Swadhar Yojana 2024: महाराष्ट्र राज्यातील सरकारने राज्यामधील गरीब वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण करू शकत नाही, त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे.
ही आर्थिक मदत प्रतिवर्ष 51,000 रुपये असून 11 वी, 12 वी, डिप्लोमा, व्यावसायीक आणि नॉन व्यवसायीक शिक्षणासाठी सरकारतर्फे राज्यातील गरीब व मध्यम वर्गीय अनुसूचित जाती व नव बौद्ध श्रेणीतील विद्यार्थ्यांना दिली जाणार.
सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक लाभामधून विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करू शकतो. या उपक्रमामुळे विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकतो.
Swadhar Yojana यामध्ये लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ऑनलाइन अर्ज करून लाभ घेण्यासाठी आम्ही दिलेला लेख शेवटपर्यंत पाहा. यामध्ये आम्ही तुम्हाला योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रकिया याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.
Swadhar Yojana in Marathi
महाराष्ट्रातील राज्य सरकारने सुरु केलेल्या स्वाधार योजना अंतर्गत राज्यामधील अनुसूचित जाती (SC) आणि नव बौद्ध (NB) समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार आहे. सरकारतर्फे 10 वी, 12 वी, डिप्लोमा आणि व्यावसायीक कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या मदतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दर वर्षी 51 हजार रुपये रक्कम देण्यात येणार. विद्यार्थ्यांच्या विविध सुविधांसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करून एकूण 51 हजार रक्कम दिली जाणार.
स्वाधार योजना माहिती मराठी
योजनेचे नाव | स्वाधार योजना |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकारने |
कधी सुरु केली | 2024 |
संबंधित | महाराष्ट्र समाज कल्याण विभाग |
उद्देश | गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवं बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी |
आर्थिक लाभ | प्रतिवर्ष 51,000 रुपये |
अर्ज पद्धती | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | sjsa.maharashtra.gov.in |
Swadhar Yojana Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्वाधार योजनाचे उद्देश राज्यामधील मध्यम व गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे तसेच चांगले शिक्षण प्राप्त करून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गरीब वर्गातली काही मुले ज्यांना उच्च शिक्षण घ्यायची खूप इच्छा असते, परंतु घरची गरीब परिस्थिती आणि शिक्षणाला लागणार खर्च ते भागवू शकत नाही.
यासाठी सरकार त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करते. यामधून मिळणाऱ्या रक्कमेतून अनुसुचित जाती व जमातींच्या परिवारातील मुलांना आपले शिक्षण न थांबवता ज्ञान प्राप्त करून भविष्यात चांगला रोजगार निर्माण करता येऊ शकतो.
Swadhar Yojana Benefits
- महाराष्ट्र राज्यातील दुर्बळ व गरीब वर्गातील मुलांना शिक्षणासाठी Maharashtra Swadhar Yojana च्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार.
- या योजने अंतर्गत गरीब वर्गातील मुलांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 51 हजार रुपये बँक खात्यामध्ये पाठविले जाणार.
- सरकारने सुरु केलेल्या या योजनेमध्ये राज्यातील बारावी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार.
- तसेच डिप्लोमा, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक कोर्स करणारे सुद्धा यामध्ये अर्ज करून लाभ मिळवू शकतात.
- राज्यामधील अनुसूचित जाती व नव बौद्ध श्रेणीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजने अंतर्गत लाभ घेता येणार.
- विद्यार्थी प्रत्येक वर्षी भेटणाऱ्या आर्थिक लाभाचा त्यांच्या बोर्डिंग, लॉजिंग आणि इतर खर्चासाठी या रक्कमेचा उपयोग करू शकतात.
- राज्यातील सरकारने शारीरिक स्वरूपातील अपंगत्त्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून ठेवले आहेत.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेमधून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा उपयोग करून घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
स्वाधार योजनेमध्ये मंजूर केलेल्या आर्थिक लाभाचे वर्गीकरण
सुविधा | खर्च |
बोर्डिंग सुविधा | 28,000 रुपये |
लॉजिंग सुविधा | 15,000 रुपये |
मेडिकल आणि इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी | 5,000 रुपये (अतिरिक्त) |
विविध खर्च | 8,000 रुपये |
इतर शाखांसाठी | 2,000 रुपये (अतिरिक्त) |
एकूण मिळून रक्कम | 51,000 रुपये |
Swadhar Yojana Eligibility
- महाराष्ट्र स्वाधार योजनामध्ये पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे.
- या योजनेमध्ये फक्त गरीब व दुर्बळ वर्गातील अनुसूचित जाती (SC), जमाती आणि नव बौद्ध (NB) श्रेणीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
- ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्याच कुटुंबातील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अकरावी, बारावी, डिप्लोमा, व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा हवा.
- विद्यार्थ्यांला यामध्ये सहभागी होण्यासाठी मागील वर्गात कमीत कमी 60% टक्केवारी असणे महत्त्वाचे आहे.
- जे विद्यार्थी अपंग आणि दिव्यांग असतील त्यांना सहभागी होण्यासाठी त्यांना मागील वर्गात कमीत कमी 40% टक्केवारी असणे.
- यामध्ये अर्ज करून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्राच्या बाहेरील स्थानिक विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
- यामध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेत खाते असून आधारकार्ड सोबत लिंक असणे.
- सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा उपयोग फक्त शैक्षणिक कालावधीनुसार जास्तीत जास्त 7 वर्ष घेता येईल.
स्वाधार योजनेचे अटी आणि शर्ती
- विद्यार्थ्यांने या योजनेत अर्ज करताना फॉर्म अपूर्ण सोडू नये.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यासाठी खोटी कागदपत्रे लावल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- एखाद्या विद्यार्थ्यांचे मागील वर्गातील गुण 60% च्या खाली असतील तर तो विद्यार्थी अर्जसाठी पात्र राहणार नाही.
- जे विद्यार्थी अनुसुचित जाती व नवं बौद्ध असून ते अपंग आहे त्यांना 40% गुणाप्रमाणे अर्ज करण्यास मान्यता आहे.
Swadhar Yojana Required Documents
विद्यार्थ्यांला अर्ज करून लाभ घेण्यासाठी स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे, यासाठी खाली दिलेल्या यादीनुसार कागदपत्रे जमा करून ठेवणे.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधारकार्ड (बँकेला लिंक असलेले)
- जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
- बँक खात्याचे पासबुकचे पहिले पान
- ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मागील वर्गातील निकाल (मार्कशीट)
- अपंगत्व प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- कुटुंबातील मुख्य सदस्याचे वार्षिक उत्पन्न दाखला
- महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- शपथपत्र
Swadhar Yojana Registration
स्वाधार योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज्य सरकारकडून ऑनलाइन अर्ज प्रकिया अजून सुरु करण्यात आली नाही. परंतु या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता.
आम्ही संशोधन केले असता, आम्हाला फक्त नांदेड जिल्ह्यातील कार्यालयातर्फे ऑनलाइन अर्ज सुरु करण्यात आले होते असे आढळले. परंतु तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2024 ही होती.
जे कोणी विद्यार्थी पात्र आहेत ते खालील दिलेल्या ऑफलाइन प्रकियानुसार अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्वाधार योजनाचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
- फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या telegram चॅनेलमध्ये जाऊन PDF फॉर्म डाउनलोड करू शकता अथवा अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता.
- सर्वातआधी तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- वेबसाइटवर गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये तुम्हाला Swadhar Yojana Form PDF ची लिंक प्राप्त होईल.
- त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
- त्यानंतर फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
- फॉर्म भरून झाल्यावर त्यामध्ये लागणारे सर्व कागदपत्रे जोडून घेणे.
- त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म आणि कागदपत्रे तुमच्या जिल्ह्यामधील समाज कल्याण विभागामध्ये जाऊन जमा करायचा आहे.
- कार्यालयाकडून तुमचे सगळे कागदपत्रे तपासले जातील आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून आर्थिक लाभाचा उपयोग करून घेऊ शकता.
निष्कर्ष
अशाप्रकारे आम्ही तुम्हाला Swadhar Yojana याबद्दल ची संपूर्ण माहिती या लेखातून सोप्या पद्धतीमध्ये सांगितली. यामध्ये आम्ही योजना संदर्भात त्यांचे उद्देश काय? यामध्ये काय लाभ मिळणार आहे? कोण कोण यामध्ये अर्ज करू शकतो? पात्रता काय आहे? ही कोणी सुरु केली? का सुरु केली? यामध्ये कोणते विभाग नेमले आहे? लाभार्थी कोण असणार? आर्थिक लाभ किती मिळणार? यासाठी वेबसाइट कोणती आहे? यांचे फायदे काय आहे? यामध्ये लागणारे कागदपत्रे कोणती आहेत? विद्यार्थी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करू शकतात? आणि अर्ज करण्यासाठी फॉर्म कुठून प्राप्त करता येईल? या सगळ्या विषयावर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले.
जे विद्यार्थी यामध्ये पात्र आहेत आणि त्यांना अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सविस्तररित्या माहिती वाचून अर्ज करा.
या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा फायदा घेत चांगले प्रशिक्षण घेऊन तुमचे आयुष्य साकार करा. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा हा लेख पाठवून या योजनेचा लाभ घेण्यास मदत करा.
अशाच नवनवीन योजनांसाठी आम्हाला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp Channel ला जॉईन करून लेटेस्ट अपडेट्स मिळवू शकता.
FAQ
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्यामधील गरीब व दुर्बळ वर्गातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध श्रेणीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
स्वाधार योजना म्हणजे काय?
स्वाधार योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध श्रेणीतील अकरावी, बारावी व डिप्लोमा करत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
महाराष्ट्रात स्वाधार योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
महाराष्ट्रात स्वाधार योजनेसाठी अकरावी, बारावीतील व डिप्लोमा करणाऱ्या अनुसूचित जातीमधील आणि नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतो.
स्वाधार योजनामध्ये अर्ज कुठे करायचा?
स्वाधार योजनामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील समाज कल्याण विभागामध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
Read More: