Pradhanmantri Krishi Sinchai Yojana 2024: देशामधील शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन लावण्यासाठी लागणारी उपकरणे घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सबसिडी प्रदान केली जाते.
PMKSY योजना कृषी संबंधित उपक्रमांवरती तयार केली आहे. या योजनेची सुरुवात फक्त 5 वर्षांसाठी केली होती, परंतु केंद्र सरकारकडून कालावधी वाढविण्यात आला आहे. आपल्या देशामध्ये जवळपास 14 लाख हेक्टर कृषी क्षेत्र आहे. त्यामध्ये फक्त 49% क्षेत्रामध्ये सिंचन केले जात आहेत. म्हणजेच बाकीच्या कृषी क्षेत्रामध्ये सिंचन प्रणाली नसल्यामुळे पाण्याची समस्या होत आहे.
देशभरामध्ये राहिलेल्या क्षेत्रात सिंचन प्रणाली वाढविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. आज आपण याच योजनेची संपूर्ण माहिती आपल्या लेखामधून जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत लेख पहा. यामध्ये आम्ही योजनाचे महत्त्व, त्यांचे उद्देश, त्यामधून शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्यांचे घटक, यामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी, शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तारित्या सांगणार आहोत.
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana in Marathi
केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात वर्ष 1 जून, 2015 रोजी केली असून ती सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे. जसे PM Fasal Bima Yojana मध्ये केंद्र व राज्य सरकार एकत्रित सहभागी होतात, तसेच PMKSY यामध्ये सुद्धा दोन्ही सरकार एकत्रित सहभागी होतात. केंद्राकडून 75% व राज्य सरकार 25% असे 75:25 च्या प्रमाणानुसार PMKSY अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. डोंगराळ व ईशान्य क्षेत्रातील भागामध्ये 90:10 चे प्रमाण असते.
या योजने अंतर्गत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालय या तीनही मंत्रालयाचा समावेश आहे. या योजनेमध्ये “हर खेत को पाणी” या नावाने प्रचार केला जातो आणि योजनेच्या माध्यमातून प्रचाराचे मुख्य उद्देश देशभरातील कृषी वर्गाना पाण्याची सोय उपलब्ध करून देणे.
केंद्र सरकारचे या योजनेतून दोन मुख्य लक्ष्य आहेत, ते म्हणजे लागवडीसाठी सिंचन प्रणाली उपलब्ध करून देणे आणि जास्त पाणी वाया जाण्यापासून रोखणे व पाण्याची कार्यक्षमता वाढविणे. एका थेंबातुन जास्त पिकांना पाणी पुरविण्यासाठी केंद्र सरकार मायक्रो सिंचन वापरण्यासाठी शेतकरी वर्गाला सुचवत आहेत.
मायक्रो सिंचनाचे प्रकार व त्यांची कार्यक्षमता
प्रकार | कार्यक्षमता |
ड्रीप सिंचन | 92% – 95% |
स्प्रिंकलर सिंचन | 60% – 75% |
सर्ज सिंचन | 85% – 95% |
पृष्ठभाग सिंचन | 30% – 40% |
PKSY 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी |
केव्हा सुरु केली | वर्ष 1 जून, 2015 रोजी |
विभाग | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशभरात सिंचन प्रणाली उपलब्ध करून कृषीसाठी पाण्याची सोय करणे |
लाभार्थी | भारत देशामधील शेतकरी वर्ग |
लाभ | सिंचन उपकरणे घेण्यासाठी सबसिडी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmksy.gov.in |
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana Objectives
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनांचे मुख्य उद्देश देशामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे तसेच पाण्याची कार्यक्षमता वाढवून नासाडी कमी करणे आहे. आपला भारत देश हा संपूर्ण कृषी व पाण्यावर अवलंबून आहे. त्यामध्ये आपल्या देशात फक्त 49% टक्के क्षेत्रात सिंचन वापरले जात आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी विविध प्रकारे शेतीसाठी पाणी वापरले जाते, त्यामुळे पाण्याची नासाडी होते, त्याचसोबत शेतीमधील पिकांना व्यवस्थितरित्या पाणी पोहचून चांगले उत्पादन निघण्यासाठी सिंचनाची गरज आहे.
आपल्या देशात काही ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे शेती व्यवस्थितरित्या होत नाही आणि पिकांचे सुद्धा नुकसान होते. या समस्यांना दूर करण्यासाठी केंद्र सरकारने PMKSY अंतर्गत पन्नास हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांकडे सिंचनामार्फत शेती करण्यात मदत होईल.
PKSY Components
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत असणारे तीन प्रमुख घटक आणि त्यांची अंमलबजावणी विविध प्रकारचे विभाग करत आहेत. खालीलप्रमाणे दिलेल्या तीन घटकांचे यामध्ये समावेश आहेत.
१. जल संपदा, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग – जलद सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP) व हर खेत को पाणी (HKKP)
२. जमीन संसाधन विभाग – पाणलोट विकास
३. कृषी विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण विभाग – पर ड्रॉप मोर क्रॉप
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana Benefits
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामधून भारत देशातील शेतकरी वर्गाला फायदा दिला जातो.
- या योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील कृषी क्षेत्रामध्ये सिंचन कनेक्शन जोडले जाते.
- शेतकऱ्यांना सिंचन कनेक्शनमधून शेतीसाठी पाणी योग्यरीत्या मिळण्यामध्ये मदत होते.
- केंद्र सरकारकडून मायक्रो सिचन पद्धत स्थापित करून दिली जाते, जेणेकरून जास्त पाण्याचा निचरा न होता कार्यक्षमता वाढविण्यात मदत होते.
- केंद्र सरकारतर्फे पाण्याची सोय करण्यासोबत शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे उपकरण विकत घेण्यासाठी सबसिडी सुद्धा प्रदान करण्यात येते.
- शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या उपकरणानुसार 80% ते 90% आर्थिक मदत सबसिडीच्या मार्फत केली जाते. यामुळे शेतकरी वर्गाला जास्त न खर्च करता बचत होते.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना व्यवस्थित पाणी मिळून उत्पादन वाढविण्यासाठी मदत मिळते.
- केंद्र सरकारकडून या योजनेची पहिले पाच वर्ष होती, ती वाढवून 2021-22 ते 2025-26 पर्यंत करण्यात आली आहे.
- या योजनेमध्ये ग्राउंड वॉटर व पर ड्रॉप मोर क्रॉप घटक सोडले तर बाकी घटकांसाठी कालावधी वाढविण्यात आला आहे.
- PMKSY योजना अंतर्गत 50,000 कोटी रुपयांचा आर्थिक बजेट केंद्र सरकारने ठरविला आहे.
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana Eligibility
शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामध्ये पात्र ठरण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्रता असणे महत्त्वाचे आहे.
- शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- या योजनेमध्ये शेतकरी व शेती संबंधित सर्व वर्गातील नागरिक पात्र आहेत.
- सहकारी समिती, सेल्फ हेल्प ग्रुप, उत्पादक कृषी समूह, इनकॉरपोर्टेड कंपनी आणि ट्रस्ट यामधील सदस्य योजना अंतर्गत अर्ज करण्यास पात्र ठरतील.
- जे नागरिक Lease Agreement प्रमाणे कमीत कमीत 7 वर्ष शेती करत आहेत ते यामध्ये सहभागी होऊ शकतात.
- या योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांकडे शेत जमीन असणे.
- शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे जवळ असणे.
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana Required Documents
लाभार्थ्यांना अर्ज करताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाची आवश्यक कागदपत्रे जवळ असणे. यासाठी खालील यादीमध्ये कागदपत्रांची माहिती सांगितली आहे, त्यानुसार जमा करणे.
- शेत जमीचे कागदपत्रे
- शेतकरी/लाभार्थ्यांचे आधारकार्ड (बँक लिंक असलेले)
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचा पुरावा (पासबुकचे पहिले पान)
- ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अधिवास प्रमाणपत्र
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana Apply Online
ज्या सदस्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामध्ये अर्ज करायचा आहे, त्यांनी खालील दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला PMKSY च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जायचे आहे.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला होमपेजमध्ये तुमच्या राज्याची निवड करावी लागेल.
- निवड केल्यानंतर राज्याच्या वेबसाइटमध्ये पोहोचाल.
- त्यामध्ये पोहचल्यानंतर तुमच्या समोर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाचा फॉर्म ओपन होईल.
- त्या फॉर्ममध्ये योजनासंबंधित आवश्यक असणारी माहिती विचारली असेल ती भरून घेणे.
- माहिती भरून झाल्यानंतर गरजेचे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे.
- त्यानंतर फॉर्म पूर्ण तपासून खात्री झाल्यांनतर सबमिट करून पुढे पाठवा.
- अशा प्रकारे तुम्ही अर्ज करण्यासाठी प्रक्रिया पार पाडू शकता.
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana Apply Offline
तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी काही कारणामुळे अडथळा येत असेल तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकता. यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकियांना फॉलो करावे लागेल.
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जिल्हा किंवा तालुक्यामधील ग्रामपंचायतमध्ये जायचे आहे.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला योजने संबंधित माहिती देऊन फॉर्म प्राप्त करून घ्यायचा आहे.
- त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती अचूक भरून घेणे.
- त्यानंतर योजने अंतर्गत आवश्यक असणारे कागदपत्रे झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडून घेणे.
- त्यानंतर फॉर्म ग्रामपंचायतमध्ये जाऊन जमा करणे.
- त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामधील कृषी अधिकारींना संपर्क साधून फॉर्म प्राप्त करणे.
- फॉर्म सादर केल्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल ती सांभाळून ठेवणे.
निष्कर्ष
या लेखातून Pradhanmantri Krishi Sinchai Yojana बद्दल संपूर्ण माहिती आम्ही सविस्तररित्या दिलेली आहे. त्याचप्रमाणे लेखात योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? त्यामागचे उद्देश काय होते? त्यामधून कोणाला फायदा होणार? यासाठी कोण कोणते नागरिक पात्र असणार? सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार? अर्ज करण्यासाठी कुठे जावे लागेल? यासाठी कोणती वेबसाइट आहे? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या सांगितले आहे.
तुम्ही शेतकरी असून तुमच्या शेतात सिंचन प्रणाली नाही तर तुम्ही केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या लाभामध्ये अर्ज करून फायदा घेऊ शकता. यासाठी आम्ही दिलेल्या लेखातून माहिती समजून घेऊन अर्ज करा.
आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा योजनेचा लाभ मिळविण्यास मदत करा. अशाच कृषी संबंधित व इतर योजनांबद्दल माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता आणि Telegram चॅनेलला भेट देऊ शकता.
FAQs
पीएम कृषी सिंचाई योजनाची सुरुवात कधी झाली?
या योजनांची सुरुवात केंद्र सरकारने 1 जून, 2015 रोजी केली होती.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा उद्देश काय आहे?
भारत देशामधील कृषी क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करणे व पाण्याची नासाडी कमी करणे.
PMKSY योजनेसाठी कोण पात्र आहेत?
PMKSY योजनेसाठी भारत देशामधील शेतकरी वर्ग पात्र आहेत.
पुढे वाचा: