrepreneurship Development Programme: व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना 15 दिवसांचा ट्रेनिंग सेशन असतो आणि 7000 रुपये वेतन प्रदान करतात.
- Long Term Training: जास्त कालावधीसाठी आलेल्या नागरिकांना 7 महिने प्रशिक्षण दिले जाते व 45,000 रुपये आर्थिक मदत करतात.
- Up-Skilling for Safai Karamcharis: सफाई कामगार वर्गातील नागरिकांना ३ दिवसांचे प्रशिक्षण व 3000 रुपयांपर्यंत वेतन देतात.
Sectors Cover in PM Daksh Yojana
- ऑटोमोबाईल क्षेत्र
- ब्युटी व वेलनेस सेक्टर
- हेल्थ व लॉजिस्टिक क्षेत्र
- पेट्रोकेमिकल सेक्टर
- वस्त्र संबंधित क्षेत्र
PM Daksh Yojana Eligibility
प्रधानमंत्री दक्ष योजनाच्या पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे असलेल्या अटीनुसार पात्र असणे गरजेचे आहे.
- जे तरुण योजने अंतर्गत अर्ज करणार आहेत, ते भारताचे स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- या योजनेमध्ये फक्त SC/OBC/EBC/DNT/सफाई कर्मचारीसोबत कचरा उचलणारे नागरिक सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
- 18 ते 45 वर्षांच्या वयोगटातील असणारे नागरिक सहभागी होण्यास पात्र ठरणार.
- OBC व EBC वर्गामधील नागरिकांचे 3 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असेल तर अर्ज करू शकतात.
- त्याचप्रमाणे राहिलेल्या इतर वर्गातील कुटुंबाना कोणत्याही प्रकारचे उत्पनाचे अटी लावण्यात आलेले नाही.
- अर्ज करणाऱ्या नागरिकांकडे स्वतःचे आधारकार्ड असणे व त्याचसोबत आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे बंधनकारक आहे.
- त्याचप्रमाणे योजनेमध्ये Transgender (TG) समुदायातील नागरिकसुद्धा अर्ज करू शकतात.
PM Daksh Yojana Required Documents
नागरिकांना प्रधानमंत्री दक्ष योजनांसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे जमा करून ठेवणे गरजेचे आहे, दिलेली आहे त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची संपूर्ण यादी दिली आहे.
- अर्ज करण्याऱ्या तरुणाचे आधाकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे)
- ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- समुदायाचे प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- राहत्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता
- वार्षिक उत्पन्न दाखला
- शैक्षणिक पुरावा
- सफाई कर्मचारी किंवा कचरा उचलणारे असतील तर व्यवसाय सर्टिफिकेट
- मोबाईल नंबर
- स्वतःचे घोषणापत्र
PM Daksh Yojana Online Apply
नागरिकांना प्रधानमंत्री दक्ष योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेले अर्ज प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल.
- तुम्हाला सुरुवातीला भारत सरकारने सुरु केलेल्या Skill India Digital पोर्टलची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड उघडून येईल.
- त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला स्किल इंडिया डिजिटल हबमध्ये जाऊन रजिस्टर करावे लागेल.
- रजिस्टर केल्यानंतर तुमचे प्रोफाईल वेरिफिकेशनसाठी पर्याय येईल.
- तुम्ही मोबाईल ओटीपीच्या साहाय्याने प्रोफाइल वेरिफिकेशन करून घ्यावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
- ते झाल्यानंतर अर्ज पूर्ण होईल आणि स्किल इंडिया डिजिटलच्या माध्यमातून ऑनलाईन सल्ला दिला जाईल.
- त्यानुसार कोर्स व ट्रेनिंग सेंटर दिले जातील.
- अशा पद्धतीने ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष
अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला PM Daksh Yojana संबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. ज्यामध्ये योजनाचे महत्त्व काय आहेत? त्यामध्ये सुरु करण्याचे उद्देश काय आहेत? कोणकोणत्या कॅटेगोरीमधील नागरिक सहभागी होऊ शकतात? त्याचसोबत पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत? योजनेची अंमलबजावणी कशी होते? कोणते विभाग करते? लाभार्थ्यांना कोणते फायदे दिले जाते? लाभार्थ्यांना प्रशिक्षण कोणते दिले जाणार? कोणत्या ट्रेनिंग प्रोग्रामचा समावेश आहे? तरुणांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती असणार? आणि कशा पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर सांगितले.
तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री दक्ष योजनेमध्ये पात्र असाल आणि तुम्हाला अर्ज करून प्रशिक्षण व रोजगार हवा असेल तर आम्ही दिलेल्या प्रकियानुसार अर्ज करून लाभ मिळवा. तसेच लेख आवडला असेल तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांनासुद्धा पाठवा.
अशीच योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाइटला Subscribe करा व Telegram/WhatsApp वर जाऊन जॉईन करा.
FAQs
पीएम दक्ष योजना काय आहे?
या योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय नागरिकांना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी संधी केंद्र सरकारकडून केली जाते.
दक्ष योजनेची सुरुवात कधी झाली?
दक्ष योजनेची सुरुवात 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये सुरु झाली होती.
दक्ष योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी अनुसूचित जाती,व जमाती, भटक्या जमाती, कचरा उचलणारे आणि मागासवर्गीय नागरिक पात्र असणार आहेत.
पुढे वाचा: