PM Kisan Sampada Yojana 2024: नेमकी काय आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना?

PM Kisan Sampada Yojana 2024: केंद्र सरकारने अन्न प्रक्रियाच्या विकासामध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री किसान संपदा योजना (PMKSY) सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून अन्न प्रक्रियेमध्ये आधुनिक कल्पनांचा उपयोग केला जातो आणि अन्नाचे होणारी नासाडी कमी करण्यात मदत होते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामधील शेतकरी वर्ग दोन गोष्टींमध्ये मागे आहेत आणि एका गोष्टीमध्ये पुढे आहे. शेतकरींकडून उत्पादन चांगल्या प्रकारे होते, परंतु आजही उत्पादन वाढीवर लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्पादन तर चांगले प्राप्त होत असले तरी आपल्या देशामधील शेती विषयी मार्केटिंग व प्रकिया या दोन गोंष्टींमध्ये मागे आहेत. 

केंद्र सरकारडून शेतीच्या मार्केटींगसाठी काही काही योजना आहेत, जसे इंटिग्रेटेड स्कीम फॉर ऍग्रीकल्चर मार्केटिंग (ISAM), अग्रीकल्चरल मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI), नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट यांसारखे योजना शेतीला प्रोत्साहन देते आहे. 

आपल्या देशात शेतकरी कोणत्याही प्रकारचे अन्न प्रकिया करत नाही. यामध्ये फक्त देशातील खाजगी उद्योग कंपन्या काम करतात. शेतकऱ्यांना अन्न प्रक्रियावरती जोर देण्यासाठी केंद्र सरकारने Pradhan Mantri Kisan Sampada Yojana ची सुरवात केली. जेणेकरून आपले अन्नदाता प्रकिया क्षेत्रात सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकतील. 

आज आपल्या लेखातून तुम्हाला प्रधानमंत्री किसान संपदा योजना संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मदत होईल. यामध्ये योजनाचे उद्देश, त्यांचे फायदे, त्यामध्ये अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तररित्या सांगितले आहे, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत लेख पहा.  

PM Kisan Sampada Yojana in Marathi

केंद्र सरकारकडून सुरुवातीला SAMPADA नाव दिले गेले होते, त्यानंतर 2017 रोजी नाव बदलून Pradhan Mantri Kisan Sampada Yojana करण्यात आले. संपदाचा पूर्ण अर्थ Scheme for Agro-Marine Processing and Development of Agro-Processing Clusters असे होते. ज्याची सुरुवात वर्ष 2016 रोजी करण्यात आली होती. 

या योजनेचा सुरुवातीपासून लक्ष्य होते, अन्न प्रक्रियांवर जेणेकरून उत्पादनामध्ये निघालेल्या अन्नाचे ताजेपणा टिकविण्यात मदत मिळेल. योजनेच्या सुरुवातीला मेगा फूड पार्क अशी कल्पना यामध्ये राबविली जात होती, ज्यामध्ये मोठ्यमोठ्या फूड पार्क चालविण्यासाठी केंद्र सरकार मदत करत होती. परंतु ती बंद करण्यात आली आहे. 

आता केंद्र सरकार असंघटित ग्रुपला व छोट्या-छोट्या फूड पार्कच्या ग्रुपला तसेच Farmer Producer Organization (FPO) याना मदत करत आहेत. योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मदत पुरविण्याचे काम Ministry of Food Processing and Industries (MoFPI) करतात.

Components of PM Kisan Sampada Scheme (PMKSY)

  • मेगा फूड पार्क स्कीम (MFPS) 
  • Integrated Cold Chain and Value Addition Infrastructure 
  • Creation/Expansion of Food Processing & Preservation Capacities 
  • Infrastructure for Agro-Processing Clusters
  • Creation of Backward & Forward Linkages 
  • Food Safety and Quality Assurance Infrastructure 
  • Human Resource and Institutions Development 

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 Overview

योजनाचे नावप्रधानमंत्री किसान संपदा योजना (PMKSY)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कधी झाली2016 रोजी
कोणी सुरु केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी
विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार
उद्देशअन्न प्रक्रियाचा विकास करणे व अन्नाची होणारी नासाडी कमी करणे
लाभार्थीभारतामधील शेतकरी वर्ग
अर्ज प्रकियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://www.mofpi.gov.in/
हेल्पलाईन नंबर011-26406557

PM Kisan Sampada Scheme Objective 

केंद्र सरकारचे प्रधानमंत्री किसान संपदा योजनामधून मुख्य उद्देश कृषी क्षेत्रामधील अन्न प्रकियांवर जोर देऊन शेतीपूरकअन्न तयार करणे आणि अन्नाची नासाडी कमी करणे आहे. आपल्या देशामध्ये पोस्ट हार्वेस्टिंग नंतर अन्नाचे नुकसान भरपूर प्रमाणात केले जाते. ज्यामध्ये धान्यामध्ये 6% ते 8%, मांसाहारी अन्नामध्ये 10% ते 12% आणि भाज्यांच्या व फळांच्या उत्पादनामध्ये 15% पेक्षा नुकसान होते. 

सर्वात जास्त पपईच्या उत्पादनामध्ये खराबी होते व भाज्यांमध्ये फ्लॉवरचे जास्त प्रमाणात नुकसान होते. परंतु दुधामध्ये सर्वात कमी प्रमाणात नुकसान होते, कारण विविध प्रकारे प्रक्रिया केले जाते, त्याचसोबत जर दूध खराब झाले तर विविध पदार्थ बनविले जाते. 

भाजीपाला, फळभाज्या व इतर शेतीसंबंधित अन्नाचे नुकसान कमी करण्यसाठी केंद्र सरकारकडून सिंगल युनिट व एकत्रित तयार केलेले मेगा फूड पार्क यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिले जाते. त्याचसोबत आपल्या देशाची GDP वाढविण्यासाठी शेतकरी, प्रक्रिया करणाऱ्या संघटना आणि मार्केटला जोडले जाते. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून मजबूत Supply Chain तयार करून अन्नाची नासाडी थांबविणे हे ध्येय आहे. 

PM Kisan Sampada Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही केंद्रीय क्षेत्रामधील एक अम्ब्रेला स्कीम आहे. 
  • या योजनेमध्ये 7 प्रकारच्या घटकांचा समावेश आहेत, ज्यामधून विविध प्रकारचे फायदे दिले जातात. 
  • केंद्र सरकारकडून फूड प्रोसेसिंगसाठी लागणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधा 50 कोटीपर्यंतचे आर्थिक मदत केले जाते. 
  • जर शेतकरी सामान्य राज्यामधून जसे राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब व महाराष्ट्र असेल तर 50% आणि डोंगराळ राज्यातील जसे जम्मू व काश्मीर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश यामधील लाभार्थी असेल तर 75% केंद्र सरकार आर्थिक मदत दिली जाते. 
  • केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान संपदा योजनासाठी 4600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 
  • अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून 41 मेगा फूड पार्कसाठी मान्यता देण्यात आली. त्यामधील 22 Mega Food Park चालू करण्यात आले आहेत. बाकी राहिलेले 19 त्यांची अंमलबजावणी चालू आहे. 
  • भारतमध्ये सर्वात पहिला मेगा फूड पार्क आंध्र प्रदेशमधील चित्तोरमध्ये चालू करण्यात आला. 
  • त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पहिला मेगा फूड पार्क चालू केला होता. 
  • केंद्र सरकारने फूड प्रोसेसिंग योग्यरीत्या करण्यासाठी 100% Foreign Direct Investment (FDI) ला परवानगी दिली आहे, जेणेकरून बाहेर देशातून गुंतवणूकदार येतील, गुंतवणूक करतील, नवीन-नवीन टेक्निक घेऊ येतील, यामुळे आपल्या देशातील पायाभूत सुविधा सुधारेल. 
  • केंद्र सरकारने फूड व ऍग्रो प्रक्रिया युनिट व कोल्ड चैन इन्फ्रास्ट्रक्चरला Priority Sector Lending (PSL) अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे. जेणेकरून योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अन्न प्रक्रियांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाते. 
  • Farmers Producers Organizations (FPO) यांच्याकडून 100 कोटीच्या खाली वार्षिक turnover असले आणि जेवढेसुद्धा प्रॉफिट झालेले असेल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे टॅक्स घेतले जात नाही. जर शंभर कोटींच्या वरती वार्षिक टर्नओव्हर असेल तर टॅक्स लागू केला जातो.
  • PMKSY योजना अंतर्गत केंद्र सरकारचे देशामधील वीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे ध्येय आहेत.  

PM Kisan Sampada Yojana Required Documents

केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान संपदा योजनासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे यादीनुसार दिलेले आहेत ती जमा करून ठेवणे. 

  • अर्जदारच व्यक्तीचे आधारकार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • रेशनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • वार्षिक उत्पानचे प्रमाणपत्र
  • डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट 
  • बँकेतून टर्म लोन मंजुरी 
  • जमीचे पुरावे (रेंट अग्रीमेंट किंवा मालकी हक्क कागदपत्रे) 
  • बँक पासबुकचे पहिले पान  

PM Kisan Sampada Yojana Apply Online 

ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान संपदा योजनामध्ये अर्ज करण्यसाठी इच्छुक आहेत, त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करा आणि लाभ मिळवा. 

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान संपदा योजनाची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 
  • योजनेच्या वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल. 
  • त्या होमपेजमध्ये तुम्हाला योजने संबंधित अर्जाचे पर्याय दिसेल, त्यामध्ये जाणे. 
  • त्यानंतर तुम्हाला PMKSY योजनाच्या अर्जाचे फॉर्म प्राप्त होईल. 
  • त्या फॉर्ममध्ये विचारली असलेली संपूर्ण माहिती वाचून अचूक भरून घेणे. 
  • अर्जाचा फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. 
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर व्यवस्थितरीत्या सगळी माहिती तपासून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. 
  • अशा प्रकारे तुम्ही PMKSY योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकता. 

निष्कर्ष 

या लेखामध्ये PM Kisan Sampada Yojana संबंधित आम्ही संपूर्ण माहिती मार्गदर्शन केली. यामध्ये योजना काय आहे? केंद्र सरकारने का सुरु केली? कशामुळे सुरु केली? यामधून कोणते फायदे नागरिकांना होणार? योजनाची सुरुवात कधी केली? सुरु करण्याचे उद्देश काय होते? त्यासाठी कोणती वेबसाइट आहे? अर्ज करण्यासाठी नागरिकांना कोणते कागदपत्रे लागणार आहेत? त्यामध्ये कोणत्या घटकांचे समावेश करण्यात आले? आणि शेतकरी यामधून कशाप्रकारे अर्ज करून लाभ घेऊ शकतो? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या सांगतिले. 

आपल्या देशामध्ये फूड प्रोसेसिंगची गरज खूप आहे आणि दिवसेदिवस पालेभाज्या, फळभाज्या आणि तर खाद्य पदार्थांची नासाडी वाढत आहे, त्यांना कमी करण्यासाठी शेतकरी वर्गामधील नागरिकांनी पुढाकार घेतलाच पाहिजे. केंद्र सरकारने चालू केलेल्या प्रधानमंत्री किसान संपदा योजना अंतर्गत शेती सोबत फूड प्रकिया सुद्धा चालू करून चांगले उत्पन्न कमाऊ शकता. 

तुम्हाला आमचा आर्टिकल उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांनासुद्धा पाठवून लाभ घेण्यास प्रेरित करा. अशाच योजनांच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या Telegram किंवा WhatsApp ग्रुपला जॉईन करू शकता. 

FAQs

SAMPADA योजनेची सुरुवात कधी झाली होती? 

केंद्र सरकारने 2016 रोजी SAMPADA योजनेची सुरुवात केली होती. 

Pradhan Mantri Kisan Sampada Scheme कोणते विभाग बघत आहेत? 

हि स्कीम अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्याकडून चालविण्यात येत आहे. 

PMKSY चा पूर्ण अर्थ काय आहे? 

PMKSY चा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री किसान संपदा योजना असा आहे. 

पुढे वाचा: