Pradhan Mantri Vaya Vandana Yojana 2024: जेष्ठ नागरिकांना मिळणार पेन्शनचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana 2024: केंद्र सरकारकडून वरिष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना पेन्शन स्वरूपात चांगल्या व्याजदरात आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकारने नेहमीच वरिष्ठांसाठी विविध प्रकारचे आर्थिक लाभ मिळण्यासाठी योजना चालू करत असतात. ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित आर्थिक स्रोत मिळण्यासाठी मदत करतात. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

जर नागरिकांना FD सारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली तर 5% ते 6% अशा कमी प्रमाणात व्याज दर मिळतो आणि त्यांना इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित वाटत नाही. यासाठी नेहमी जेष्ठ नागरिक चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात असतात. जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर चांगली स्थिर इनकम येत राहील. 

वरिष्ठांच्या या गोष्टींचा विचार करता केंद्र सरकारने पेन्शन स्कीम चालू केली, जिचे नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना असे ठेवण्यात आले आहेत. आज आपल्या लेखात या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? त्यामध्ये कोणते फायदे मिळतात? यासाठी पात्रता काय असणार? अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती? आणि अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल? अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तर लेख शेवटपर्यंत पहा. 

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana in Marathi 

केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदना योजनाची सुरुवात वरिष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी 4 में 2017 रोजी केली. ही योजना LIC च्या माध्यमातून राबिवली जाते आणि याचे संपूर्ण काम वित्त मंत्रालय बघते. 

केंद्र सरकारने सुरुवातीला नागरिकांना लाभ देण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत चालू ठेवण्याची निर्देश दिले होते. परंतु त्यानंतर योजनाची एका वर्षासाठी कालावधी वाढवून 31 मार्च 2023 पर्यंत करण्यात आली होती. 

या योजने अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनची मॅच्युरिटी कालावधी 10 वर्ष आहे. ज्यामध्ये गुंवणूक करण्यापासून दहा वर्ष कालावधीपर्यंत स्कीम लॉक केले जाते. या योजनेमध्ये 10 वर्षापर्यंत जेष्ठ नागरिकांना महिन्याला व्याज दरामध्ये पेन्शन दिले जाते. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना कमीतकमी 1.50 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत रक्कम गुंतवणूक करण्यात परवानगी आहे. 

यामध्ये सुरुवातीला 8% व्याज दिले जात होते, परंतु आपल्या देशाची इकॉनॉमी खाली पडल्यामुळे व्याज दर कमी 7.4% झाला होता. जर लाभार्थ्यांनी योजना अंतर्गत प्रति महिना पेन्शन घेतली तर त्यांना ७.४% व्याजाप्रमाणे रक्कम दिली जाते आणि जर वर्षांमध्ये पेन्शन प्राप्त करायचा असल्यास ७.६६% व्याज दर मिळतो.

PMKVVY Pension Rate of Interest

पेन्शन मुदतव्याज दर
वार्षिक पेन्शन7.66%
सहामाही पेन्शन7.52%
तिमाही पेन्शन7.45%
मासिक पेन्शन7.40%

PM Vaya Vandana Scheme 2024 Overview

योजनांचे नावप्रधानमंत्री वय वंदना योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु केली 04 में 2017 रोजी
कोणी सुरु केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी
विभागवित्त मंत्रालय, भारत सरकार
उद्देशजेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करणे
लाभार्थी60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील जेष्ठ नागरिक
लाभ8% नुसार प्रतिमहिना व्याज मिळणार
अर्ज प्रकियाऑनलाइन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://www.licindia.in/

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Aim 

प्रधानमंत्री वय वंदना योजनाचे मुख्य उद्देश देशामधील 60 वर्षाच्या वरच्या जेष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे. जसजसे आपल्या देशाची महागाई वाढत चाली आहे, तसतसे नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. 

त्यामध्ये जेष्ठ नागरिकांचे निवृत्ती झाल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक सुरक्षा नसते. यामध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक व इतर गोष्टींसाठी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या भविष्यात आत्मनिर्भर बनविणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. 

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Benefits 

  • भारत देशामधील जेष्ठ नागरिक प्रधानमंत्री वय वंदना योजनामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 
  • केंद्र सरकार LIC सोबत सहयोग करून जेष्ठ नागरिकांना पेन्शन स्वरुपात मदत करतात. 
  • या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षाच्या वरील वरिष्ठ नागरिकांना योजनेचा फायदा दिला जातो. 
  • जेष्ठ नागरिकांना इतर गुंतवणुकी पेक्षा या योजनेमध्ये जास्त व्याज दर दिला जातो. 
  • जे नागरिक या योजनेमध्ये लाभार्थी असतील, ते मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. 
  • योजनेमध्ये लाभार्थी कमीतकमी दीड लाख रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये भरू शकतात. 
  • लाभार्थ्यांना सेल्फ किंवा जोडीदार गंभीर आजारामध्ये असल्यास प्री म्यॅच्युरमध्ये पैसे काढण्यास परवगी आहे. परंतु 2% पेनल्टी रक्कम एकूण रक्कमेतून वजा केली जाते.
  • जर लाभार्थ्यांची काही कारणामुळे निधन झाले तर त्यामध्ये 2% पेनल्टी घेतली जात नाही. 
  • या योजनेच्या माध्यमातून जेवढी रक्कम लाभार्थीने भरली आहे, त्यांच्या 75% रक्कमेनुसार कर्ज काढण्याचा सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये वार्षिक 9.5% व्याज दर दयावे लागते. 
  • लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी 3 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. 
  • PMVVY योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे टॅक्स घेतले जात नाही. 
  • यामध्ये नॉमिनेशन सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये कुटुंबातील जोडीदार व मुलांना नॉमिनी ठेवू शकतात. 

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Eligibility 

जेष्ठ नागरिकांना प्रधानमंत्री वय वंदना योजनासाठी पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेले पात्रतेच्या अटी पाहणे. 

  • ज्या नागरिकांनाच या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आहेत, ते भारतचे स्थानिक रहिवासी असणे. 
  • या योजनेमध्ये फक्त जेष्ठ नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असणे. 
  • PMVVY योजना अंतर्गत 10 वर्षाचा लॉकिंग कालावधी ठेवण्यात आला आहे. 
  • यामध्ये लाभार्थ्यांना शेवटपर्यंत एकच पेन्शन पर्याय निवडण्याची परवगी आहे.

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Required Documents 

जेष्ठ नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री वय वंदना योजनामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेली आहे त्यानुसार जमा करणे. 

  • जेष्ठ नागरिकांचे आधार कार्ड (बँकसोबत लिंक असणे) 
  • बँक खात्याचे पासबुक 
  • वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र 
  • पॅनकार्ड 
  • स्थानिक रहिवासी दाखला 
  • मोबाईल अंबर 
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • जॉईंट अकाउंटसाठी जोडीदाराचे कागदपत्रे 

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Registration 

जेष्ठ नागरिकांना PMVVY मध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रकिया करावे लागणार. या योजनेमध्ये तुमच्या सोयीनुसार प्रक्रिया निवडू शकता. या दोन्ही पद्धतीचे प्रक्रिया खालीलप्रमाणे दिलेले आहेत. 

प्रधानमंत्री वय वंदना योजना ऑनलाइन अर्ज 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला LIC ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. 
  • जीवन विमाची वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला योजने संबंधित रजिस्ट्रेशन पर्याय निवडायचे आहे. 
  • रजिस्ट्रेशन पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अर्जाचा फॉर्म दिसेल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला योजनेसंबंधित लागणारी माहिती विचारली असेल, ती भरून घेणे. 
  • फॉर्ममधील माहिती संपूर्ण भरून झाल्यावर आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 
  • सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर व्यवस्थित तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रकिया फॉलो करू शकता. 

प्रधानमंत्री वय वंदना योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया 

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला LIC च्या ऑफिसमध्ये जावे लागेल किंवा सर्व प्रक्रिया करण्यासाठी LIC एजेंटची निवड करावे लागेल. 
  • जर तुम्ही LIC ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा विचार करत असाल तर जवळच्या कार्यालयात जाणे. 
  • ऑफिसमध्ये गेल्यानंतर अधिकारीशी योजना संदर्भात माहितीबद्दल चर्चा करणे. 
  • त्यानंतर अधिकाऱ्याकडून प्रधानमंत्री वय वंदना योजनाचे फॉर्म प्राप्त करून घेणे. 
  • फॉर्म घेतल्यानंतर त्यामध्ये असलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • त्यानंतर योजनेमध्ये आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडणे. 
  • फॉर्म व कागदपत्रे जमा करून LIC च्या कार्यालयात जाऊन सादर करणे. 
  • फॉर्म सादर केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल ती सांभाळून घेणे. 
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन अर्ज करण्यासाठी प्रकिया फॉलो करू शकता. 

निष्कर्ष 

आमच्या या लेखातून Pradhan Mantri Vaya Vandana Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या मार्गदर्शन केले. यामध्ये योजनाचे महत्त्व काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु करण्यात आली? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? सुरु करण्यामागचे उद्देश काय आहेत? त्यांचे फायदे कोणते आहेत? यासाठी कोणते नागरिक पात्र असणार आहेत? अर्ज करताना नागरिकांना कोणते कागदपत्रे दयावी लागणार? त्याचसोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकियांना फॉलो करावे लागणार? आणि त्याचसोबत योजनेमधून किती पेन्शन सुविधा दिली जाते? अशा सर्व गोष्टींबद्दल सांगितले. 

जर तुमच्या घरात कोणी जेष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या भविष्यामध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. जर तुम्हाला आमचा हा आर्टिकल आवडला असेल, तर गरजू लोकांना लेख पाठवा.

असच उपयुक्त योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Telegram/WhatsApp जॉईन करू शकता. जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट माहिती त्वरित भेटण्यात मदत होते. 

FAQs

पीएम वय वंदना योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

या योजनेमध्ये भारतामधील 60 वयोगातील जेष्ठ नागरिक पात्र असणार आहेत.

PM Vaya Vandana Scheme मध्ये किती व्याज दर भेटते?

या स्कीममध्ये प्रत्येक वार्षिक पेन्शननुसार 7.66% नुसार व्याज दर दिले जाते. 

प्रधानमंत्री वय वंदना योजनाची सुरुवात कोणत्या साली झाली? 

या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने वर्ष 04 में 2017 रोजी करण्यात आली होती.

पुढे वाचा: