Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024: सौर कृषी वाहिनी योजनाची माहिती एका क्लिकवर

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विकासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्या गरजेनुसार वीज वापरण्यासाठी वीज पुरवठा दिले जातो. शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत नापीक जमीन भाड्याने दिल्यानंतर प्रत्येक वर्षी सरकारकडून ५०,००० रुपये दिले जाणार. शेतकऱ्यांना हे वीज पुरवठा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेडतर्फे त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल लावून केले जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

देशभरात अन्नदाता शेतकरी आपल्यासाठी वेळोवेळी योग्यरीत्या पुरवठा होण्यासाठी जास्त कष्ट घेत असतात. शेतकऱ्यांना शेती करताना कोणते समस्या येऊ नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारे निरनिराळे योजना सुरु करत असतात. 

शेतकऱ्यांना दिवसा व रात्रीला शेतीचे काम करताना कोणते समस्या येऊ नये यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे. राज्य सरकार व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेडसोबत सहकार्य करून शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल लावले जातात. 

तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही दिलेला लेख शेवटपर्यंत वाचा. यामध्ये आम्ही तुम्हाला योजनेचे महत्त्व, उद्दिष्ठे, फायदे, पात्रता, लागणारे कागदपत्रे व अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana in Marathi 

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज उपलब्ध होण्यासाठी सौर ऊर्जासाठी सोलर पॅनल जोडले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरणद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाची १४ जून २०१७ मध्ये ओळख करून देण्यात आली होती. या योजनेमध्ये २०१९ रोजी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, परंतु राज्य सरकारतर्फे अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या माळरान, पडीक, नापीक अशाप्रकारची जमीन शेतकऱ्यांना भाड्याने देता येते. यामध्ये शेतकरी ३ एकर ते 10 एकरपर्यंत जमीन भाड्याने देऊ शकतो. यामध्ये महावितरणतर्फे शेतकऱ्यांना एका एकरामागे प्रतिवर्ष ३० हजार रुपये भाडे आणि त्याचसोबत प्रतिवर्ष ३ टक्के वाढीव रक्कम सुद्धा दिले जात होते.

परंतु आता Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 ची घोषणा करण्यात आली, त्यामध्ये शेतकऱ्यांना आणखी फायदा मिळवा तसेच योजनेची जलद गतीने व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना आता जमीन भाड्याने दिल्यानंतर प्रत्येक हेक्टरला १,२५,००० रुपये आणि तीन टक्के वार्षिक वाढ सुद्धा करण्यात आहे.

Saur Krushi Vahini Yojana Mahiti 2024

योजनाचे नावमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0
श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकारी योजना
सुरु कधी झाली१४ जून २०१७ रोजी
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासनाने
विभागमहाराष्ट्र राज्य विद्द्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)
उद्देशशेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग
लाभनापीक जमीन भाड्याने देऊन रोजगार कमविणे
अर्ज पद्धतऑनलाईन
अधिकृत वेबसाइटmahadiscom.in/solar-mskvy

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana चे उद्देश 

महाराष्ट्र राज्याच्या शासनातर्फे १४ जून २०१७ रोजी सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे. महावितरणच्या MSKVY 2.0 GR नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ लाखाहून अधिक कृषी वीज ग्राहक असून देशामधील शेतीच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा आहे. 

चक्रीय पद्धतीने शेतकऱ्यांना सध्या दिवसा आणि रात्रीला विजेचे पुरवठा केले जाते. यामुळे शेतकरी बांधवाना शेती करताना गैरसोय होते तसेच रात्रीच्या वेळी काम करत असताना वन्य प्राणी, साप व इतर धोक्यांना सामोरे जावे लागते. यासाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र राज्याने शासनातर्फे मिशन २०२५ च्या धोरणेच्या अंतर्गत ३० जून, २०२२ रोजी सुधारणा करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची पुन्हा एकदा सुरवात करण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana चे फायदे 

  • महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे राज्यामधील शेतकरी वर्गाला या योजनाचा लाभ मिळणार. 
  • सरकारने सुरु केलेल्या या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरात वीज पुरवठा करण्यात येतो. 
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला आपल्या शेतात दिवसा व रात्री काम करण्यास कोणतेही समस्या होणार नाही. 
  • प्रत्येक राज्यात सरकार शेतकऱ्यांच्या मदतीने सोलर स्टेशन बसविले जाते. 
  • राज्यामधील शेतकऱ्यांना आपली नापीक जमीन भाड्याने देऊन दरवर्षी रोजगार निर्माण करण्यासाठी संधी मिळते. 
  • शासनाकडून शेतकऱ्यांचे भाड्यानी घेतलेली एक एकर जमिनीवर दरवर्षी ५०,००० रुपये दिले जाते, त्याचसोबत प्रत्येक वर्षाला ३ टक्के वाढीव रक्कम सुद्धा दिली जाते. 
  • शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करून ३ एकर ते 10 एकर जमीन शासनाला भाड्याने देऊ शकतो. 
  • शासनातर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यात ३० टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहेत.
  •  सरकारकडून Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 च्या माध्यमातून जवळपास ९,००० मेगावाटचे उद्दिष्ठे ठेवण्यात आले आहेत. 
  • महाराष्ट्र सरकारचे ध्येय ३ वर्षात प्रत्येक राज्यात सौर ऊर्जा पुरवठा झाले पाहिजेत. 
  • सर्वात आधी राज्यामधील डेडिकेटेड फीडर्सला विजेच्या उपयोगासाठीसोलर प्लांट दिले जाणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून जवळपास ५ किलोमीटरच्या कृषी क्षेत्रामध्ये जवळ २ ते १० मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल स्टेशन बसविण्यात येणार आहेत. 
  • या योजने अंतर्गत  सौर ऊर्जाची स्थापना करण्यासाठी ३३/११ KV MSEDCL सब स्टेशनची यादी उपलब्ध करण्यात आलेली आहे. 
  • सरकारी जमिनीवर ३० वर्षासाठी १ रुपये दराने पट्टा दर असणार आहे. 
  • राज्य सरकार या योजनेसाठी ३,७०० कोटी रुपये खर्च करणार आहे. 

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana साठी पात्रता

राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी खालील दिलेले माहितीनुसार पात्रता असणे आवश्यक आहेत. 

  • या योजनेमध्ये अर्ज करणारे अर्जदार मूळचे महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे. 
  • या योजनाचे लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्जदाराकडे स्वतःची शेतीची जमीन असणे. 
  • शेतकरी बांधवांकडे आपल्या जमिनीचे कायदेशीर कागदपत्रे असणे. 
  • शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर कब्जा नसला पाहिजेत. 
  • या योजने अंतर्गत राज्याचे शेतकरी, शेतकरी वर्ग, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, वोटर यूजर असोसिएशन, साखर कारखाने, जल उपसा केंद्र, ग्रामपंचायत व इतर संस्था यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 
  • तसेच अर्जदारांकडून भाड्याने देण्यात येणारी जमीन कमीत कमी ३ एकर असणे. 
  • जर एका जमिनीवर एकापेक्षा जास्त मालकी हक्क असेल तर एका व्यक्तीच्या नावाने अधिकार पत्र देणे बंधनकारक आहे. 

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana चे आवश्यक कागदपत्रे 

राज्यामधील अर्जदार व्यक्तीना या उपक्रमात अर्ज करून लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाचे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहेत. 

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधारकार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी 
  • शेत जमिनीचे कागदपत्रे 
  • ओळखपत्र 
  • पॅनकार्ड 
  • सोलर प्लांट लावण्याची जागा 
  • शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र 
  • जमिनीचा नकाशा

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Registration 

महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियानुसार फॉलो करून अर्ज करू शकता. 

  • तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम सौर ऊर्जा वाहिनी योजनेची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर त्या योजनेच्या वेबसाइटचे होमपेज उघडून येईल. 
  • त्या होमपेजवरील सर्विस या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  • त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल. 
  • तिथे तुम्हाला New User Register Here असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल. 
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचे यूजर आयडी, पासवर्ड, तुमचे नाव, रहिवासी पत्ता, मोबईल नंबर, आधार नंबर, पॅनकार्ड नंबर आणि ई-मेल आयडी अशी माहिती विचारली जाईल ती संपूर्ण भरून घेणे. 
  • फॉमर भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे. 
  • त्यानंतर सगळंकाही तपासून शेवटी सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करून प्रकिया पार पाडू शकता.

निष्कर्ष 

अशाप्रकारे आम्ही तुम्हाला Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही योजनेमधून शेतकरी अर्ज करून कसा फायदा घेऊ शकतो. तसेच सरकारने सुरू केलेलं योजनाचे महत्त्व काय आहेत? ते का सुरु करण्यात आले? कोणासाठी सुरु करण्यात आले? हा उपक्रम सुरु करण्यामागचा उद्देश काय होता?  यासाठी पात्र कोण असणार आहेत? त्याचप्रमाणे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत? आणि अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया कोणत्या आहेत? अशी सविस्तर माहिती आम्ही या लेखातून सांगितली. 

तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात आणि तुमच्याकडे सुद्धा ३ एकारपेक्षा जास्त नापीक जमीन ओसाड पडली आहे, तर आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार या योजनेच्या अर्ज करून लाभ मिळवा. तसेच आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या शेतकरी बांधवानासुद्धा पाठवून त्यांना रोजगार निर्माण करण्यास मदत करा. 

अशीच कृषी आणि सरकारी योजना संबंधित माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करा किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून नवीन अपडेट्स मिळवा. 

FAQs

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे? 

ही योजना म्हणजे महाराष्ट्र राज्यातील दिवसा शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुविधा देण्यासाठी सुरु केली आहे 

सौर कृषी योजनासाठी कोण पात्र आहेत?

सौर कृषी योजनासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग पात्र आहेत. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाची सुरुवात कधी झाली? 

महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची सुरवात १४ जून, २०१७ रोजी केली होती.

पुढे वाचा: