Sukanya Samriddhi Yojana Details: आपल्या आर्टिकलच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर लेख शेवटपर्यंत पहा.
मुलीसाठी सुकन्या पॉलिसी म्हणजे एक प्रकारची गॅरेंटी रिटर्न देणारी गुंतवणूक स्कीम आहे. ज्यामध्ये भारत देशामधील पालक आपल्या मुलींसाठी पॉलिसी काढून गुंतवणूक करू शकतात. ज्यामध्ये मुलीच्या नावे गुंतवलेल्या रक्कमेला भविष्यामध्ये व्याजदरानुसार वाढीव मोठी रक्कम प्राप्त होण्यात मदत मिळते.
Read More: Sukanya Samriddhi Yojana Interest Rate
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात 22 जानेवारी, 2015 मध्ये केली. ज्यामध्ये देशामधील पालक आपल्या 2 मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनामध्ये खाते उघडू शकतात. वय 18 वर्षाच्या खाली असलेल्या मुलीच्या नावाने पालक सुकन्या पॉलिसी काढू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी
या योजनेमध्ये पालकांना आपल्या मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. पालकांना सुकन्याचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 200 रुपये ते जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये रक्कम जमा करावी लागते.
Read More: Sukanya Samriddhi Yojana Benefits
सुकन्या पॉलिसीमध्ये जमा केलेल्या एकूण रक्कमेवर 7.6% व्याजदर लागू केला जातो. ज्यामध्ये मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलगी आपल्या शैक्षणिक खर्चासाठी पैसे काढू शकते. या योजनेमध्ये मिळालेल्या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचे इनकम टॅक्स लागू केले जात नाही.
ही योजना सरकारी असल्याकारणामुळे भविष्य काळामध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर गॅरेंटी रिटर्न येणे साहजिक आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या मागे मुख्य उद्देश देशामधील गरीब वर्गातील पालकांना आपल्या मुलीच्या भविष्यकाळामध्ये होणाऱ्या आर्थिक व सामाजिक खर्चाला गुंतवणुकीच्या मदतीने चिंता कमी करणे आहे.