PM Awas Yojana 2024: ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबाला योग्य घर बनवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली होती. जेणेकरून भारतातील नागरिकांना PMAY अंतर्गत स्वतःचे सुरक्षित व परवडणारे घर मिळण्यात मदत होते.
आपल्या भारत देशामध्ये मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढत चाली आहे आणि लोकांचे उत्पन्नसुद्धा वाढताना दिसत आहे. यामुळे देशातील लोकांचे घर घेण्यासाठी मागणीसुद्धा वेगाने वाढली आहे. SECC म्हणजेच सामाजिक आर्थिक व जंत जनगणना २०११ पर्यंत भारत देशामधील ४ कोटी लोकांकडे स्वतःचे घर व मूलभूत सोयी सुविधासुद्धा उपलबध नव्हते.
PM Awas Yojana in Marathi
या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि लोकांचे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने वर्ष १ जून, २०१५ रोजी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली. भारत सरकार या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना परवडण्या योग्य घरे तयार करून प्रदान केली जातात. केंद्र सरकारने त्याचसोबत सगळ्यांसाठी घर निर्माण करायचे धोरणसुद्धा ठेवले होते.
२३ जुलै, २०२४ मध्ये झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामधील गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबासाठी १० लाख कोटीच्या गुंतवणुकीसाठी प्रस्थाव मांडला. या आर्थिक मदतीमुळे PMAY प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे.
या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनाबद्दल संपूर्ण माहिती असेल. या लेखात आम्ही तेच सांगायचा प्रयत्न केला आहे. यामध्ये योजनाचे उद्देश काय आहे? त्यांचे फायदे काय आहेत? यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत? यामध्ये कोणते विविध श्रेणींचा समावेश आहे? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता? याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे. योग्यरित्या लाभ घेण्यासाठी यासाठी शेवटपर्यंत लेख लक्षपूर्वक पहा.
Pradhan Mantri Awas Yojana Highlights
योजनाचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु कधी झाली | १ जून, २०१५ रोजी |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | शहरी व ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | भारतातील नागरिकांना स्वतःचे घर निर्माण करून देणे |
लाभार्थी | देशामधील गरीब व मध्यम वर्गातील कुटुंब |
लाभ | परवडणारी घरे |
अर्ज पद्धत | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmaymis.gov.in |
प्रधानमंत्री आवास योजना काय आहे?
भारत देशामधील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील गरीब कुटुंबाना घराची सुविधा प्रदान करण्यासाठी PMAY म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनाची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून आता पर्यंत देशभरात ३ कोटींपेक्षा जास्त घरे तयार करण्यात आलेली आहेत. या योजनेला दोन भागात विभागले गेलेले आहेत.
पीएम आवास योजना प्रकार
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAYG)
- PM Awas Yojana Gramin या योजेनचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कच्च्या घरांना दुरुस्त करून पक्या घरात बदलवून गृह आपत्तीच्या समस्यांना दूर करणे आहे.
- PMAYG अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये ४ कोटी घरे तयार करण्याची योजना आखली गेली आहे.
- केंद्र सरकारतर्फे या योजनेची मुदत मार्च २०२४ वर्षापर्यंत वाढविण्यात आली.
- PMAYG योजनेच्या माध्यमातून एका घराला तयार करायला जवळपास ११४-११५ दिवसांचा कालावधी लागतो.
- ग्रामीण भागातील घरांचे युनिटनुसार आकार २६९ Sqft इतकी असते.
- सामाजिक आर्थिक व जंत जनगणनाच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते, त्याचसोबत ग्रामसभेच्या माध्यमातून पडताळणी केली जाते.
ग्रामीण क्षेत्रासाठी निधी वाटप तक्ता
क्षेत्र प्रकार वर्णन | खर्चाची शेअरिंग | प्रमाण (केंद्र : राज्य) | प्रति युनिट किंमत |
सपाट क्षेत्र | केंद्र व राज्य सरकार | 60:40 | 1.2 लाख रुपये |
दुर्गम क्षेत्र (हिमालय,ईशान्य, जम्मू व काश्मीर राज्य) | केंद्र व राज्य सरकार | 90:10 | 1.3 लाख रुपये |
केंद्र शासित क्षेत्र (लडाख राज्य) | केंद्र सरकार | 100 | – |
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी (PMAY Urban)
- २५ जून, २०१५ रोजी केंद्र सरकारने PMAY Urban ची घोषणा केली होती.
- याचे मुख्य उद्देश भारतामधील महानगरांमध्ये २ कोटीपेक्षा जास्त घरे तयार करून उपलब्ध करणे आहे.
- केंद्र सरकारे ११९ लाख घरे जुलै २०२३ पर्यंत मंजूर केले आहेत.
- PMAY Urban ची सुद्धा मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
PM Awas Yojana Eligibility
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनाची पात्रता दोन्ही ठिकाणी सारखीच असते. पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे अटी दिलेल्या आहेत.
- योजना अंतर्गत सहभागी होणारे नागरिक भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे.
- अर्ज करण्याऱ्या नागरिकांकडे स्वतःचे घर नसले पाहिजेत.
- नागरिकांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावाने सुद्धा घर नसावे.
- ज्यांच्याकडे २१ Sq Meter चे पक्के घर असेल आणि त्यांना सुधार करायचा असेल तर ते पात्र ठरतील.
- या योजनेमध्ये १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
- या योजनेत वैवाहिक जोडपे असतील तर दोघांपैकी एका सदस्याला अर्ज करता येते.
- खालील दिलेल्या तक्त्यामधील वर्गाच्या कॅटेगरी व वार्षिक उत्पनानुसार पात्र असल्यास अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध श्रेणी तक्ता
वर्गाचे वर्णन | वार्षिक उत्पन्न | कर्जाची रक्कम | सबसिडी | कार्पेट क्षेत्र (Sq. Meters) |
आर्थिकदृष्टया दुर्बळ वर्ग | 3 लाखांपर्यंत | 6 लाखांपर्यंत | 6.5% | 30-60 |
कमी उत्पन्न वर्ग | 3 ते 6 लाख | 6 लाखांपर्यंत | 6.5% | 30-60 |
मध्यम उत्पन्न वर्ग १ | 6 ते 12 लाख | 9 लाखांपर्यंत | 4% | 160-200 |
मध्यम उत्पन्न वर्ग २ | 12 ते 18 लाख | 12 लाखांपर्यंत | 3% | 160-200 |
PM Awas Yojana Required Documents
पात्र असलेल्या नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री आवास योजनाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ती यादीप्रमाणे खाली दिलेली आहेत.
- अर्जदार नागरिकांचे आधारकार्ड
- पॅनकार्ड
- रेशन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- वोटर आयडी कार्ड
- आवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- मोबईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- वार्षिक उत्पन्न दाखला
- बँक खात्याची माहिती
PM Awas Yojana Apply Online
ज्या नागरिक प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करून लाभ घेयचा आहे, त्यांनी खालील दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला PMAY योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर होमपेज उघडून येईल, त्यामधील मेनुबारमध्ये तीन डॉट दिसतील.
- त्या तीन डॉटवर क्लिक केळण्यातनंतर Awaassoft चा पर्याय दिसून येईल, त्यावर क्लिक करा.
- त्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण यादी उघडेल त्यामधील Data Entry च्या पर्यायावर क्लिक करा.
- पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्ही नवीन पेजमध्ये इंटर कराल, त्यामधील Data Entry for Awaas यावर क्लिक करणे.
- त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला राज्य व जिल्हा विचारतील ते भरून घेणे व Continue बटनावर क्लिक करून पुढे जाणे.
- पुढे तुम्हला यूजर नेम व पासवर्ड टाकून नंतर कॅप्चा कोड भरून लॉगिन करणे.
- लॉगिन झाल्यानंतर त्यामध्ये Beneficiary Registration From उघडून येईल.
- त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे.
- त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अपलोड करून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करून प्रकिया पार पाडू शकता.
PM Awas Yojana Apply Offline
जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे समस्यांना सामोरे जावे लागत असल्यास तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकतात. यासाठी खालील दिलेल्या प्रक्रिया फॉलो करून अर्ज करा.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या जवळील सामान्य सेवा केंद्रामध्ये भेट देयची आहे.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमाई २५ रुपये सोबत GST देऊन संबंधित सबसिडी फॉर्म विकत घेयचा आहे.
- त्यानंतर त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण अचूक भरून घेयची आहे.
- फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर आवश्यक असणारे कागदपत्रे झेरॉक्स करून त्यासोबत जोडणे.
- भरलेल्या फॉर्मला घेऊन सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन अधिकाऱ्याला सबमिट करणे.
- त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून पावती दिली जाईल ती व्यवस्थित ठेवणे.
- अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज करण्यास प्रकिया करू शकतात.
PM Awas Yojana Application Form Status Check
- तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनाचे अर्ज तपासण्यासाठी PMAY च्या पोर्टलमध्ये जावे लागेल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Track Application च्या पर्यायामध्ये जावे लागेल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्टेटस भाग्याला मिळेल.
- अशाप्रकारे तुम्ही स्टेटस पाहण्यासाठी प्रक्रियाना फॉलो करू शकता.
निष्कर्ष
आमच्या या लेखात तुम्हाला PM Awas Yojana संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला योजनाचे महत्त्व काय आहेत? ती कधी सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु करण्यात आली? कोणाकडून सुरु करण्यात आली? यामागे कोणते मंत्रालय काम करत आहेत? तसेच आतापर्यंत किती यश योजनेला मिळाले? हे चालू करण्यामागचे उद्देश काय आहेत? तसेच यामध्ये कशाप्रकारे वाटप केले जाते? शहरी व ग्रामीण भागांना कसा फायदा घेता येईल? यासाठी कोण पात्र असणार आहेत? त्याचपरामें आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती? नागरिक कशा प्रकारे अर्ज करू शकतो? आणि अर्ज केल्यानंतर स्टेटस सुद्धा कसे पाहू शकतो? अशा प्रश्नांची संपूर्ण माहिती मार्गदर्शन केली.
तुम्हाला सुद्धा स्वतःचे घर बनविण्यासाठी आतुर असाल, तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करा आणि लाभ घ्या. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त व परिपूर्ण वाटला असेल तर गरजू लोकांना पाठवून त्यांनाही स्वतःचे घर बनविण्यास मदत करा.
जर तुम्हाला सरकारच्या अश्याच फायदेशीर योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram/WhatsApp ला जॉईन करून लेटेस्ट अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेसाठी देशभरातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक पात्र आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेची रक्कम किती आहे?
या योजनेच्या माध्यमातून सपाट भागांसाठी एक लाख वीस हजार रक्कम आणि डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रक्कम मंजूर केली आहे.
मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?
होय, तुम्ही या योजनेसाठी PMAY च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
पुढे वाचा: