Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: नागरिकांना मिळणार 2 लाखांचा विमा मोफत

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: भारतातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत विमा दिला जातो, जेणेकरून त्यांच्या जीवनात आर्थिक स्वरूपात स्थिरता राहण्यात मदत मिळेल. जे नागरिक दुर्घटना आणि आपत्तीसाठी आर्थिक खर्च करू शकत नाही त्यांच्यासाठी हा विमा अत्यंत फायेदशीर आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

असे नागरिक या योजनेमध्ये अर्ज करून वैद्यकीय सुरक्षेचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतात. याचबद्दल आम्ही या लेखात संपूर्ण माहिती सांगितली आहे. यामध्ये आम्ही प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना काय आहे? त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, लागणारे कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहा.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana in Marathi 

सुरक्षा बिमा योजना भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 8 मे, 2015 रोजी सुरु केली होती. या योजनेमध्ये ज्या नागरिकांचे निधन झाले आहे किंवा त्यांच्या सोबत अपघात होऊन अपंगत्त्व आले आहे त्यांना या विमा सुरक्षामधून 2 लाखापर्यंतची आर्थिक मदत मिळणार. योजनेतून मिळणाऱ्या दोन लाखांचे कव्हर प्राप्त करण्यासाठी वर्षाला फक्त 20 रुपये भरून नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 

हा उपक्रम अपघाती बीमा प्रकारा सारखेच असून याचे प्रीमियन फार कमी भरावे लागते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये वर्षातून एकदा प्रीमियम भरून एका वर्षासाठी विमा सुरक्षा प्राप्त करू शकतात. 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेवर तुम्हाला किती पैसे मिळतात?

आपत्तीचे वर्णनवार्षिक कव्हरची रक्कम
अर्जदार मृत पावल्यावर2 लाख रुपये
अर्जदाराचे दोन्ही डोळ्यांनी निकामी होणे किंवा दोन्ही हात/पाय निकामी होणे.2 लाख रुपये
अर्जदाराच्या डोळ्यांची दृष्टी जाणे किंवा एक हात/पाय निकामी होणे. 1 लाख रुपये

PM Suraksha Bima Yojana Details 

योजनेचे नावप्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कोणी केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
कधी सुरु केली8 मे, 2015 रोजी
मंत्रालयआर्थिक सेवा विभाग
उद्देशगरीब व मध्यम वर्गातील नागरिकांना वैद्यकीय सुरक्षा प्रदान करणे
लाभ2 लाख रुपयांचा विमा कव्हर
लाभार्थीभारतातील नागरिक
अर्ज पद्धतऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटjansuraksha.gov.in

PM Suraksha Bima Scheme Purpose

केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे उद्देश भारतातील नागरिकांना वैद्यकीय सुरक्षासाठी आर्थिक मदत करणे. आपल्या देशात जास्त प्रमाणात नागरिक हे गरीब वर्गातील आहेत. त्याचसोबत, दर वर्षी काही ना काही, कुठे ना कुठे अपघात आणि आपत्ती होतच असते. त्यात काही गरीब वर्गातील नागरिक अशाप्रकारच्या परिस्थितीसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात. 

त्याचसोबत जर कुटुंबामधील कमवता माणूस गेल्यावर किंवा त्याला अपंगत्व आल्यावर आर्थिक परिस्थितीशी सामोरे जावे. यासाठी केंद्र सरकारने अशा लोकांना वैद्यकीय सुरक्षा आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरु केली. जे लाभार्थी यामध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना फक्त महिन्याला 2 रुपये भरून वर्षासाठी 1 ते 2 लाखांचा विमा कव्हर घेऊ शकतात.  

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Benefits 

  • भारतातील नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमाधारकांना आर्थिक स्वरूपात मदत दिली जाणार. 
  • या योजने अंतर्गत विमा धारकांना या सुरक्षा पॉलिसीमधून 2 लाखांचा अपघाती जीवन विमा प्राप्त करता येणार. 
  • यामधील लाभार्थीना फक्त वर्षाला 20 रुपये प्रीमियम भरून एक ते दोन लाखांचा लाभ मिळू शकतो.  
  • लाभार्थीच्या या योजने अंतर्गत जोडलेल्या बँक खात्यामधून ऑटोमॅटिकली दरवर्षाला प्रीमियम कापून घेतले जाणार. 
  • तसे पाहायला गेलो तर आपण खाण्या-पिण्यामध्ये बरेच वायफळ खर्च करत असतो, परंतु इथे फक्त काही रुपये वर्षाला भरून आपल्या आरोग्याला सुरक्षित ठेवू शकतो. 
  • केंद्र सरकारने 9 वर्षा अगोदर सुरु केलेल्या या योजनामध्ये आतापर्यंत 29 कोटी लोकांनी विमाचा फायदा घेतला आहे. 
  • लाभार्थी नागरिकांना या विमामधून 1 जून ते 31 मे पर्यंतचा एक वर्षाच्या कालावधीसाठी कव्हर दिला जातो. 
  • आपल्या देशातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रात पाहायला गेले, तर वर्षाचे प्रीमियम फार असते त्यांच्या तुलनेत हा विमा जास्त पटीने स्वस्त आहे. 

PM Suraksha Bima Yojana Eligibility 

  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनामध्ये पात्र ठरण्यासाठी अर्जदारांना भारताचे स्थानिक नागरिक असणे आवश्यक आहे. 
  • या योजने अंतर्गत मागासवर्गीय आणि दुर्बल वर्गामध्ये असलेले कुटुंब अर्ज करून लाभ घेऊ शकतात. 
  • यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्ष असले पाहिजेत. 
  • नागरिकांना या विम्याचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असून ऑटो डेबिट सुविधा सुरु असणे गरजेचे आहे. 

PM Suraksha Bima Yojana Documents 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनामध्ये आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेल्या यादीनुसार अर्जदाराला अर्ज करताना सोबत जोडावी लागतील.

  • अर्जदाराचे आधारकार्ड (KYC केलेला) 
  • बँक खात्याचे पासबुकचे पहिले पान 
  • रेशनकार्ड 
  • वोटर आयडी 
  • वयाचे पुरावे 
  • मोबाईल नंबर 
  • वार्षिक उत्पनाचा दाखला
  • ड्रायविंग लायसन्स/ पॅनकार्ड / पासपोर्ट 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • ई-मेल आयडी 
  • नॉमिनीचे सुद्धा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Registration 

जे नागरिक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी खालील दिलेल्या प्रकियानूसार स्टेप बाय स्टेप सूचनानुसार अर्ज करा. 

  • सर्वात प्रथम तुम्हाला जन सुरक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. 
  • वेबसाइटवर गेल्यावर तुमच्या समोर होम पेज उघडून येईल. 
  • तुम्हाला होमपेजच्या वरच्या मेनूमध्ये Forms असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुम्हाला Application forms आणि Claim Forms असे दोन पर्याय दिसतील. 
  • त्या दोन पर्यायांपैकी एप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करा. 
  • त्यावर क्लिक केल्यावर काही भाषांमध्ये pdf दिसतील. 
  • त्यामधील तुमच्या सोयीनुसार PM Suraksha Bima Yojana Form PDF Download करून घ्यायचा आहे. 
  • फॉर्म डाउनलोड केल्यानंतर प्रिंट करून घेणे. 
  • त्यानंतर त्या फॉर्म मध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून घेणे.  
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून घेणे. 
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म आणि कागदपत्रे तुमच्या बँकेत जमा करायचे आहे. 
  • अशाप्रकारे तुमचेची संपूर्ण अर्ज प्रकिया यशस्वीरीत्या झालेली आहे. 
  • बँकेतून तुमचे कागदपत्रे तपासण्यात येतील आणि पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी 

  • जे नागरिक या योजनेमध्ये लाभार्थी आहेत, त्यांना अपघातामुळे होणारा मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी विमा संरक्षण मिळणार. 
  • अर्ज करण्यासाठी स्वतंत्ररित्या बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म जमा करू शकता. 
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 70 पेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द केला जाईल. 
  • ज्या व्यक्तीचे अनेक बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहेत, त्यांनी फक्त एकाच ठिकाणी अर्ज करावा. 
  • अर्ज करण्यासाठी त्या नागरिकाचे बँक खाते आधारकार्डशी जोडलेले असावे. 
  • सरकारतर्फे मिळणाऱ्या विमा संरक्षणाचा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत उपलब्ध असणार, यामुळे अर्जदाराने 31 मे च्या आधी अर्ज करणे गरजेचे आहे. 
  • विमासाठी लागणारे प्रीमियम लाभार्थीच्या बँक खात्यातून वजा केले जातील, यासाठी बँक खात्यामध्ये ऑटो डेबिटचे फॉर्म जमा करणे बंधनकारक आहे. 
  • दर वर्षीच्या 1 जूनला लाभार्थीच्या बँक खात्यामधून प्रीमियम वजा केले जातील. 
  • लाभार्थीचे ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये विमा चालू असलेले खाते बंद केल्यास लाभ मिळणार नाही. 
  • तसेच चालू बँक खात्यामध्ये प्रीमियमसाठी पैसे नसल्यास सुद्धा सुविधा रद्द करण्यात येणार.
  • लाभार्थींच्या खात्यामधून काही कारणामुळे प्रीमियम थांबविण्यास आल्यावर विमा कंपनीची जबाबदारी राहील ती पुन्हा चालू करून देणे. 
  • जर अर्जदाराने नजरचुकवत दोन बँकेत सारखे लाभ घेताना आढळल्यास विमाचा हफ्ता जप्त केला जाईल. 
  • पुरेशी रक्कम बँक खात्यामध्ये नसल्यास विमा सुरक्षा बंद करण्यात येईल. 

निष्कर्ष

अशाप्रकारे आम्ही तुम्हाला Pradhan Mantri Suraksha Bima Yojana संबंधित संपूर्ण माहिती आमच्या या लेखातून सांगितली. यामध्ये या योजनाचे महत्त्व काय आहेत? योजना काय आहे? ही कोणी सुरु केली? कधी सुरु केली? याचा लाभ काय आहे? कोण यामध्ये अर्ज करू शकतो? कोणते मंत्रालय हे काम सांभाळते आहे? सरकारचे उद्देश काय? फायदे काय आहेत? यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत? कशाप्रकारे अर्ज करू शकतो? कुठे अर्ज करू शकतो? अर्ज करण्यासाठी फॉर्म कसा मिळेल? याबद्दल सविस्तररित्या आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले. 

आम्ही आशा करतो तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज करून तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षा प्रदान कराल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कुटुंबातील गरजू लोकांनासुद्धा पाठवून लाभ घेण्यास मदत करा. 

अशाच लाभदायक आणि उपयुक्त योजनांसाठी आम्हाला Telegram किंवा WhatsApp वर जॉईन करू शकता. त्याचसोबत नवनवीन अपडेट्स मिळवू शकता. 

FAQs

Pmsby काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

Pmsby म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि त्यांचे फायदे वर्षाला फक्त 20 रुपये भरून 2 लाखाचा सुरक्षा कव्हर मिळतो. 

मराठीत PMsby म्हणजे काय?

मराठीत PMsby म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असा आहे. 

PMSBy चे लाभार्थी कोण आहेत?

PMSBy मध्ये भारत देशामधील 18 ते 70 वयोगटातील नागरिक लाभार्थी आहेत. 

PMsby साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

PMsby साठी आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्न दाखला, फोटो, रेशनकार्ड, बँक खात्याचे पासबुक आणि वोटर आयडी इत्यादी आवश्यक आहेत.

हे सुद्धा पहा: