Annasaheb Patil Loan Yojana 2024: बिनव्याजी १५ लाख रुपयांचे लोन घ्या, व्यवसाय उघडा

Annasaheb Patil Loan Yojana 2024: महाराष्ट्रामधील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजना सुरु केलेली आहे. या योजनेमधून नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी 15 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

जेव्हापण कोणताही नागरिक व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजेच भांडवल. सामान्य नागरिक असल्यामुळे तो नागरिक व्यवसाय सुरु करण्यासाठी नातेवाईक किंवा बँकेमधून कर्जाच्या माध्यमातून भांडवलाची सोय होते का ते बघतो? 

परंतु बँकेतील अधिकारी गॅरंटी नसल्यामुळे कर्ज मिळवून देण्यासाठी अडचण निर्माण करतात आणि कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. त्याशिवाय जरी कर्जासाठी मान्यता दिली तर व्याज दर जास्त प्रमाणात लावून दिला जातो आणि कर्जाची रक्कमसुद्धा काही वेळेला कमी दिली जाते. यामुळे सगळा गोंधळ उडतो आणि निराशा हाती लागते.  

अशा समस्यांमुळे नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी पुढाकार मिळत नसल्याने व्यवसायाची कल्पना तिथेच विसरून जावे लागते. परंतु तुम्ही निश्चिंत रहा, महाराष्ट्र सरकारने अशा नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरु केली आहे. 

आज आपण आपल्या लेखात याच योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये योजना काय आहे? ती कोणासाठी आहे? कशाप्रकारे लाभ दिला जातो? कोणकोणते फायदे मिळतात? कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असणार? अर्ज करताना कोणत्या प्रकारचे कागदपत्रे द्यावे लागणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच अर्ज कुठे व कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत लेख वाचा. 

Annasaheb Patil Loan Yojana in Marathi 

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 27 नोव्हेंबर, 1998 रोजी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनाची स्थापना करण्यात आली होती. ज्या नागरिकांना किंवा तरुण-तरुणींना उद्योग सुरु करायचा असल्यास या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जाते. 

तरुण पिढींना या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांचे उद्योग उंचीवर घेऊन जाण्यास मदत मिळेल. त्याचसोबत राज्यामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी संधी मिळेल. यामध्ये आधीपासून व्यवसाय करत असतील तर त्यांनाही योजनेच्या अंतर्गत आर्थिक लाभ देण्यात येते.

Annasaheb Patil Loan Yojana 2024 Overview

योजनाचे नावअण्णासाहेब पाटील लोन योजना
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
स्थापना27 नोव्हेंबर, 1998 रोजी
विभागअण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासनाने
उद्देशराज्यामधील आर्थिकदृष्टया दुर्बळ असलेल्या नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यामधील तरुण व तरुणी
लाभ15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार
अर्ज प्रकियाऑनलाइन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटudyog.mahaswayam.gov.in
हेल्पलाइन नंबर1800-120-8040

Annasaheb Patil Loan Yojana Purpose 

राज्य शासनाचे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाचे मुख्य उद्देश महाराष्ट्रामधील आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत पुरवून विकास करणे आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना संधी प्राप्त करून देता यावी व त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करता यावी हे मुख्य ध्येय या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे आहे. 

आपल्या राज्यांमध्ये दर वर्षाप्रमाणे लाखो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. त्यामधले काही विद्यार्थी तरुण व तरुणी जॉब क्षेत्रात काम करण्यासाठी रुजू होतात. तर काही मुले व मुली व्यवसाय क्षेत्रामध्ये काहीतरी मोठ करण्याचा लक्ष्य बनवतात. 

परंतु अशा तरुणांकडे व्यवसायाच्या कल्पना जरी चांगल्या असल्या तरी त्यांना उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळत नाही. यामुळे अशी तरुण पिढी बेरोजगारीच्या जाळ्यात अडकते. याच बेरोजगारीमध्ये अडकलेल्या सुशिक्षित व व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुणांसाठी राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे.

Annasaheb Patil Loan Yojana Benefits 

  • महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजना बेरोजगार व व्यवसाय करू पाहणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदतीचा फायदा मिळवा यासाठी सुरु केली. 
  • या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत करते. 
  • लाभार्थ्यांना या आर्थिक मदतीमध्ये दोन लाखांपासून ते पंधरा लाख रुपयांपर्यंत बिजव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 
  • महाराष्ट्र सरकारने लाभार्थ्यांना कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी दिला आहे. 
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत नागरिकांना तीन प्रकारच्या विविध लोन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
  • लाभार्थ्यांना वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना अशा तीन प्रकारचे लोन सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. 
  • लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज भरावे लागत नाही, कारण यावरील सर्व व्याज राज्य सरकार भरते. 

Annasaheb Patil Loan Yojana Eligibility 

तरुणांना व्यवसायासाठी कर्जाचा लाभ घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजनामध्ये पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्या पात्रतेच्या अटी लागू करण्यात आलेल्या आहेत? त्यांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

  • ज्या उमेदवारांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तो उमेदवार महाराष्ट्र राज्याचा मुळचा स्थानिक रहिवासी असणे.
  • यामध्ये व्यवसाय करणारा उमेदवार अर्ज करत असेल तर उद्योग आधार आणि शॉप ऍक्ट लायसन्स अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.  
  • अर्जदार उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. 
  • या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यामधील तरुण व तरुणी हे दोघे पात्र असणार आहेत. 
  • अर्ज करण्याऱ्या तरुणीचे वय 18 पेक्षा जास्त असणे, त्याचसोबत जास्तीत जास्त 55 वयोगटातील महिला सहभागी होण्यास पात्र आहे. 
  • त्यांच्याप्रमाणे तरुणाचे सुद्धा वय 18 पेक्षा कमी नसावे व नागरिकांचे वय 50 च्या आत असणे बंधनकारक आहे.  
  • अर्जदारांनी अण्णासाहेब पाटील महामंडळामधून कोणत्याही प्रकारच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • उमेदवारांना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी किमान 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.   
  • फक्त एकाच कुटुंबातील एकच सदस्य योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार. 
  • अर्जदार व्यक्तीचे कोणत्याही बँकेमध्ये लोन चालू असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. 
  • जर कोणत्याही व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतले असतील तर ते व्यवस्थितरित्या भरलेले असणे आवश्यक आहे. 

Annasaheb Patil Loan Yojana Required Documents 

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजनामध्ये आवश्यक असणारी कागपत्रे कोणती आहेत? त्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे, त्यानुसार जमा करून ठेवणे. 

  • उमेदवारांचे आधारकार्ड (बँकेसोबत लिंक असणे)
  • रेशनकार्ड 
  • स्थानिक रहिवासी दाखला 
  • व्यवसायाची संपूर्ण माहिती (प्रोजेक्ट रिपोर्ट) 
  • पॅनकार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • वार्षिक उत्पनाचा दाखला 
  • ई-मेल आयडी 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • बँक अकाउंटचे सर्व माहिती (पासबुक) 
  • शॉप ऍक्ट लायसन्स / गुमास्ता लायसन्स  (जर व्यवसाय चालू असेल तर) 
  • उद्योग आधार
  • आयटी रिटर्न (ITR)

Annasaheb Patil Loan Yojana Online Apply 

तरुणांना कर्ज मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही, कारण तुम्ही घरी बसल्या अण्णासाहेब पाटील लोन योजनामध्ये अर्ज करू शकता. अर्ज करताना फॉर्म कसा भरायचा? आणि कोणत्या प्रकिया करावे लागतील? याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे. 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाने उघडलेल्या udyog.mahaswayam.gov.in या वेबसाइटमध्ये जावे लागेल. 
  • शासनाच्या या वेबसाइटमध्ये गेल्यानंतर नवीन होम पेज उघडेल. 
  • त्या होमपेजमध्ये जाऊन तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड तयार करणे. 
  • आयडी व पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल ती भरून घेणे. 
  • तुमची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • यूजर आयडी व पासवर्ड तयार झाल्यानंतर ते सांभाळून ठेवणे. 
  • त्यानंतर परत तुम्हाला वेबसाइटच्या होमपेजमध्ये जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे. 
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तीन पर्याय दिसतील. 
  • तुमच्या सोयीनुर तिघांमधील एका पर्यायचे निवड करणे. 
  • पर्याय निवडून झाल्यानंतर तुमच्या समोर योजनेचे फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून अपलोड करणे. 
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. 
  • अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रकिया करू शकता. 

Annasaheb Patil Loan Yojana Offline Registration 

जर तुम्हाला अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण येत असतील. तर तुमच्या सोप्या पद्धतीने ऑफलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकता. आता ऑफलाइन अर्ज कसा करू शकतो? याबद्दलची माहितीसुद्धा खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. 

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील किंवा क्षेत्राजवळील CSC सेंटर म्हणजेच समस्या सेवा केंद्र या कार्यालयाला भेट द्यायची आहे. 
  • CSC सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला योजने संबंधित माहिती अधिकाऱ्याला सांगून फॉर्म प्राप्त करू घ्यायचा आहे. 
  • तुम्हाला फॉर्म मिळाल्या नंतर त्यामध्ये योजनेला आवश्यक असणारी सर्व माहिती विचारली असेल ती नीट वाचून भरून घेणे. 
  • फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडावे. 
  • पुन्हा CSC सेंटरमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्याकडे फॉर्म जमा करणे.
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता आणि लाभ मिळवू शकता. 
  • त्यानंतर योजनेच्या कार्यरत अधिकाऱ्यांकडून तुमचे फॉर्म व कागदपत्रे तपासले जातील. 
  • योजनेच्या अटीप्रमाणे तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम पाठविली जाईल. 

निष्कर्ष 

आमच्या लेखामधून Annasaheb Patil Loan Yojana संबंधित संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली आहे. यामध्ये आम्ही योजनांचे महत्त्व, त्यांचे उद्देश, त्यामधून होणारे फायदे, त्यासाठी लागणारी पात्रता, अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि दोन प्रकारचे अर्ज प्रकिया अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या माहिती सांगितली. 

तुम्हाला सुद्धा व्यवसाय करायचा आहे, परंतु लोन मिळत नाही तर अण्णासाहेब पाटील लोन योजनामध्ये अर्ज करून लाभ मिळवा आणि तुमच्या कुटुंबातील व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुणांना आमचा हा लेख पाठवा. 

अशाच फायदेशीर व उपयुक्त योजनांच्या माहितीसाठी Subscribe करा आणि Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा. 

FAQs

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? 

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी Business Loan दिले जाते. 

Annasaheb Patil Loan साठी कोण पात्र आहेत?

या कर्जासाठी महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक रहिवासी पात्र आहेत. 

बिनव्याजी बिजनेस लोन कुठे मिळेल? 

अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत बिनव्याजी बिजनेस लोन मिळेल. 

पुढे वाचा: