Bal Sangopan Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने अनाथ बालकांसाठी बाल संगोपन योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुलांना राज्य सरकारतर्फे प्रति महिना 2250 रुपये आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत.
आज आपण महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या बाल संगोपन योजनाबद्दल संपूर्ण माहिती या लेखात बघणार आहोत. यामध्ये योजनाचे महत्त्व काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? सुरु करण्यामागचे उद्देश काय होते? ती कोणातर्फे सुरु करण्यात आली? यामध्ये कोणत्या मंत्रालयाचा समावेश आहे? यामधून लाभार्थ्यांना कोणते फायदे दिले जाते? यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत? यामध्ये अर्जदारांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहेत? आणि अर्जदार यामध्ये कशाप्रकारे सहभागी होऊन लाभ मिळवू शकतो? याबद्दल आम्ही या लेखातून सविस्तारित्या सांगणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटपर्यंत लेख पूर्ण पहा.
Bal Sangopan Yojana in Marathi
केंद्र व राज्य सरकारकडून बाळ संगोपन योजनाची सुरुवात वर्ष 2005 रोजी करण्यात आली. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्राच्या निधीतून महिला व बाल विकास विभागाकडून आर्थिक मदत केली जाते.
ही आर्थिक मदत योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा बँक खात्यामध्ये थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर माध्यमातून जमा केली जाते. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि पालनपोषण व्यवस्थित होण्यासाठी आर्थिक लाभ दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून आधी 1100 रुपये प्रतिमाह रक्कम दिली जात होती, परंतु ती 31 जानेवारी, 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रतिमहा 2250 रुपये इतकी वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकारने बाल संगोपन योजना राज्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी राबविण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या मुला मुलींना आई-वडील नाही, अनाथ असलेले मुले, बेघर असलेली मुले त्याचसोबत ज्या मुलांचे पालक घटस्फोट घेऊन वेगळे झाले आहेत आणि ज्यांचे पालक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत अशा बालकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासन मदत करत आहेत.
Bal Sangopan Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | महाराष्ट्र सरकारने |
कधी सुरु केली | वर्ष 2005 साली |
विभाग | महिला व बाल विकास मंत्रालय |
उद्देश | राज्यातील अनाथ वर्गातील मुलामुलींना आर्थिक मदत पुरविणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुलं-मुली |
लाभ | महिन्याला 2250 रुपये आर्थिक मदत |
अर्ज पद्धती | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | womenchild.maharashtra.gov.in |
Bal Sangopan Yojana Purpose
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या बाल संगोपन योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील अनाथ, बेघर, निराश्रित, निराधार, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैदयांची मुले आणि संरक्षण व निवारा हवे असलेल्या मुलांना कौटुंबिक वातावरणामध्ये विकास व संगोपन करण्यासाठी पालकांना आर्थिक मदत पुरविणे हे आहे.
त्याचप्रमाणे राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून अशा अनाथ मुलांसाठी योग्य कुटुंब निवडून देण्यात सुद्धा मदत करत आहे. जेणेकरून अनाथ मुलांना चांगले पालन पोषण व हक्काचे पालक मिळून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत मिळेल. तसेच राज्यातील मुलांना अनाथ आश्रम सारख्या संस्थेमध्ये न ठेवता, त्यांचे पालनपोषण कौटूंबिक वातावरणात व्हावे हे प्रयत्न योजनेच्या माध्यमातून सरकारचे आहेत.
Bal Sangopan Yojana Benefits
- बाल संगोपन योजनाचे फायदे महाराष्ट्र राज्यामधील अनाथ मुलांना व त्यांच्या पालकांना दिला जातो.
- महाराष्ट्र शासन या योजनेच्या माध्यमातून अनाथ बालकांना आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते.
- राज्य सरकारचे या योजनेतून अनाथ मुलांना कौटंबिक क्षेत्रात पालपोषण करण्याचे ध्येय आहेत.
- अनाथ मुलांचे चांगले भविष्य होण्यासाठी व त्यांचे चांगले पालनपोषण होण्यासाठी पालकांची निवड करून दिली जाते.
- योग्य पालकांची निवड करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व स्वयंसेवी संस्थेमधील सामाजिक कार्यकर्ता गृह चौकशी करून बाल कल्याण समिती कार्यालयात माहिती देतात.
- या योजनेच्या माध्यमातून संस्थे बाहेरील कुटुंबाना अनाथ मुले सांभाळण्यासाठी राज्य सरकार प्रति महिना 2250 रुपयांची आर्थिक मदत करते.
- या योजने अंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील अनाथ मुलामुलींना लाभ दिला जातो.
- जी मुले अनाथ आहेत आणि ज्या मुलांच्या पालकांचे पत्ता मिळत नाही, त्याचप्रमाणे ज्या मुलांना दत्तक देऊ शकत नाही अशा वर्गातील बालकांना योजनेमधून लाभ दिला जातो.
Bal Sangopan Yojana Eligibility
महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुलांना बाल संगोपन योजनामध्ये पात्र ठरण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या पालकांना किंवा मुलांना महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहेत.
- या योजने अंतर्गत अर्ज करण्याऱ्या बालकांचे वय 18 वर्षांपेक्षा खाली असणे गरजेचे आहे.
- एक पालक असलेले मुलं जसे घटस्फोट झालेले, एका पालकाचे मृत्यू झालेले, गंभीर आजार आणि अविवाहित मातृत्व असलेले यामध्ये सहभागी होऊ शकतात.
- HIV ग्रस्त असलेल्या पालकानाच्या मुलांना यामध्ये अर्ज करण्यास पात्र असतील.
- कौटुंबिक वादामुळे बाधित झालेली मुले जसे कुटुंबातील वाद, तणाव व न्यायालयीन वाढ अशाना सहभागी होता येत.
- ज्या पालकांना मुले आहेत आणि ती गंभीर आजारामुळे रुग्णालयात आहेत ती सुद्धा यामध्ये पात्र आहेत.
- त्याचप्रमाणे कुष्ठरोग व कॅन्सर अश्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या पालकांच्या मुलांना लाभ दिला जातो.
- ज्या मुलांची आईवडील तुरुंगात आहेत किंवा जन्मठेपेची शिक्षा बोगीत आहेत तेही यामध्ये अर्ज करू शकतात.
- बालकामगार विभागातील मुले तसेच रस्त्यावर राहणारी मुले यामध्ये अर्ज करू शकतात.
- अपंगत्त्व असलेली मुले जसे मतीमंद, दिव्यांग, अंध आणि नैसर्गिक आपतींमुळे झालेले बालक पात्र आहेत.
- तीव्र आजार असलेली मुले जसे HIV, कँसर, पोक्सो, कोविड, कुपोषित व सॅमबालके योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- भिक्षा गृहात असणारी, व्यसनाधिन आणि बालविवाहाला बळी पडलेली बालके सुद्धा सहभाग घेऊ शकतात.
- एकाच कुटुंबातील आई व वडील अपंग असल्यास बालके अर्ज करण्यास पात्र असतील.
- बाल न्याय अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय नियम 2018 च्या कलमानुसार पात्र असणे.
- ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहेत ते यामध्ये अर्ज करू शकतात.
- एकाच कुटुंबातील दोन मुले यामध्ये अर्ज करण्यास पात्र ठरतील.
Bal Sangopan Yojana Required Documents
लाभार्थ्यांना अर्ज करताना बाल संगोपन योजनासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे जमा असणे गरजेचे आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- पालक किंवा लाभार्थीचे आधारकार्ड
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र (नगरसेवक / सरपंच / तलाठी / ग्रामसेवक)
- पालकांचे किंवा लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दाखला (अडीच लाखाच्या खाली असणे)
- आई / वडील यापैकी निधन झालेल्या व्यक्तीचे मृत्यू दाखला
- कुटुंबातील पालकांसोबतीचे घरासमोरील फोटो
- बालकांचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- मार्कशीट किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र (पर्यायी)
- बँक खात्याचे पुरावे जसे पासबुक
- बालकांचे सांभाळ करणाऱ्या कुटुंबाचे हमी पत्र
- हिंसाग्रस्त असलेल्या पालकांची पोलीस अहवाल
- अपंगत्व किंवा आजार असलेल्या पालकांचे किंवा बालकांचे वैदकीय प्रमाणपत्र
- जे कुटुंब सांभाळ करणार आहेत त्यांचे सामाजिक तपासणी अहवाल
- घटस्फोटित असलेल्या पालकांचे कागदपत्रे
Bal Sangopan Yojana Apply Online
- बाल संगोपन योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे.
- वेबसाइटमध्ये गेल्यावर तुम्हाला होमपेजमध्ये Apply Online असा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक करून तुम्हाला योजनेचा फॉर्म उघडून येईल.
- उघडून आलेला फॉर्म मधील संपूर्ण माहिती वाचून अचूक भरून घेणे.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रांना योग्यरीत्या स्कॅन करून अपलोड करणे.
- फॉर्म व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तपासणी करून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशाप्रकारे ऑनलाइन यशस्वीरित्या अर्ज करून झाल्यानंतर तुमचे फॉर्म तपासले जातील.
- या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला लाभ देण्यात येतील.
Bal Sangopan Yojana Apply Offline
जर तुम्हाला बाळ संगोपन योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास समस्या होत असतील किंवा जमत नसेल तर तुम्ही ऑफलाइन अर्ज सुद्धा करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागेल.
- अर्जदारांना अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या जिल्हा किंवा तालुकामधील महिला व बाल विकास कार्यालयात जावे लागेल.
- कार्यालयामध्ये गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला योजनेची संपूर्ण माहिती देणे.
- त्यानंतर अधिकाऱ्याकडून तुम्हाला बाल संगोपन योजनाचा फॉर्म दिला जाईल.
- त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचून भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून त्यासोबत जोडणे.
- तुमचं अर्जाचे फॉर्म व कागदपत्रे पुन्हा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करणे.
- कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून तुमच्या फॉर्मची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर योजनेच्या अटीनुसार पात्रता सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला लाभ देण्यात येतील.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन अर्ज करून योजनेचा फायदा घेऊ शकता.
Bal Sangopan Yojana Contact Details Check
- योजने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी पहिले महिला व बाल विकास विभागाची वेबसाइट उघडावी लागेल.
- त्यानंतर वेबसाइट तुमच्या समोर होमपेज उघडून येईल, त्यामधील Contact Us असा पर्याय दिसेल.
- त्या पर्यायावर क्लिक करून पुढे गेल्यानंतर तुमच्यासमोर सर्व अधिकाऱ्यांची संपर्क यादी उघडून येईल.
- संपर्क यादीनुसार तुम्ही संबंधित अधिकारी शोधून संपर्क साधू शकता.
निष्कर्ष
आमच्या लेखातून तुम्हाला Bal Sangopan Yojana संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम्ही योजनेचे महत्त्व, त्यांचे उद्देश, त्यामध्ये होणारे फायदे, त्यामधील पात्रतेच्या अटी, लागणारे आवश्यक कागदपत्रे, ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज प्रकिया आणि संपर्क याबद्दलची सविस्तर माहिती मार्गदर्शन केले. तुम्हाला बाल संगोपन योजना GR हवा असल्यास तुम्ही आमच्या Telegram मध्ये जाऊन डाउनलोड करून प्राप्त करू शकता.
आमचा हा लेख तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आमच्या वेबसाइटला Subscribe करायला विसरू नका.
FAQs
बाळ संगोपन योजना काय आहे?
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बेघर व अनाथ मुलांना प्रति महिना 2250 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
अनाथ मुलांसाठी कोणती योजना आहे?
अनाथ मुलांसाठी बाल संगोपन योजना महाराष्ट्र राज्याने सुरु केली.
बाल संगोपन योजनेमध्ये किती रुपये मिळतात?
या योजनेत लाभार्थ्यांना 2250 रुपये दिले जाते.
पुढे वाचा: