Ayushman Sahakar Yojana 2024: 52 हॉस्पिटलमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध होणार, जाणून घ्या माहिती

Ayushman Sahakar Yojana 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल हेल्थ प्रोग्राम अंतर्गत आयुष्मान सहकार योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशभरातील हॉस्पिटलमध्ये हेल्थच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधार करण्यासाठी मदत केली जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आज आपल्या लेखातून जाणून घेणार आहोत, आयुष्मान सहकार योजना संबंधित संपूर्ण माहिती. ज्यामध्ये योजना कोणी सुरु केली? कोणते विभाग यामध्ये काम करत आहेत? सुरु करण्यामागचे उद्देश काय होते? योजनेमधून हेल्थ वर्गाला कोणते फायदे दिले जातात? यामध्ये कोणत्या प्रकारचे कागदपत्रे द्यावे लागतात? आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रकिया कोणत्या आहेत? या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर शेवट पर्यंत आर्टिकल पहा. 

Ayushman Sahakar Yojana in Marathi 

Ayushman Sahakar Scheme ही एक आर्थिक मदत करणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून हेल्थ क्षेत्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी संस्थाची मदत घेतली जाते. सहकारी संस्था म्हणजे अशा स्वयंसेवी संस्था किंवा संघटना असतात, ज्या कोणत्या तरी विशेष क्षेत्रात काम करतात.

आपल्या भारत देशामध्ये काही स्वयंसेवी संस्था किंवा संघटना आहेत, जे हेल्थ क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करतात. ज्या प्रकारे NGO असतात, त्याचप्रमाणे हे संस्था असतात. जी संस्था एका व्यक्तीची असू शकते किंवा एकत्रित ग्रुपचे असू शकते. या संस्था 1963 Act अंतर्गत रजिस्ट्रेशन करून विशेष क्षेत्रात काम करत असतात. 

केंद्र सरकार अशाच सहकारी संस्थांना देशभरातील हॉस्पिटलमध्ये हेल्थ संबंधित पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजनेच्या अंतर्गत रजिस्टर असलेले सहकारी संस्था भारत देशामधील 52 हॉस्पिटलची निवड करतात.   

या 52 हॉस्पिटलमध्ये 5000 पेक्षा जास्त बेडींग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे उत्तम उपकरणे व यंत्रसामग्री असणार आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेद डिपार्टमेंट, होमियोपॅथी 

सेंटर, वेलनेस सेंटर आणि प्रायमरी हेल्थकेअर सुविधा वाढल्या जातील. लोकांना हेल्थ संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध व स्वस्त दरात कसे दिले जातील? यावर सुद्धा लक्ष दिले जातील. 

केंद्र सरकारतर्फे निवडण्यात आलेल्या संस्थाच्या आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास होण्यावरती लक्ष देणार. यामध्ये फक्त सुविधा उपलब्ध करून दिले जात नाही, तर आरोग्य विमा व आधुनिक टेकनॉलॉजीवर सुद्धा काम केले जाते.

आयुष्मान सहकार योजना काय आहे?  

आयुष्मान सहकार योजना आरोग्य क्षेत्रामधील सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 19 ऑक्टोबर, 2020 रोजी सुरु केली होती. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालया अंतर्गत NCDC म्हणेज National Cooperative Development Corporation एजेन्सी येते, ज्यांनी Ayushman Sahakar Program ची ओळख करू दिली. 

या योजनेच्या अंतर्गत NCD विविध संस्थांना आर्थिक मदत पुरवते. पँडेमिकनंतर केंद्र सरकारने या योजनेवरती संपूर्ण लक्ष्य दिले आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त आरोग्य सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिले जातील. या योजनेची संपूर्ण देखरेख कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय करते. 

Ayushman Sahakar Scheme Funding Pattern for Infrastructure Creation 

राज्य सरकारतर्फे निधीराज्य सरकारतर्फे निधीडायरेक्ट निधी
NCDC कडून राज्य सरकारकडेराज्य सरकारकडून सोसायटीलाNCDC कडून सोसायटीला
कर्ज – 90%कर्ज – 50% 
शेअर भांडवल – 40%
कर्ज – 70%
सोसायटी शेअर – 10%सोसायटी शेअर – 10%सोसायटी शेअर – 30%

Ayushman Sahakar Yojana 2024 Overview

योजनेचे नावआयुष्मान सहकार योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
लॉंच केली19 ऑक्टोबर, 2020 रोजी
विभागकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
अंमलबजाणीराष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC)
उद्देशदेशभरातील हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे
लाभसहकारी संस्थांना आर्थिक मदत

Ayushman Sahakar Scheme Objective

आयुष्मान सहकार योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील आरोग्य क्षेत्रामध्ये सुविधा उपलब्ध करून विकास घडवणे आहे. जेणेकरून देशभरातील नागरिकांसाठी आरोग्य उपचारासाठी योग्य सुविधा उपलब्ध असतील. त्याचसोबत हॉस्पिटलमधील डॉक्टरांसाठी सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. 

  • केंद्र सरकारने या योजने अंतर्गत विविध मिशन व स्कीमसोबत सुद्धा जोडण्याचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) ज्यामधून गर्भवती महिलांना लाभ दिला जातो. 
  • या योजनेमधून नागरिकांना स्वस्त दरात चांगले सुविधा उपलब्ध करून देणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. त्याचसोबात डिजिटल हेल्थ इकोसिस्टिम तयार करण्यात मदत केली जाते. 
  • योजनेच्या माध्यमातून पूर्ण दक्षिण आशियामध्ये भारतीय औषध प्रणाली वाढवून AYUSH म्हणजेच आयुर्वेद सुविधा प्रसार केले जाते. 
  • भारत देशामधील हॉस्पिटलमध्ये सर्वसमावेशक आरोग्य सेवा योजनेच्या माध्यमातून वाढवण्यात येणार आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलचे इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, सेवा व इतर आरोग्य संबंधित क्षेत्र यांचा समावेश आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज तयार केले जात आहेत. ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4 नवीन हॉस्पिटल तयार केले जात आहेत आणि जे हॉस्पिटल अस्तित्वात आहेत, त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधार करण्यात येत आहे. 

Ayushman Sahakar Yojana Features 

  • आयुष्मान सहकार योजनाचे ठळक वैशिष्ट्ये भारतामधील आरोग्य सेक्टरमध्ये विकास करणे आहे. 
  • केंद्र सरकारने आरोग्य विकासासाठी Ayushman Sahakar Fund बनवले गेले आहे. 
  • आयुष्मान सहकार फंडसाठी केंद्र शासनाने 10,000 कोटी रुपये वेगळे काढून ठेवले आहेत. 
  • या योजने अंतर्गत विकसित व मॉडर्न तंत्रज्ञान आणले जाणार आहेत. 
  • बँक व क्रेडिट सोसायटीमध्ये हेल्थ संबंधित आर्थिक खर्चात सुविधा उपलब्ध करण्यात येणार. 
  • योजनेच्या माध्यमातून हॉस्पिटल, क्लिनिक व Diagnostic सेंटरला सुद्धा प्रोत्साहन दिले जाणार आहे. 
  • त्याचप्रमाणे आरोग्य विषयक सर्वोत्तम पद्धतीना व आधुनिक गोष्टीना प्रोत्साहित केले जाते. 
  • जास्त प्रमाणात ग्रामीण क्षेत्रामधील आरोग्य संबंधित सुविधांची गुणवत्ता वाढवण्यात येणार. 

Ayushman Bharat Yojana

Activities Covered Under Ayushman Sahakar Scheme 

  • या योजनेमधून अस्तित्त्वात असणारी सर्व हॉस्पिटलमधील सुविधा सुधारण्यात येणार आणि नवीन सुविधा तयार करण्यात येणार. 
  • हॉस्पिटलमधील उपलब्ध असलेले मेडिकल यंत्रणा व उपकरणे याना अपग्रेड केले जाणार. 
  • त्याचसोबत हॉस्पिटल मधील Healthcare Professionals जसे नर्स, वॉर्ड बॉय आणि सर्जन्स याना प्रशिक्षण दिले जाणार. 
  • योजनेच्या माध्यमातून आरोग्य विषयक संशोधन व इंनोव्हेशन यावरती लक्ष्य केंद्रित केले जाणार. 
  • आरोग्य संबधित सर्व्हिसची गुणवत्ता वाढविण्यात मदत होणार. 
  • सरकारी हेल्थकेअर व सहकारी संस्था इन्स्टिट्यूशन मिळवून योजनेमध्ये काम करणार. 
  • प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डिजिटल हेल्थकेअर उपाय करण्यात येणार. 
  • त्याचप्रमाणे Telemedicine Healthcare setups टाकण्यात येणार आहे. 

Ayushman Sahakar Scheme Eligibility 

कोणत्याही संस्थेला आयुष्मान सहकार योजनामधील पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटीनुसार पात्रता जाणून घेऊन अर्ज करा. 

  • सर्वात प्रथम भारत देशातील विविध राज्यांमधील सहकारी संस्था योजनेसाठी पात्र असणार आहेत. 
  • प्रत्येक संस्थांना 1963 Act अंतर्गत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 
  • फक्त हॉस्पिटल, आरोग्यसेवा आणि आरोग्य शिक्षण संबधित क्षेत्रामधील सहकारी संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. 
  • संस्थेकडे योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करणे महत्त्वाचे आहे. 
  • योजने अंतर्गत सहभागी होण्यासाठी संस्थांना NCDC Direct Funding Guidelines फॉलो करणे आवश्यक आहेत.

Ayushman Sahakar Yojana Required Documents

देशमाधील हेल्थ संबंधित सहकारी संस्थांना आयुष्मान सहकार योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

  • सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र 
  • आधारकार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • मोबाईल नंबर 
  • ओळखपत्र 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • बँक खात्याचे संपूर्ण माहिती 
  • ई-मेल आयडी 

Ayushman Sahakar Yojana Online Apply 

संस्थांना आयुष्मान सहकार योजनामध्ये अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करणे आवश्यक आहे. 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. 
  • त्यानंतर वेबसाइटचे होम पेज उघडून येईल. 
  • त्या होम पेजमधील Common Loan Application Form या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • पर्यायामध्ये गेल्यानंतर योजने संबंधित आवश्यक असणारी माहिती त्या फॉर्ममध्ये असेल. 
  • त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे कार्य, उद्देश, कर्जाची रक्कम व प्रकार हे सर्व भरून घेणे. 
  • फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर महत्त्वाचे कागदपत्र स्कॅन करून अपलोड करून घेणे.
  • सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट बटनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.  
  • अशा प्रकारे योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून आर्थिक मदत मिळवू शकता.

निष्कर्ष 

आमच्या या लेखातून आम्ही Ayushman Sahakar Yojana संपूर्ण माहिती सविस्तररित्या मार्गदर्शन केले. ज्यामध्ये योजनेची सुरवात का करण्यात आली? कोणत्या कारणामुळे करण्यात आली? कोणते मंत्रालय यामध्ये देखरेख करत आहे? कोणत्या वर्षी योजनेची घोषणा करण्या आली होती? कोणत्या क्षेत्रामध्ये याचा फायदा होणार? त्यांचे मुख्य उद्देश काय आहेत? यामध्ये संस्थांना आर्थिक मदत करण्यासाठी काढलेली रक्कम किती आहे? संस्थेला अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार? कोणते कागदपत्रांची आवश्यकता असणार? त्याचसोबत कशाप्रकारे अर्ज करावे लागणार? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगितली. 

आयुष्यमान सहकार योजना ही आपल्या भारत देशामधील आरोग्य क्षेत्रामध्ये सुधार करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. जेणेकरून देशामधील नागरिकांना चांगल्या सुविधा व आधुनिक उपचार पद्धतीचा फायदा घेता येणार. त्याचप्रमाणे विविध राज्यांमध्ये मेडिकल कॉलेज, मेडिकल सुविधा व सेटअप उभारण्यात येणार. जेणेकरून आरोग्य संबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी मदत होईल. 

हा लेख तुम्हाला माहितीपूर्ण वाटले असेल तर तुमच्या आरोग्य संबंधित शिक्षण घेत असलेल्या मित्र -मैत्रींना पाठवा. अशाच योजनेच्या माहितीसाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करून ठेवा किंवा Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा. 

FAQs

आयुष्मान सहकार योजनेसाठी किती रक्कमची घोषणा करण्यात आली आहे? 

या योजनेसाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटी रक्कम बाजूला काढून ठेवली आहे. 

आयुष्मान सहकार योजनेमधून किती हॉस्पिटलचा समावेश केला आहे? 

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास 52 पेक्षा जास्त हॉस्पिटल्सचा समावेश करण्यात आले. 

Ayushman Sahakar Scheme मध्ये किती बेडींगची सुविधा उपलब्ध केली आहे? 

या स्कीममधून हॉस्पिटलमध्ये 5000 बेडींग सुविधा उपलब्ध केले जाणार आहेत. 

पुढे वाचा: