PM Kisan Mandhan Yojana 2024: भारत देशामधील शेतकरी वर्गाला आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली. केंद्र सरकारतर्फे या योजनेमधून शेतकरी वर्गातील नागरिकांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक आर्थिक पेन्शन स्कीम असून ती फक्त शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्मॉल व मार्जिनल वर्गातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल, जे शेतकरी स्मॉल वर्गात मोडतात आणि ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे ते मार्जिनल वर्गात मोडले जातात.
आपल्या देशामध्ये मार्जिनल व स्मॉल वर्गातील शेतकऱ्यांची संख्या 82% पेक्षा जास्त आहे. यामधून आपल्याला जाणवते की, शेतकरी कशाप्रकारे कष्ट करून आपले दिवस चालवत असतात. कमी जमीन असल्याकारणामुळे शेतकऱ्यांना जास्त काही उत्पन्न मिळत नाही. त्याचसोबत दैनंदिन जीवनात त्यांना खर्च भागविण्यासाठी मदत मिळत नाही, यामुळे भविष्यकाळासाठी पैसे जमविणे त्यांना शक्य होत नाही आणि अशातच म्हातार वयामध्ये त्यांना निवृत्ती घेतल्यावर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
शेतकऱ्यांच्या अशाच आर्थिक समस्यांना दूर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली. आज आपल्या लेखातून याच योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा. यामध्ये आम्ही योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय होते? त्यामधून शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार? योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार? लाभार्थ्यांना अर्ज करताना लागणारी कागदपत्रे कोणती? आणि कशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकतात? याबद्दल सविस्तारित्या सांगितले आहेत.
PM Kisan Mandhan Yojana in Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनाची सुरुवात 31 मे, 2019 रोजी केली होती. या योजनेच्या माध्यमातून 60 वर्ष पूर्ण झालेल्या शेतकरी नागरिकांना दर महिन्याला 3000 रुपये बँक खात्यामध्ये पेन्शन स्वरूपात ट्रान्सफर केले जाते. जेणेकरून त्यांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर ते आयुष्याच्या अखेरपर्यंत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
जसे आपण पाहिले ही योजना आपल्या देशातील अन्नदात्यांसाठी आहे, तर योजनेचे संपूर्ण काम कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविले जाते. शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात योग्यरीत्या निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने LIC (Life Insurance Corporation) सोबत सहयोग केले आहेत. LIC एकाप्रकारे फंड मॅनेजर आहे जे योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम मॅनेज करतात.
Pradhan Mantri Kisan Mandhan Scheme 2024 Overview
योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान मानधन योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉन्च दिनांक | 31 मे, 2019 |
कोणी लॉन्च केली | भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | शेतकऱ्यांना सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | शेतकरी वर्गातील नागरिक |
लाभ | दरमहा 3000 रुपये पेन्शन |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://maandhan.in/ |
हेल्पलाईन नंबर | 1800-3000-3468 |
ई-मेल आयडी | support@csc.gov.in |
PM Kisan Mandhan Scheme Aim
केंद्र सरकारचे प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंतर्गत मुख्य उद्देश स्मॉल व मार्जिनल शेतकऱ्यांचे म्हातारपणामध्ये संरक्षण व सामाजिक सुरक्षा करणे आहे. या योजनेमधील लाभार्थी जेव्हा 60 वयाचे होतील, तेव्हा यामधून त्यांना आर्थिक सुरक्षा म्हणून दर महिन्याला तीन हजार रुपये प्रदान केले जातात.
आपल्या देशामध्ये लहान व मध्यम वर्गातील शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याकारणामुळे केंद्र सरकारचे ध्येय शेतकऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत पुरविणे. जेणेकरून त्यांना म्हातार वयामध्ये कोणत्याही प्रकारचे काम करावे लागणार नाही. त्याचसोबत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. केंद्र सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे शेतकरी आपले जीवन आत्मनिर्भर बनवून जगू शकतात.
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana Key Features
- प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही सेंट्रल सेक्टर स्कीम असून ती केंद्र सरकारतर्फे फंड करण्यात येते.
- लाभार्थ्यांचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर Fixed Pension स्वरूपात प्रतिमाह 3000 रुपये त्यांना प्रदान केले जातात.
- ही योजना ऐच्छिक असून Contribution Based Pension Scheme आहे.
- लाभार्थ्यांना निवृत्तीच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत 55 रुपये पासून ते 200 रुपये पर्यंत प्रीमियम भरावा लागतो.
- शेतकऱ्याकडून जेवढी रक्कम भरली जाईल तेवढीच केंद्र सरकारकडून समान पद्धतीने पेन्शन फंड भरली जाते.
- या योजनेमध्ये शेतकरी पती-पत्नी वेगवेगळे अर्ज करू शकतात.
- लाभार्थीचे वय 29 असेल तर या मध्यम वयामध्ये त्यांना 100 रुपये प्रति महिना प्रीमियम भरावा लागेल.
- शेतकरी त्यांच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकतो.
PM Kisan Mandhan Yojana Benefits
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनाचा फायदा भारत देशामधील शेतकरी वर्गाला दिला जातो.
- या योजनामध्ये लहान व मध्यम वर्गातील शेतकरी अर्ज करून आर्थिक लाभ घेऊ शकतो.
- केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम पाठविली जाते. यामुळे शेतकऱ्यांना कुठेही धावपळ करायची गरज लागणार नाही.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना प्रत्येक महिलांना 3 हजार रुपये आर्थिक मदत पुरविली जाते.
- शेतकरी वर्ग PM Kisan Samman Nidhi योजनाचा लाभ घेत असतील, तर या योजनेचासुद्धा लाभ घेऊ शकतात.
- या योजनामध्ये शेतकऱ्यांना फक्त महिन्याला 55 रुपये ते 200 रुपये पर्यंत दर महिन्याला प्रीमियम जमा करावे लागणार.
- देशामधील लहान व मध्यम वर्गातील 5 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- या योजनेतील लाभार्थीचे काही कारणामुळे निधन झाल्यास त्यांची पेन्शन रक्कम 1500 रुपयांच्या स्वरूपात जोडीदाराला प्रदान केली जाते.
PM Kisan Mandhan Yojana Eligibility
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान मानधन योजनामध्ये पात्र ठरण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्र असणे गरजेचे आहे.
- सर्वात प्रथम अर्ज करणारा शेतकरी नागरिक भारताचा स्थानिक रहिवासी असणे.
- या योजनामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे वय 18 ते 40 वर्षाच्या आत असणे.
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनामध्ये फक्त लहान व मार्जिनल वर्गातील शेतकरी अर्ज करू शकतात.
- ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे ते या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत.
- लाभार्थ्यांना दर महिन्याला लागू असलेली प्रीमियमची रक्कम भरणे गरजेचे आहे.
- 40 वयोगटातील नागरिकांना प्रतिमाह 200 प्रीमियम भरावे लागणार.
- 18 वर्ष असलेल्या नागरिकांना प्रति महिना 55 रुपये प्रीमियमची रक्कम द्यावी लागणार.
- लाभार्थ्यांकडे स्वतःचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत जोडलेले असणे गरजेचे आहेत.
- शेतकऱ्यांकडे अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सोबतीला असणे.
PM Kisan Mandhan Yojana Required Documents
प्रधानमंत्री किसान मानधन योजनाची आवश्यक कागदपत्रे यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे दिली आहे, त्यानुसार अर्ज करताना जमा करणे.
- वयाचे प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँक खात्यामध्ये लिंक असणे)
- ओळखपत्र
- स्थानिक रहिवासी पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जमिनीचे कागदपत्रे
- बँक खात्याचे पुरावे (पासबुक)
PM Kisan Mandhan Yojana Apply
जे शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनामध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आम्ही दिलेल्या प्रक्रियेनुसार स्टेप बाय स्टेप अर्ज करू शकतात.
- अर्जदारांना अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम आवश्यक असणारी कागदपत्रे झेरॉक्स करून सोबत घ्यायची आहेत.
- त्यानंतर शेतकरी बांधवाना कागदपत्रे घेऊन सुरुवातीला त्यांच्या जवळच्या जन सेवा केंद्र (CSC) च्या कार्यालयात जावे लागेल.
- सामान्य सेवा केंद्रात गेल्यानंतर अधिकाऱ्याला योजने संबंधित माहिती देऊन फॉर्म प्राप्त करून घ्यायचे आहे.
- फॉर्म प्राप्त करताना काही रक्कम त्यांना द्यावी लागेल ती भरून घेणे.
- अधिकाऱ्याकडून फॉर्म घेतल्यानंतर आवश्यक माहिती भरून घेणे.
- त्यानंतर झेरॉक्स केलेली कागदपत्रेसोबत जोडून घेणे.
- सुरुवातीला फॉर्म व कागदपत्रे अधिकाऱ्याकडे जमा करताना प्रीमियम भरावा लागेल.
- त्यानंतर अधिकारीकडून तुमचे फॉर्म तपासले जातील व पुढे पाठविले जातील.
- केंद्रातील अधिकारीकडून अर्जदारांना खाते नंबर दिले जातील.
- अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून लाभ घेऊ शकता.
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana Login Process
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनामध्ये लॉगिन करण्यासाठी सुरुवातीला अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला होमपेजमध्ये साइन इनचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय दिसतील, त्यामधील सेल्फ एनरोलमेंट निवडायचे.
- निवडून झाल्यानंतर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुमचे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी किंवा यूजरआयडी भरून घ्यायचा.
- त्यानंतर पासवर्ड तयार करायचा व कॅप्चा कोड टाकून घेणे.
- सर्व माहिती भरून घेतल्यानंतर आयडी व पासवर्ड सेफ ठिकाणी नोंद करून Sign In करणे.
- अशा पद्धतीने पोर्टलमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही लॉगिन करू शकता.
निष्कर्ष
अशा प्रकारे आम्ही तुम्हाला PM Kisan Mandhan Yojana संबधित संपूर्ण माहित सविस्तररित्या सांगितली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना योजनेचा काय फायदा मिळणार? ती केंद्र सरकारने का सुरु केली? त्यामागचे उद्देश काय होते? यामधून कोणत्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार? कोणत्या वर्षी योजनेची सुरुवात केली? कोणते विभाग यामध्ये सहकार्य करत आहेत? योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत? यामध्ये शेतकरी पात्र कसा ठरू शकतो? शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे जमा करावी लागणार? अर्जदार नागरिक अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकियांचा वापर करू शकतो? योजनेच्या वेबसाइटमध्ये लॉगिन कशा पद्धतीने करू शकतो? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगितली.
तुम्ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनासाठी पात्र असाल, तर अर्ज करून भविष्यात आर्थिक स्थिरता कायम ठेवू शकता. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा.
अशाच शेती विषयक योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करु शकता आणि Telegram चॅनेलला जॉईन करू शकता.
FAQs
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची सुरु कधी झाली?
या योजनेची सुरुवात 31 मे, 2019 रोजी करण्यात आली होती.
मानधन योजनेत किती पेन्शन दिले जाते?
मानधन योजनेमध्ये 3000 प्रति महिना पेन्शन दिले जाते.
Mandhan Yojana साठी कोण पात्र आहेत?
या योजनेमध्ये शेतकरी वर्गामधील नागरिक पात्र आहेत.
पुढे वाचा: