Bima Sakhi Yojana: भारत देशामधील महिलांना सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने बीमा सखी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 7 हजार रुपये कमविण्याची संधी मिळणार आहे.
भारत देशामध्ये आजही काही असा महिला वर्ग आहे, जो बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये आपले घर चालवत आहे. त्याचप्रकारे काही अशा महिला आहे ज्यांनी शिक्षण प्राप्त केले, त्यांना रोजगार कमविण्यासाठी संधी प्राप्त होत नाही. अशा महिलांसाठी भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली आहे.
बीमा सखी योजना काय आहे?
भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 09 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातील पानिपत येथे विमा सखी योजना सुरु केली. विमा सखी योजनेमधून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, त्यांची आर्थिक साक्षरता वाढविणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे.
केंद्र सरकारकडून LIC मार्फत बिमा सखी योजना सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये दिले जाणार आहे आणि यामध्ये जर त्या महिलांनी चांगले काम केले तर बोनस म्हणून वर्षाला 48000 रुपये देखील मिळणार आहेत.
या योजनेसाठी सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. विमा सखी योजना ही महिलांच्या आर्थिक बळकटीसह स्वावलंबनाच्या दिशेने उचलले एक मोठे पाऊल आहे. या योजनेमुळे महिलांना केवळ रोजगार उपलब्ध होणार नसून महिलांच्या विमा क्षेत्रात सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे.
Read More: